ETV Bharat / state

MNS Beating Hotel Manager : पंजाबी हॉटेलमध्ये मराठी गाणी लावण्यास नकार; मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप - MNS City President Gajanan Kale

टेस्ट ऑफ पंजाब हॉटेलमध्ये ( Taste of Punjab Hotel ) मराठी गाणे वाजण्याचा नकार देण्याऱ्या हाॅटेल व्यावस्थपकाला मनसे कार्यकर्त्यांनी चोप ( Beating Hotel Manager ) दिला. याप्रकरणी हॉटेल मालकाने मनसेची माफी मागितली आहे. सध्या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By

Published : Nov 24, 2022, 7:03 PM IST

Updated : Nov 24, 2022, 9:22 PM IST

नवी मुंबई - वाशी मधील टेस्ट ऑफ पंजाब हॉटेलमध्ये ( Taste of Punjab Hotel ) IT कंपनीतील टीमने पार्टीचे आयोजन केले होते. या पार्टी दरम्यान इतर भाषेतील गाण्यांवर नाचताना ग्राहकांनी मराठी गाणी वाजवण्याची विनंती ( Request to play Marathi song in Test Punjab Hotel ) केली. मात्र हॉटेल व्यवस्थापकाडून मराठी सोडून सर्व गाणी लावली जातील असे सांगून मराठी गाणी लावण्यास नकार देण्यात आला. याबाबतचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान, या व्हिडिओची पृष्टी ईटीव्ही भारत करत नाही.

पंजाबी हॉटेलमध्ये मराठी गाणी लावण्यास नकार; मनसे कार्यकर्त्यांनी दिला चोप

हॉटेल व्यवस्थापकाच्या कानशिलात लगावली - पार्टीत सामील IT कंपनीतील आयोजकांनी ही बाब स्थानिक मनसे कार्यकर्त्यांच्या लक्षात आणून दिली. स्थानिक मनसे कार्यकर्त्यांनी हॉटेलमध्ये येऊन जाब विचारला असता हॉटेल व्यवस्थापकांनी मराठी गाणी लावण्यास नकार दिला. यावर संतापलेल्या संतापलेल्या मनसे कार्यकर्त्यांनी हॉटेल व्यवस्थापकाच्या कानशिलात ( Beating the hotel manager ) लगावली. या खळ्ळखट्याक नंतर हॉटेल प्रशासनाचे डोळे उघडले. टेस्ट ऑफ पंजाब या हॉटेलचे मालक प्रदीप अर्जुन शिंदे यांनी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे ( MNS City President Gajanan Kale ) यांना पत्र लिहून दिलगिरी व्यक्त केली. तसेच इथून पुढे मराठी गाणी जरूर लावू असे आश्वासनही दिले.

letter from Pradeep Arjun
प्रदीप अर्जुन यांचे पत्र

मनसेने केली मारहाण - व्हिडिओ क्लिपमध्ये काही महिला हॉटेल कर्मचाऱ्यांना मराठी गाणे वाजवण्यास सांगत असल्याचे दिसून येते. दरम्यान, शेजारी उभ्या असलेल्या मनसे कार्यकर्त्याने सांगितले की, "आम्ही महाराष्ट्रात आहोत आणि इथे फक्त मराठी गाणी वाजवली जातील." मॅनेजरने त्यांची मागणी नाकारताच मनसे कार्यकर्त्याने त्यांना चापट मारली.

Last Updated : Nov 24, 2022, 9:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.