ETV Bharat / state

विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकांचाही विकास व्हायला हवा - प्रिया दत्त - priyanka gandhi

विमानतळ ज्याप्रमाणे स्वच्छ चकचकीत आणि सर्व सुविधायुक्त असतात, त्याच पद्धतीने मुंबईतील लोकलचेही सर्व रेल्वे स्थानकं असायला हवेत, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी गरज पडल्यास खासगी क्षेत्राशी सामंजस्य करार करून रेल्वे स्थानकांचा विकास विमानतळाच्या धर्तीवर करण्यात यावा. महिलांसाठी उत्तम दर्जाचे शौचालय प्रत्येक रेल्वे स्थानकावर असायला हवीत, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकांचाही विकास व्हायला हवा - प्रिया दत्त
author img

By

Published : Apr 5, 2019, 11:53 PM IST

मुंबई - रेल्वे अर्थसंकल्पाची प्रथा बंद केल्यापासून मुंबईतीलच नव्हे तर, देशभरातील लोकांचे रेल्वेविषयक प्रश्न मांडण्याची हक्काची संधी आणि व्यासपीठ केंद्र सरकारने हिरावून घेतले आहे. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आल्यास पुन्हा एकदा रेल्वे अर्थसंकल्पाची पद्धत सुरू करण्याची मागणी लावून धरू, अशी भूमिका मुंबई उत्तर-मध्य लोकसभा काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी मांडली आहे. विमानतळाच्या धर्तीवर मुंबईतील लोकल रेल्वेस्थानकांचा विकास व्हायला हवा, अशी मागणीही त्यांनी यावेळी केली. ईटीव्ही भारत समूहाचे मुंबई ब्युरो चीफ प्रमोद चुंचूवार यांच्यासोबत केलेल्या एका खास चर्चेत त्यांनी मुंबईचे प्रश्न आणि राष्ट्रीय समस्या यांवर आपले मत व्यक्त केले.

मुंबईतून दोन नेत्यांना रेल्वे मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर लोकलने प्रवास करणाऱ्या लोकांचे प्रश्न प्राधान्याने सुटतील, अशी अपेक्षा होती. मात्र, या दोन्ही मंत्र्यांनी आणि मोदी सरकारने या आघाडीवर निराशाच केली, अशी टीका प्रिया दत्त यांनी केली आहे. विमानतळ ज्याप्रमाणे स्वच्छ चकचकीत आणि सर्व सुविधांनी युक्त असतात, त्याच पद्धतीने मुंबईतील लोकलचेही सर्व रेल्वे स्थानके असायला हवीत, अशी मागणी त्यांनी केली. यासाठी गरज पडल्यास खासगी क्षेत्राशी सामंजस्य करार करून रेल्वे स्थानकांचा विकास विमानतळाच्या धर्तीवर करण्यात यावा. महिलांसाठी उत्तम दर्जाचे शौचालय प्रत्येक रेल्वे स्थानकावर असायला हवीत, असेही त्या यावेळी म्हणाल्या.

केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य असेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. महिलांबद्दल राज्य सरकार संवेदनशील नसून राज्यातील भाजप-शिवसेनेचे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यासाठी जबाबदार असल्याची टीकाही प्रिया दत्त यांनी यावेळी केली.
प्रिया दत्त उत्तर-मध्य या मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या विरुद्ध त्यांची लढत आहेत. त्यानी २००५ ते २०१४ या काळात दोनदा लोकसभेत मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. या लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच आमदार विरोधी पक्षांचे आहेत. त्यामुळे पूनम महाजन यांच्या विरुद्ध निवडून येण्याची कितपत खात्री वाटते? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. यावर 'आपण कोणतीही निवडणूक एक आव्हान म्हणूनच लढवतो. कोणतीही निवडणूक सोपी नसते, यावर माझा पूर्ण विश्वास आहे', अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
'पूनम महाजन यांचे दोष दाखवून किंवा त्यांनी काय केलं नाही, हे सांगून मत मागणार नाही. तर, काँग्रेस सत्तेत आल्यावर काय करणार, हे सांगून मते मागणार आहोत, अशी स्पष्टोक्तीही त्यांनी केली.

