ETV Bharat / state

Raj Thackeray : 'उद्धव ठाकरेंवर एकतरी गुन्हा दाखल आहे का?'; नक्कल करत राज ठाकरेंचा सवाल

उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना राज ठाकरे म्हणाले की, मुख्यमंत्रीपद भूषवताना आज घरी बसलेले लोक आजारपणाचे कारण देत फिरू लागले आहेत. एकनाथ शिंदे यांनी जादूची काठी फिरवली आणि आता ते घराबाहेर पडले आहेत. उद्धव ठाकरे पैशासाठी कोणाशीही संबंध ठेवतात. फक्त पैसा येत राहिला पाहिजे हा त्यांचा उद्देश असतो. त्यांच्या अंगावर एकतरी केस आहे का?" असा सवाल राज ठाकरे ( Raj Thackeray critics on Uddhav Thackeray ) यांनी केला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 27, 2022, 9:46 PM IST

Updated : Nov 27, 2022, 10:56 PM IST

मुंबई : एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) गटात शिवसेनेला मान्यता मिळणार, ही त्यांची आपसी भांडणे आहेत. आगामी बीएमसी निवडणुकीबाबतही त्यांनी चर्चा केली. टोलनाक्यांवरील मनसेच्या राजकारणाचाही उल्लेख केला आणि त्यामुळेच टोलनाके बंद झाले. सोबतच राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांची नक्कल करत त्यांच्या अंगावर एकतरी केस आहे का? असा सवाल विचारला आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गटाध्यक्षांच्या मेळाव्याला राज ठाकरे ( Raj Thackeray ) यांनी आज मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गटाध्यक्षांच्या मेळाव्याला राज ठाकरे यांनी आज मुंबईत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

उद्धव ठाकरेंना टोला - उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल करताना ते म्हणाले ( Raj Thackeray on Uddhav Thackeray ) की, मुख्यमंत्रीपद भूषवताना आज घरी बसलेले लोक आजारपणाचे कारण देत फिरू लागले आहेत. एकनाथ शिंदे यांनी जादूची काठी फिरवली आणि आता ते घराबाहेर पडले आहेत. उद्धव ठाकरे पैशासाठी कोणाशीही संबंध ठेवतात. फक्त पैसा येत राहिला पाहिजे हा त्यांचा उद्देश असतो. त्यांच्या अंगावर एकतरी केस आहे का?" असा सवाल राज ठाकरे यांनी ( Raj Thackeray critics on Uddhav Thackeray ) केला आहे.

निवडणुकीच्या तयारीला लागा - महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे म्हणाले की, 'आगामी बीएमसीच्या निवडणुका कोरोना महामारीमुळे पुढे गेल्या. आता फेब्रुवारी किंवा मार्चमध्ये बीएमसीच्या निवडणुका होऊ शकतात, पण निवडणुकीचे वातावरण मला दिसत नाही. एकनाथ शिंदे गट आणि उद्धव ठाकरे गटाबद्दल राज ठाकरे म्हणाले की, 'कोणत्या गटाला मान्यता मिळणार, ही गटबाजी की ती गटबाजी, ही त्यांची आपसी भांडणे आहेत. तुम्ही त्याकडे लक्ष न देता आगामी निवडणुकीच्या दृष्टीने तयारीला लागा आणि जनतेपर्यंत पोहोचा.'

17 वर्षांच्या आंदोलनावर पुस्तक काढणार - यावेळी राज ठाकरे आपल्या भाषणात म्हणाले की, 'तुम्हाला काही गोष्टी सांगणे आवश्यक आहे. गेल्या 16 ते 17 वर्षात ज्या मुद्द्यांवर आम्ही आंदोलने केली, त्यात आम्हाला इतर पक्षांच्या तुलनेत सर्वाधिक यश मिळाले. ते म्हणाले की, 'आमच्या आंदोलनाचे श्रेय आम्हाला मिळाले नाही, त्यामुळे काही डावपेच काम करत होते. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने 17 18 वर्षात जी काही आंदोलन केली आपल्या आंदोलनाला आलेले यश यावर लवकरच एक पुस्तिका काढण्यात येईल. ही पुस्तिका लवकरच तुमच्या सर्वांपर्यंत पोहोचवली जाईल. तुम्ही ती जनतेपर्यंत पोहोचवा."

मराठी तरुणांसाठी लढलो - राज ठाकरे पुढे म्हणाले की, आम्ही महाराष्ट्रातील जनतेसाठी काम केले. मराठी माणसाच्या रोजगारासाठी नेहमीच लढले. आमच्या लोकांनी बिहारमधून रेल्वे परीक्षा देण्यासाठी आलेल्या उमेदवारांशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्या बदल्यात आमच्या लोकांवर अत्याचार झाले. त्यानंतर आमचे कार्यकर्ते खवळले. राज ठाकरे हे उत्तर भारतीय विरोधी असल्याचे माध्यमांनी दाखवले. रेल्वेच्या आंदोलनामुळे हजारो मराठी लोकांना रेल्वेत नोकऱ्या मिळाल्या, प्रश्नपत्रिका मराठीत येऊ लागल्या.

हनुमान चालीसा वाजवा - मशिदीवर लावलेल्या लाऊडस्पीकरबाबत राज ठाकरे पुन्हा आक्रमक झाले आणि मशिदीतून काही लाऊडस्पीकर उतरले नाहीत तर ट्रक घेऊन हनुमान चालीसा वाजवा, असे कार्यकर्त्यांना सांगितले. मशिदीवर लावलेले लाऊडस्पीकर काढण्याची बाळासाहेब ठाकरेंची इच्छा आम्ही पूर्ण केली. त्यावेळी हिंदुत्ववादी कुठे होते? मनसेच्या आंदोलनामुळे मशिदीवरील लाऊडस्पीकर काढण्यात आले. राज ठाकरे म्हणाले की, मी तुम्हा सर्वांना सांगू इच्छितो की, जिथे जिथे तुम्हाला मशिदींवर बेकायदेशीरपणे लाऊडस्पीकर लावलेले दिसतात. पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करा. पोलिस तुमची तक्रार ऐकत नसतील तर पोलिस स्टेशनच्या बाहेर लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवा.

Last Updated : Nov 27, 2022, 10:56 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.