ETV Bharat / state

Raj Thackeray Birthday : वाढदिवसाच्या निमित्ताने राज ठाकरेंचे कार्यकर्यांत्यांना अवाहन, मिठाई ऐवजी शैक्षणिक भेटवस्तू देण्याची मागणी

author img

By

Published : Jun 14, 2023, 4:41 PM IST

राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण आहे. सर्वत्र त्यांचे होर्डिंग्ज दिसत आहेत. मात्र, राज ठाकरे यांनी वाढदिवसानिमित्ताने कार्यकर्त्यांना पुष्पगुच्छ, मिठाई, भेटवस्तू घेऊन न येण्याचे अवाहन केले आहे.

Raj Thackeray Birthday
Raj Thackeray Birthday

मुंबई : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज 14 जून रोजी वाढदिवस आहे. राज ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त मनसे कार्यकर्त्यांमध्ये जल्लोषाचे वातावरण असून सर्वत्र त्यांचे होर्डिंग्ज दिसत आहेत. राज ठाकरे हे 'राज' या नावाने प्रसिद्ध असले तरी त्यांचे खरे नाव 'स्वराज' ठाकरे आहे. त्यांचा जन्म 14 जून 1968 रोजी झाला होता. राज ठाकरे यांचे वडील श्रीकांत ठाकरे हे उत्तम संगीतकार, पत्रकार, व्यंगचित्रकार होते.

बाळासाहेबांचा वारसा : त्यामुळे साहजिकच राज ठाकरेंनाही हा वारसा मिळाला आहे. श्रीकांत ठाकरे यांचे बंधू शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे हे देखील उत्तम व्यंगचित्रकार होते. श्रीकांत ठाकरे, बाळासाहेब ठाकरे यांना वडील केशव ठाकरे यांच्याकडून वारसा मिळाला आहे. राज ठाकरे बाळासाहेब ठाकरे यांच्या सहवासात असल्याने राज ठाकरे यांच्यातील व्यंगचित्रे, राजकीय नेतृत्वगुण फुलले.

राज ठाकरेंचे आवाहन : 12 जून रोजी राज ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना, चाहत्यांना एक खास आवाहन ट्विटच्या माध्यमातून केले आहे. 'दरवर्षी 14 जून रोजी माझ्या वाढदिवशी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येने महाराष्ट्रातील कार्यकर्ते मला भेटायला येतात, मला शुभेच्छा देतात. तुमचे अभिवादन ही माझ्यासाठी सर्वात मोठी भेट आहे. काही कार्यकर्ते पुष्पगुच्छ, मिठाई, भेटवस्तू घेऊन येतात. मात्र, या वर्षापासून मी तुम्हाला नम्र विनंती करतो की, कृपया पुष्पगुच्छ, मिठाई किंवा कोणतीही भेटवस्तू आणू नका. त्याऐवजी, एखादे रोपटे किंवा शैक्षणिक साहित्या गिफ्ट' देण्याची विनंती राज ठाकरे यांनी केली आहे. तुम्ही दिलेली रोपटी आम्ही विविध संस्थांना वृक्ष लागवडीसाठी देऊ. तुम्ही जे काही शैक्षणिक साहित्य भेट म्हणून आणाल ते आम्ही गरजू विद्यार्थ्यांना भेट देऊ असे ठाकरे यांनी म्हटले आहे.

राज ठाकरेंच्या चाहत्याने काढला छातीवर टॅटू : राज ठाकरेंचा एक मोठा चाहता पुढे आला आहे. एका तरुणाने छातीवर राज ठाकरेंचा फोटो गोंदवला आहे. सोलापूर जिल्ह्यात राहणारा हा तरुण गेल्या अनेक वर्षांपासून राज ठाकरेंचा चाहता आहे. हा टॅटू मी माझ्या छातीवर काढल्याचे त्यांनी सांगितले. जेणेकरून राज ठाकरे कायम माझ्या हृदयात राहतील. या तरुणाचे नाव विशाल भणगे असे आहे. राज ठाकरे यांचे महाराष्ट्रातच नाही तर देशभरात चाहते आहेत. त्यांच्या राजकीय व्यक्तिमत्त्वाव्यतिरिक्त, व्यंगचित्रकार म्हणूनही त्यांचा मोठा चाहतावर्ग आहे. मात्र विशाल भणगे यांनी राज ठाकरेंची प्रतिमा गोंदवल्याने विशालची सगळीकडे चर्चा होत आहे.

वैयक्तिक जीवन : चित्रपटप्रेमी राज ठाकरे यांनी 32 वेळा गांधी चित्रपट पाहिला आहे. जे. जे. स्कूल ऑफ आर्टचे राज ठाकरे माजी विद्यार्थी आहेत. राज ठाकरे सकाळी कॉलेजला जायचे, नंतर मित्रांसोबत सिनेमाला जायचे. तेव्हा राज ठाकरे म्हणाले की, गांधी हा चित्रपट ३२ वेळा पाहिला आहे. राज ठाकरे हे राजकीय नेते, वक्ते आणि व्यंगचित्रकार आहेत. राज ठाकरे यांनी लहानपणापासूनच राजकारणात प्रवेश केला आहे. मराठी सिनेमॅटोग्राफर आणि निर्माते-दिग्दर्शक मोहन वाघ यांची मुलगी शर्मिला वाघ यांच्याशी ठाकरे यांचे लग्न झाले आहे. या दाम्पत्याला एक मुलगा अमित ठाकरे आणि मुलगी उर्वशी ठाकरे अशी दोन मुले आहेत.

हेही वाचा - Maharashtra Politics: राज्यात रंगले पोस्टर वॉर; राज ठाकरे, आदित्य ठाकरे भावी मुख्यमंत्री म्हणून कार्यकर्त्यांकडून पोस्टरबाजी, राजकीय चर्चांना उधाण

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.