विमानतळाप्रमाणे रेल्वे स्थानकांचाही विकास व्हायला हवा - प्रिया दत्त

'दहशतीचं राजकारण संपणं गरजेचं'

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर देशात दडपशाही आणि दहशतीचे वातावरण आहे. द्वेषाचे राजकारण केले जात आहे. खोट्या आकडेवारी देऊन विकासाचे चित्र रंगवले जात आहे. देशातील लोकशाही संकटात सापडली असताना राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे. तसेच, मोदी सरकारला पराभूत करायला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

प्रिया दत्त यांनी काही महिन्यांपूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी भावना व्यक्त केली होती. संजय निरुपम यांच्यावर त्या नाराज असल्याने अप्रत्यक्ष इशारा त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला होता. यावर बोलताना त्या म्हणाल्या, की 'संजय निरुपम यांच्या बद्दल आपण नाराज नव्हतो. उलट २०१४ च्या निकालात मुंबई काँग्रेसचा सर्वत्र पराभव झाल्यानंतर काँग्रेसला जिवंत ठेवण्याचं काम संजय निरुपम यांनीच केलं', अशी तोंडभरून प्रशंसा त्यांनी केली. दत्त फाउंडेशनच्या वतीने आपण देशभर समाजकार्य करीत होतो आणि तेच कार्य करावं, अशी इच्छा असल्याने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा मनोदय व्यक्त केला होता.
देशाची लोकशाही संकटात सापडली असताना राहुल गांधी ज्या हिमतीने मैदानात उतरले आहेत आणि प्रियंका गांधी त्यांना ज्या पद्धतीने साथ देत आहेत, हे बघूनच आपणही या लढाईत मागे राहू नये. अशा वेळेला लढणे, ही आपली जबाबदारी आहे, असे वाटले म्हणूनच आपण निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला, असा दावाही त्यांनी यावेळी केला.

Intro:विमानतळाप्रमाणे रेल्वे स्टेशन्सचा विकास व्हायला हवा-- काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांची भूमिका

रेल्वे बजेट बंद झाल्याने खासदारांना लढण्याचे हक्काचे व्यासपीठ गमावले-- प्रिया दत्त यांची टीका
ईटीव्ही भारत सह केली खास चर्चा

मुंबई-- रेल्वे अर्थसंकल्पाची प्रथा बंद केल्यापासून मुंबईतीलच नव्हे तर देशभरातील लोकांचे रेल्वेविषयक प्रश्न मांडण्याची हक्काची संधी आणि व्यासपीठ केंद्र सरकारने हिरावून घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आली तर पुन्हा एकदा रेल्वे अर्थसंकल्पाची पद्धत सुरू करण्याची मागणी लावून धरू, अशी भूमिका मुंबई उत्तर-मध्य लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी मांडली आहे. विमानतळाच्या धर्तीवर मुंबईतील लोकल रेल्वेस्थानकांचा विकास व्हायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ईटीव्ही भारत समूहाचे मुंबई ब्युरो चीफ प्रमोद चुंचूवार यांच्यासोबत केलेल्या एका खास चर्चेत त्यांनी मुंबईचे प्रश्न आणि राष्ट्रीय समस्या यांच्यावर आपली पमते व्यक्त केली.

