मुंबई - महाराष्ट्रात कोरोनाची दुसरी लाट आली असून वैद्यकीय यंत्रणेवर ताण येतो आहे. तसेच रुग्णांना खाटांची कमतरता भासू नयेत, म्हणून गेल्यावर्षी मध्य आणि पश्चिम रेल्वेने आयसोलेशल कोचची (डबे) निमिर्ती केली होती. मात्र, गेल्यावर्षी या आयसोलेशल कोचचा वापर झालेला नव्हता. मात्र, यंदा परिस्थिती निर्माण झाल्यास रेल्वेच्या आयसोलेशल कोच वापर होऊ शकतो. सध्याच्या परिस्थितीत पश्चिम रेल्वेकडे मुंबई विभागात 128 आयसोलेशन कक्ष आहेत. तर, मध्य रेल्वेकडे 48 आयसोलेशन कोच असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
महाराष्ट्रात आयसोलेशन कोचचा वापर नाही
कोरोना विषाणूच्या मुकाबला करण्यासाठी आणि कोरोनाबाधित रुग्णांकरिता भारतीय रेल्वेने मेल-एक्सप्रेसच्या पाच हजार प्रवासी डब्याचे आयसोलेशन कोचेसमध्ये रूपांतर केले होते. रेल्वेच्या आयसोलेशन कोचच्या वापर अनेक राज्यांनीही केला होता. मात्र, महाराष्ट्रात या डब्याचा वापर करण्यात आलेला नव्हता. या पाच हजार आयसोलेशन कोचपैकी संपूर्ण मध्य रेल्वेवर 482 आणि पश्चिम रेल्वेवर 410 आयसोलेशन कोच तयार करण्यात आले. मात्र, यावेळी राज्य सरकारकडून आयसोलेशन कक्षाची मागणी न केल्याने कोच पडून होते. दरम्यान मध्य रेल्वे प्रशासनाला श्रमिक विशेष रेल्वे, इतर मेल, एक्स्प्रेससाठी कोच कमी पडू लागले. त्यामुळे रेल्वे मंडळाच्या सुचनेनुसार श्रमिक विशेष रेल्वे वाढविण्यासाठी आयसोलेशन कक्षाचे रुपांतर पुन्हा नियमित प्रवासी डब्यात केले.
मागणी केल्यास आयसोलेशन कोच देऊ
मध्य रेल्वे विभागाने 482 आयसोलेशन कोच तयार केले होते. मात्र, मध्य रेल्वेचे त्यापैकी 434 आयसोलेशन कोचचा पुर्नवापर मेल, एक्स्प्रेससाठी करण्यात आला. रेल्वे मंडळाच्या परवानगीने आणि राज्य सरकारच्या एकमताने आयसोलेशन रूपांतर करण्यात आले. सध्या मध्य रेल्वेच्या सर्व विभागामध्ये 482 आयसोलेशन कोचपैकी फक्त 48 आयसोलेशन कोच तयार आहेत. पश्चिम रेल्वेचे महाव्यवस्थापक आलोक कंसल यांनी सांगितले की, मुंबई विभागात 128 आयसोलेशन कोच तयार आहेत. एका डब्यात 24 खाटा आहेत. कोरोनाची प्राथमिक लक्षणे असलेल्यांसाठी या खाट्याची मदत होणार आहे. राज्य सरकारने आयसोलेशन कोचची मागणी केल्यावर त्यांना धुवून, सॅनिटाइझ करून वापरण्यासाठी देण्यात येतील.
रेल्वे प्रशासन अलर्ट मोडमध्ये
मुंबईसह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण संख्या वाढत आहेत. रुग्णालयात लागणाऱ्या साहित्य आणि उपकरणाची तुटवडा भासू नये, यासाठी रेल्वे प्रशासन सतर्क आहे. गेल्यावर्षी मध्य रेल्वेच्या परळ वर्कशॉपने अत्यंत अल्पशा कालावधीत 50 ऑक्सिजन सिलिंडर ट्रॉली विकसित केली आहेत. या ऑक्सिजन सिलिंडर ट्रॉली भायखळ्याच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मेमोरियल रुग्णालयाला देण्यात आलेल्या आहेत. तसेच कोरोना रुग्णाला खाटांची कमतरता भासू नयेत म्हणून रेल्वेने आयसोलेशन कोचची निर्मिती केली होती. तशीच आता परिस्थिती निर्माण होत असून मध्य आणि पश्चिम रेल्वे मदत करण्यास अलर्ट आहेत.
हेही वाचा - राज्यात 63 हजार 294 नव्या कोरोनाग्रस्तांची वाढ, 349 मृत्यू