ETV Bharat / state

दुष्काळाकडे दुर्लक्ष कराल तर याद राखा; राज ठाकरेंचा सरकारला इशारा

दुष्काळी परिस्थिती आणि बेरोजगारी मुद्यावर राज ठाकरेंनी सरकारला लक्ष्य केले आहे.

author img

By

Published : May 1, 2019, 12:12 PM IST

मुंबई

मुंबई - राज्यात पडलेल्या भीषण दुष्काळाकडे मनसे प्रमुख राज ठाकरेंनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांनी पत्रक काढून राज्यातील दुष्काळ आणि बेरोजगारी विषयी चिंता व्यक्त केली आहे. दुष्काळी परिस्थितीवर महाराष्ट्र सैनिक लक्ष ठेऊन आहेत आणि जिथे जिथे सरकारी यंत्रणा दिरंगाई करत आहेत, तिथे तिथे मनसे दणका देत आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

दोन्ही विषय इतके गंभीर आहेत की, तमाम मराठी जनांनी जनमताचा रेटा उभारायला हवा आणि त्यासाठी 'महाराष्ट्र दिन' ह्या शिवाय उत्तम दिवस असूच शकत नाही. माझी महाराष्ट्रातील जनतेला विनंती आहे की, दुर्लक्ष करू नका, गाफिल राहू नका, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.

महाराष्ट्रातील दुष्काळाची स्थिती प्रचंड गंभीर आहे. अनेक तज्ज्ञांच्या मते १९७२ पेक्षा यावर्षीचा दुष्काळ गंभीर असल्याचे सांगितले जात आहे. दुसरीकडे शहरांमध्ये असंघटितच नव्हे तर अगदी उच्च कौशल्याधारित व्यवसायातील तरुण-तरुणी देखील त्यांच्या नोकऱ्या गमावत आहेत.

या दोन्ही विषयात आता सरकारने पोकळ दावे करण्याच्या पलिकडे जायला हवे आणि माध्यमांनीदेखील अधिक काटेकोरपणे ह्या दाव्यांतील तथ्ये तपासायली हवी. निवडणुका येतील, जातील, पण त्याच्या पलिकडे जाऊन आपल्याला ह्या विषयांकडे बघायला लागेल, असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

fsds

Intro:Body:Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.