मुंबईतून दोन नेत्यांना रेल्वे मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर लोकलनी प्रवास करणाऱ्या लोकांचे प्रश्न प्राधान्याने सुटतील अशी अपेक्षा होती मात्र या दोन्ही मंत्र्यांनी आणि मोदी सरकारने या आघाडीवर निराशाच केली अशी टीका प्रिया दत्त यांनी केली आहे. विमानतळ ज्याप्रमाणे स्वच्छ चकचकीत आणि सर्व सुविधायुक्त असतात तशाच पद्धतीने मुंबईतील लोकलचे सर्व रेल्वे स्टेशन्स असायला हवेत अशी मागणी त्यांनी केली. यासाठी गरज पडल्यास खासगी क्षेत्राशी सामंजस्य करार करून रेल्वे स्टेशनचा विकास विमानतळाच्या धर्तीवर करण्यात यावा आणि महिलांसाठी उत्तम दर्जाचे शौचालय प्रत्येक रेल्वे स्टेशनवर असायला हवीत अशी मागणी त्यांनी केली
केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांची सुरक्षितता याला प्रथम प्राधान्य असेल अशी अशी ग्वाही त्यांनी दिली जगातील महिलांसाठीच्या सर्वात असुरक्षित शहरांमध्ये मुंबई वरच्या क्रमांकावर असल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. महिलांबद्दल राज्य सरकार संवेदनशील नसून राज्यातील भाजप शिवसेनेचे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांसाठी जबाबदार असल्याची टीका प्रिया दत्त यांनी यावेळेस केली. उत्तर मध्य या मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या विरुद्ध दत्त लढत आहेत. त्यानी 2005 ते 2014 या काळात दोनदा लोकसभेत मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. या लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच आमदार विरोधी पक्षांचे आहेत त्यामुळे पूनम महाजन यांच्या विरुद्ध निवडून येण्याची कितपत खात्री वाटते असे विचारता आपण कोणतीही निवडणूक एक आव्हान म्हणूनच लढवतो आणि कोणतीही निवडणूक सोपी नसते यावर माझा पूर्ण विश्वास आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आपण पूनम महाजन यांचे दोष दाखवून किंवा त्यांनी काय केलं नाही हे सांगून मत मागणार नसून काँग्रेस सत्तेत आल्यास काय करणार हे सांगून मते मागणार आहोत अशी स्पष्टोक्ती ही त्यांनी केली.आपण दहा वर्षे खासदार असताना ही कामे केली गरीब वस्त्या आणि मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गाची टोलेजंग इमारती या दोन्ही परिसरात विकासाचे संतुलन आम्ही साध्य केले मी केलेली विकास कामे सांगूनच मत मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'दहशतीचे राजकारण संपणे गरजेचं'

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर देशात दडपशाही आणि दहशतीचे भीतीचे वातावरण आहे. द्वेषाचे राजकारण केले जात आहे. खोट्या आकडेवारी देऊन विकासाचे चित्र रंगवले जात आहे. देशातील लोकशाही संकटात सापडली असताना राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे आणि मोदी सरकारला पराभूत करायला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रिया दत्त यांनी काही महिन्यांपूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी भावना व्यक्त केली होती. संजय निरुपम यांच्या विरुद्ध त्या नाराज असल्याने अप्रत्यक्ष इशारा त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला होता असेही तेव्हा बोलले जात होते या संदर्भात छेडले असता त्यांनी संजय निरुपम यांच्या बद्दल आपण नाराज नव्हतो असा दावा केला उलट 2014च्या निकालात मुंबई काँग्रेसचा सर्वत्र पपराभव झाल्यानंतर काँग्रेसला जिवंत ठेवण्याचं काम संजय निरुपम यांनीच केले अशी तोंडभरून प्रशंसा ही त्यांनी केली दत्त फाउंडेशन च्या वतीने आपण देशभर समाजकार्य करीत होतो आणि तेच कार्य करावं अशी इच्छा असल्याने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र देशाची लोकशाही संकटात सापडली असताना राहुल गांधी ज्या हिमतीने मैदानात उतरले आहेत आणि प्रियंका गांधी त्यांना ज्या पद्धतीने साथ देत आहेत हे बघून आपणही या लढाईत मागे राहू नये, अशा वेळेला लढणे ही आपली जबाबदारी आहे असे वाटले म्हणूनच आपण निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असा दावाही त्यांनी केला. Body:विमानतळाप्रमाणे रेल्वे स्टेशन्सचा विकास व्हायला हवा-- काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांची भूमिका

रेल्वे बजेट बंद झाल्याने खासदारांना लढण्याचे हक्काचे व्यासपीठ गमावले-- प्रिया दत्त यांची टीका
ईटीव्ही भारत सह केली खास चर्चा

