मुंबई: महाराष्ट्राला विकणाऱ्या लोकांसमोर महाराष्ट्र कधीही चुकणार नाही. मुंबईतल्या काही ठिकाणी आयकर विभागाच्या धाडी (Income tax department raids) पडल्या आहेत. यामध्ये राहुल कनाल या नावाच्या व्यक्तीच्या घरी देखील धाडी पडल्या. मुंबईत केवळ एका जागीच हुक्का पार्लर चालतो. तो पार्लर राहुल कनाल याचा आहे. मुंबई महानगरपालिकेचे अनेक कॉन्ट्रॅक्ट राहुल कनाल या व्यक्तीलाच मिळतात. यामागे नेमकं कारण काय?
मुंबईत चार ते पाच हॉटेल राहुल कनाल यांच्या मालकीच्या आहेत. त्यांचे वडील दंतचिकित्सक आहेत. असे असताना त्याने ही माया कशी जमवली? त्यांचे कोणत्या राजकीय व्यक्तींसोबत संबंध आहेत याचा खुलासा झाला पाहिजे. राहुल कनाल याच्यावरच आयकर विभागाने धाड का टाकली?असा प्रश्न भाजपचे आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) यानी उपस्थित केला आहे.
मुंबईतील नाईट लाईफ गैगचा राहुल कनाल सदस्य आहे. असे सांगत त्यांनी पर्यावरण मंत्री अदित्य ठाकरे (Environment Minister Aditya Thackeray) यांना नाव न घेता टोला लगवला. केंद्रीय तपास यंत्रणेच्या महाराष्ट्रामध्ये पडणाऱ्या धाडी म्हणजे महाराष्ट्रावर होणारे दिल्लीचे हे आक्रमण आहे. महाराष्ट्र दिल्ली समोर कधीही झुकणार नाही असा इशारा पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी दिला होता. त्यांच्या या वक्तव्याचा समाचार आमदार नितेश राणेंनी घेतला.
दिशा सलियान आणि अभिनता सुशांतसिंग राजपूत यांच्या प्रकरणात देखील राहुल कनाल यांची चौकशी झाली पाहिजे. राहुल यांचे सीडीआर तपास यंत्रनने तपासल्यास नक्कीच या प्रकरणात देखील राहुल यांचे धागे-दोरे सापडतील असे नितेश राणे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना स्पष्ट केले.