ETV Bharat / state

मांडवली करून यु-टर्न घ्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही - विखे पाटील - बहिष्कार

विखे म्हणाले, की मांडवली करून यु टर्न घ्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही. त्यामुळे मुंबई आराखड्याबाबतच्या मुद्द्यांवर आम्ही काम करू आणि लवकरच यावर जनहित याचिकाही दाखल करू.

राधाकृष्ण विखे पाटील
author img

By

Published : Feb 24, 2019, 11:26 PM IST

मुंबई - मांडवली करून यु-टर्न घ्यायला मी उद्धव ठाकरे नाही, अशी घणाघाती टीका विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली आहे. ते विरोधी पक्षांनी मुंबईत आयोजित केलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी त्यांनी सरकारच्या चहापानाच्या कार्यक्रमावर बहिष्कार घातल्याचेही सांगितले.

संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना विखे पाटील

विखे म्हणाले, की मांडवली करून यु टर्न घ्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही. त्यामुळे मुंबई आराखड्याबाबतच्या मुद्द्यांवर आम्ही काम करू आणि लवकरच यावर जनहित याचिकाही दाखल करू. नगरविकासाचे अनेक मुद्दे एकमेकांवर अवलंबून आहे, त्यामुळे त्याची माहिती मिळणे कठिण होते. ही माहिती मिळण्यासाठी दिड महिना लागला असून आता पुरेशी माहिती मिळाली आहे. त्यामुळे पुढील आठवड्यात याबाबत याचिका दाखल केली जाईल.
भाजप-शिवसेनेच्या युतीवर बोलताना विखे म्हणाले, की या युतीतून दोन्ही पक्ष किती ढोंगी आहेत हे सिद्ध झाले आहे. ते त्यांची युती भगव्या विचाराची युती असल्याचे सांगतात, मात्र ही फसवी युती आहे. ज्यांना शिवसेना अफजल खान म्हणाली, त्यांनाच उद्धव ठाकरेंनी मिठी मारली. युती करताना भाजप शिवसेनेच्या नेत्यांना पत्रकारांच्या प्रश्नांना सामोरे जाण्याचीही हिंमत नव्हती. पत्रकारांना उत्तर देण्याचे त्यांच्यात धारिष्ट नसेल, तर उद्या महाराष्ट्राच्या जनतेला ते काय उत्तर देणार? असाही प्रश्न त्यांनी यावेळी उपस्थित केला.

'सावंत यांनी कुपोषणावर काम करण्याऐवजी कादंबरी लिहिण्यातच धन्यता मानली'

राज्यातील कुपोषणाच्या प्रश्नावर बोलताना विखे म्हणाले, की या सरकारच्या काळात बालमृत्यूचे प्रमाण वाढले. राज्यपालांनी याची दखल घेत टास्क फोर्सची स्थापना केली होती. त्याचे अध्यक्ष दिपक सावंत आहेत. त्यांनी यावर काम केले असते, तर यावर काही उपाययोजना करून संबंधितांना त्याचा लाभा झाला असता. मात्र, सावंत यांनी कुपोषणावर काम करण्याऐवजी कादंबरी लिहिण्यातच धन्यता मानली.

undefined

Intro:Body:

मांडवली करून यु-टर्न घ्यायला मी काही उद्धव ठाकरे नाही - राधाकृष्ण विखे पाटील

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.