मुंबई-- रेल्वे अर्थसंकल्पाची प्रथा बंद केल्यापासून मुंबईतीलच नव्हे तर देशभरातील लोकांचे रेल्वेविषयक प्रश्न मांडण्याची हक्काची संधी आणि व्यासपीठ केंद्र सरकारने हिरावून घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आली तर पुन्हा एकदा रेल्वे अर्थसंकल्पाची पद्धत सुरू करण्याची मागणी लावून धरू, अशी भूमिका मुंबई उत्तर-मध्य लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी मांडली आहे. विमानतळाच्या धर्तीवर मुंबईतील लोकल रेल्वेस्थानकांचा विकास व्हायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ईटीव्ही भारत समूहाचे मुंबई ब्युरो चीफ प्रमोद चुंचूवार यांच्यासोबत केलेल्या एका खास चर्चेत त्यांनी मुंबईचे प्रश्न आणि राष्ट्रीय समस्या यांच्यावर आपली पमते व्यक्त केली.

मुंबईतून दोन नेत्यांना रेल्वे मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर लोकलनी प्रवास करणाऱ्या लोकांचे प्रश्न प्राधान्याने सुटतील अशी अपेक्षा होती मात्र या दोन्ही मंत्र्यांनी आणि मोदी सरकारने या आघाडीवर निराशाच केली अशी टीका प्रिया दत्त यांनी केली आहे. विमानतळ ज्याप्रमाणे स्वच्छ चकचकीत आणि सर्व सुविधायुक्त असतात तशाच पद्धतीने मुंबईतील लोकलचे सर्व रेल्वे स्टेशन्स असायला हवेत अशी मागणी त्यांनी केली. यासाठी गरज पडल्यास खासगी क्षेत्राशी सामंजस्य करार करून रेल्वे स्टेशनचा विकास विमानतळाच्या धर्तीवर करण्यात यावा आणि महिलांसाठी उत्तम दर्जाचे शौचालय प्रत्येक रेल्वे स्टेशनवर असायला हवीत अशी मागणी त्यांनी केली
केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांची सुरक्षितता याला प्रथम प्राधान्य असेल अशी अशी ग्वाही त्यांनी दिली जगातील महिलांसाठीच्या सर्वात असुरक्षित शहरांमध्ये मुंबई वरच्या क्रमांकावर असल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. महिलांबद्दल राज्य सरकार संवेदनशील नसून राज्यातील भाजप शिवसेनेचे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांसाठी जबाबदार असल्याची टीका प्रिया दत्त यांनी यावेळेस केली. उत्तर मध्य या मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या विरुद्ध दत्त लढत आहेत. त्यानी 2005 ते 2014 या काळात दोनदा लोकसभेत मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. या लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच आमदार विरोधी पक्षांचे आहेत त्यामुळे पूनम महाजन यांच्या विरुद्ध निवडून येण्याची कितपत खात्री वाटते असे विचारता आपण कोणतीही निवडणूक एक आव्हान म्हणूनच लढवतो आणि कोणतीही निवडणूक सोपी नसते यावर माझा पूर्ण विश्वास आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आपण पूनम महाजन यांचे दोष दाखवून किंवा त्यांनी काय केलं नाही हे सांगून मत मागणार नसून काँग्रेस सत्तेत आल्यास काय करणार हे सांगून मते मागणार आहोत अशी स्पष्टोक्ती ही त्यांनी केली.आपण दहा वर्षे खासदार असताना ही कामे केली गरीब वस्त्या आणि मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गाची टोलेजंग इमारती या दोन्ही परिसरात विकासाचे संतुलन आम्ही साध्य केले मी केलेली विकास कामे सांगूनच मत मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'दहशतीचे राजकारण संपणे गरजेचं'

