मुंबई - पाच वर्षांपूर्वी भाजप जाहीरात करत होती की, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा. परंतु पाच वर्षे सत्ता भोगून या सरकारने आपले कोणतेच वचन पूर्ण केले नाही. तरूणांना रोजगार देण्याच्या गोष्टी त्यांनी केल्या होत्या. पण, आज 30 टक्के शासकीय कर्मचाऱ्यांना घरी बसवायचा प्रयत्न सरकार करत आहे. मुलभूत सोयी-सुविधांचा पुरवठा सरकारकडून व्यवस्थित केला जात नाही. आज आम्ही या सरकारला विचारतो की, कुठे नेऊन ठेवलाय महाराष्ट्र आमचा, असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची भिवंडी येथे आज सभा होती. यावेळी राज ठाकरे यांनी सरकारचा चांगलाच समाचार घेतला.
सरकारनं मारल अन् पावसानं झोडलं तर तक्रार कोणाकडे करायची
सगळेच सत्तेसाठी धावत आहेत. पण, राज्यात सक्षम विरोधी पक्ष नसेल तर सत्ताधारी वाट्टेल तसे वागतात आणि लोकांना चिरडतात. आजची परिस्थिती अशी आहे की सरकारने मारलं आणि पाऊसानं झोडपलं तर कोणाकडे करायची. सरकारने झोडले तर तक्रार करायला सक्षम विरोधी पक्ष हवा यासाठी आम्हाला विरोधी पक्ष म्हणून निवडूण द्या, असे अवाहन राज ठाकरे यांनी केले.
नाशकातील रस्त्यांवर खड्डे नाहीत
१९८२ ला भिवंडीत मी पहिल्यांदा सन्मानीय बाळासाहेबांसोबत आलो होतो आणि पुढे अनेकवेळा आलो. पण, आज येताना खड्डे बघून प्रश्न पडला की तुम्हाला राग कसा येत नाही, मला असल्या हतबल लोकांचे नेतृत्व करायला आवडत नाही. ज्यावेळी नाशिक पालिकेत मनसेची सत्ता होती. त्यावेळी कंत्राटदाराला टक्केवारी कोणाला द्यायची नाही. पण, रस्त्यात खड्डे दिलसे की, त्याच खड्ड्यात उभा करून मारेन, अशी तंबी द्यायला सांगितली होती. टक्केवारी बंद केल्याने त्यामुळे नाशकात खड्डा नाही.
14 हजार घरांचे कर्ते पुरूष या सरकामुळे गेले
शासनाच्या चुकीच्या धोरणांमुळे, योग्य हमीभाव शेतकऱ्यांना न मिळाल्यामुळे गेल्या ५ वर्षात १४ हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. ते त्यांच्या घरातील कर्ते पुरूष होते. याला कोण जबाबदार आहे. याचा आपल्याला आला पाहिजे.
दलबदलुंना भ्रष्टाचाऱ्यांना घरी बसवा
भाजप सत्तेत येण्यापूर्वी भ्रष्टाचार संपविण्याच्या गोष्टी करत होती. आता काँग्रेस आणि राष्टवादीतील भ्रष्टनेते आज दल बदलून भाजपात गेले आहेत. यामुळे, आज भाजपाच भ्रष्टाचारयुक्त झाली आहे. अशा दलबदलू भ्रष्टाचाऱ्यांना घरी बसला, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
हतबल होण ही महाराष्ट्राची परंपरा नाही
आज आपल्याला राग व्यक्त करण्यासाठी ट्विटर, फेसबूक, व्हॉट्सअॅप सारख्या समाज माध्यमांचा वापर करावा लागत आहे. इतके हतबल होण्याची आपल्या महाराष्ट्राची परंपरा नाही. उठा राग व्यक्त करा, शासनाला जाब विचारा, तुमच्या वतीने आम्ही शासनाला जाब विचारण्यासाठी तुमचा राग विधानपरिषदेत व्यक्त करण्यासाठी आम्हाला सक्षम विरोधी पक्ष म्हणून मनसेना निवडूण द्या, असे आवाहन राज ठाकरे यांनी केले.
माणसांचा जीव एवढा स्वस्त नाही
शिवसेनेचे खासदार आडसूळ सिटी कॉऑपरेटिव्ह बँक चालवत आहेत. बँक बुडल्यावर खातेदार भगिनी त्या खासदारांना भेटायला गेले तर म्हणाले मी काही करू शकत नाही, मरायचं तर मरा, असे उत्तर दिले. माणसांचा जीव एवढा स्वस्त नाही.
किती टोलनाके बंद झाली
भाजपने मागील जाहीर नाम्यात टोकनाके बंद करू, असे म्हटले होते. मनसेने आंदोलन करत महाराष्ट्रातील 70 टक्के टोल नाके बंद पाडले. मागील पाच वर्षांत भाजप सत्तेत आल्यानंतर किती टोलनाके बंद केली आहेत, असा प्रश्न यावेळी राज ठाकरे यांनी व्यक्त केला.
प्रबध विरोधी पक्ष निवडूण द्या
सत्ताधाऱ्यांना टाळ्यावर आणण्यासाठी प्रबळ विरोधी पक्ष असणे गरजेचे आहे. त्यामुळे आम्हाला म्हणजेच मनसेच्या उमेदवारांना निवडून द्या, आम्ही प्रबळ विरोधी पक्षाचे काम करू, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले.