ETV Bharat / state

राज ठाकरे यांच्या हाताला टेनिस खेळताना झाली दुखापत - मुंबई मनसे बातमी

मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या डाव्या हाताला दुखापत झाली असून त्यांच्यावर हिंदुजा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज ठाकरेंच्या मार्गदर्शनाखाली वांद्रे येथील एमआयजी क्लब येथे पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांच्या हाता सपोर्टर दिसल्याने चर्चा सुरू झाली होती.

राज ठाकरे
राज ठाकरे
author img

By

Published : Jan 12, 2021, 3:01 PM IST

Updated : Jan 12, 2021, 4:14 PM IST

मुंबई - महाराष्ट्र नवनिर्माण पक्ष पुन्हा एकदा सक्रिय व्हावा यासाठी राज ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली बांद्रा एमआयजी क्लब येथे राज्यस्तरीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज ठाकरे जेव्हा या बैठकीला पोहचले तेव्हा त्यांच्या डाव्या हाताला सपोटर लावण्यात आला होता. यामुळे राज यांच्या हाताला काय झालं याची चर्चा सुरू झाली. राज यांच्या डाव्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर असून हिंदुजा रुग्णालयात उपचार त्यांनी उपचार घेतले आहेत.

राज ठाकरे
राज ठाकरे नेहमी प्रमाणे टेनिस खेळण्यासाठी गेले होते. मात्र, सोमवारी (दि. 11 जाने.) त्यांना थोडी दुखापत झाली आहे. ही दुखापत मोठी नाही. त्यांनी तातडीने हिंदुजा रुग्णालयात उपचार घेतले. त्यांच्या हाताला हेअरलाईन फ्रॅक्चर आहे. त्यामुळे त्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हाताला सपोर्टर लावले आहे.

राज ठाकरे यांना काही वर्षांपूर्वी देखील अशाप्रकारे दुखापत झाली होती. त्यांच्या उजव्या कोपराला टेनिस एल्बोला त्रास होता. त्यावेळी त्यांनी हाताला सपोर्टर लावला होता. विधानसभा निवडणुकीवेळी राज ठाकरे यांच्या हाताचा सपोर्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत होता.

हेही वाचा - राज ठाकरेंच्या सुरक्षेसाठी मनसेचे महाराष्ट्र रक्षक पथक

हेही वाचा - पोलीस नितीन खैरमोडे यांना मारहाण करणाऱ्या आरोपींच्या सुटकेसाठी राम कदमांनी केला फोन!

Last Updated : Jan 12, 2021, 4:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.