ETV Bharat / state

Railway Megablock in Mumbai : रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; प्रवाशांचे होणार हाल - Railway Megablock on western line 16 january

मुंबई उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामेसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी १६ जानेवारी २०२२रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. ( Megablock on Western and Central Railway ) मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११. ०५ ते दुपारी ४. ०५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉग कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या जलद गाड्या माटुंगा येथून डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे.

Megablocks on all three railway lines on Sunday
रविवारी तिन्ही रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक
author img

By

Published : Jan 14, 2022, 10:35 PM IST

मुंबई - उपनगरीय रेल्वे मार्गावर रेल्वे रुळांची दुरुस्ती आणि तांत्रिक कामेसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे मार्गावर रविवारी १६ जानेवारी २०२२रोजी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहेत. ( Megablock on Western and Central Railway ) मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर तर हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी/ वांद्रे अप आणि डाऊन मार्गावर आणि पश्चिम रेल्वेच्या सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे.

मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक -

मध्य रेल्वेच्या माटुंगा ते मुलुंड अप आणि डाऊन जलद मार्गावर सकाळी ११. ०५ ते दुपारी ४. ०५ पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या ब्लॉग कालावधीत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटणाऱ्या जलद गाड्या माटुंगा येथून डाउन धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे. या सेवा माटुंगा आणि मुलुंड दरम्यानच्या स्थानकांवर त्यांच्यासंबंधित थांब्यांनुसार थांबतील. ठाण्यापासून या गाड्या पुन्हा जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. या गाड्या नियोजित वेळेपेक्षा १५ मिनिटे उशिराने धावणार आहेत. सकाळी १०. ४६ ते दुपारी ३. २६ पर्यंत ठाण्याहून सुटणाऱ्या अप जलद सेवा मुलुंड येथे अप धिम्या मार्गावर वळवण्यात येतील आणि मुलुंड आणि माटुंगा दरम्यान स्थानकांवर थांबतील. त्या पुढे माटुंगा येथे अप जलद मार्गावर वळविण्यात येतील. या गाड्या निर्धारित वेळेच्या १५ मिनिटे उशिरा धावणार आहेत.

हार्बर मार्गावर मेगाब्लॉक -

हार्बर रेल्वे मार्गावर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-चुनाभट्टी/वांद्रे डाउन हार्बर मार्गावर सकाळी ११.४० ते सायंकाळी ४.४० पर्यंत आणि चुनाभट्टी/वांद्रे-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस अप हार्बर मार्गावर सकाळी ११.१० ते सायंकाळी ४.१० पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी ११.१६ ते सायंकाळी ४.४७ पर्यंत वाशी/बेलापूर/पनवेल करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी १०.४८ ते सायंकाळी ४.४३ वाजेपर्यंत वांद्रे/गोरेगाव करीता सुटणाऱ्या डाउन हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.पनवेल/बेलापूर/वाशी येथून सकाळी ९.५३ ते दुपारी ३.२० पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा आणि गोरेगाव/वांद्रे येथून सकाळी १०.४५ ते सायंकाळी ५.१३ पर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनससाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा बंद राहतील.

हेही वाचा - Shivsena Mla Dilip Lande : शिवसेना आमदार दिलीप लांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

पश्चिम रेल्वे मार्गवर मेगाब्लॉक -

पश्चिम रेल्वे मार्गांवरील रेल्वे रुळ दुरस्तीसाठी आणि ओव्हरहेड वॉयरचा देखभालीसाठी रविवारी सांताक्रूझ ते गोरेगाव अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी सकाळी १० ते सायंकाळी ३ वाजेपर्यत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या पाच तासांच्या ब्लॉक कालावधीत सांताक्रूझ ते गोरेगाव जलद मार्गावरील सेवा धिम्या मार्गावर वळविण्यात येतील. तर, काही लोकल रद्द केल्या जाणार आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.