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर देशात दडपशाही आणि दहशतीचे भीतीचे वातावरण आहे. द्वेषाचे राजकारण केले जात आहे. खोट्या आकडेवारी देऊन विकासाचे चित्र रंगवले जात आहे. देशातील लोकशाही संकटात सापडली असताना राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे आणि मोदी सरकारला पराभूत करायला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रिया दत्त यांनी काही महिन्यांपूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी भावना व्यक्त केली होती. संजय निरुपम यांच्या विरुद्ध त्या नाराज असल्याने अप्रत्यक्ष इशारा त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला होता असेही तेव्हा बोलले जात होते या संदर्भात छेडले असता त्यांनी संजय निरुपम यांच्या बद्दल आपण नाराज नव्हतो असा दावा केला उलट 2014च्या निकालात मुंबई काँग्रेसचा सर्वत्र पपराभव झाल्यानंतर काँग्रेसला जिवंत ठेवण्याचं काम संजय निरुपम यांनीच केले अशी तोंडभरून प्रशंसा ही त्यांनी केली दत्त फाउंडेशन च्या वतीने आपण देशभर समाजकार्य करीत होतो आणि तेच कार्य करावं अशी इच्छा असल्याने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र देशाची लोकशाही संकटात सापडली असताना राहुल गांधी ज्या हिमतीने मैदानात उतरले आहेत आणि प्रियंका गांधी त्यांना ज्या पद्धतीने साथ देत आहेत हे बघून आपणही या लढाईत मागे राहू नये, अशा वेळेला लढणे ही आपली जबाबदारी आहे असे वाटले म्हणूनच आपण निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असा दावाही त्यांनी केला. Conclusion:विमानतळाप्रमाणे रेल्वे स्टेशन्सचा विकास व्हायला हवा-- काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांची भूमिका

रेल्वे बजेट बंद झाल्याने खासदारांना लढण्याचे हक्काचे व्यासपीठ गमावले-- प्रिया दत्त यांची टीका
ईटीव्ही भारत सह केली खास चर्चा

मुंबई-- रेल्वे अर्थसंकल्पाची प्रथा बंद केल्यापासून मुंबईतीलच नव्हे तर देशभरातील लोकांचे रेल्वेविषयक प्रश्न मांडण्याची हक्काची संधी आणि व्यासपीठ केंद्र सरकारने हिरावून घेतली आहे. त्यामुळे काँग्रेस सत्तेत आली तर पुन्हा एकदा रेल्वे अर्थसंकल्पाची पद्धत सुरू करण्याची मागणी लावून धरू, अशी भूमिका मुंबई उत्तर-मध्य लोकसभेच्या काँग्रेसच्या उमेदवार प्रिया दत्त यांनी मांडली आहे. विमानतळाच्या धर्तीवर मुंबईतील लोकल रेल्वेस्थानकांचा विकास व्हायला हवा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.

ईटीव्ही भारत समूहाचे मुंबई ब्युरो चीफ प्रमोद चुंचूवार यांच्यासोबत केलेल्या एका खास चर्चेत त्यांनी मुंबईचे प्रश्न आणि राष्ट्रीय समस्या यांच्यावर आपली पमते व्यक्त केली.

मुंबईतून दोन नेत्यांना रेल्वे मंत्री पदाची जबाबदारी देण्यात आल्यानंतर लोकलनी प्रवास करणाऱ्या लोकांचे प्रश्न प्राधान्याने सुटतील अशी अपेक्षा होती मात्र या दोन्ही मंत्र्यांनी आणि मोदी सरकारने या आघाडीवर निराशाच केली अशी टीका प्रिया दत्त यांनी केली आहे. विमानतळ ज्याप्रमाणे स्वच्छ चकचकीत आणि सर्व सुविधायुक्त असतात तशाच पद्धतीने मुंबईतील लोकलचे सर्व रेल्वे स्टेशन्स असायला हवेत अशी मागणी त्यांनी केली. यासाठी गरज पडल्यास खासगी क्षेत्राशी सामंजस्य करार करून रेल्वे स्टेशनचा विकास विमानतळाच्या धर्तीवर करण्यात यावा आणि महिलांसाठी उत्तम दर्जाचे शौचालय प्रत्येक रेल्वे स्टेशनवर असायला हवीत अशी मागणी त्यांनी केली
केंद्रात काँग्रेसचे सरकार आल्यास महिलांची सुरक्षितता याला प्रथम प्राधान्य असेल अशी अशी ग्वाही त्यांनी दिली जगातील महिलांसाठीच्या सर्वात असुरक्षित शहरांमध्ये मुंबई वरच्या क्रमांकावर असल्याबद्दल त्यांनी दुःख व्यक्त केले. महिलांबद्दल राज्य सरकार संवेदनशील नसून राज्यातील भाजप शिवसेनेचे सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे यांसाठी जबाबदार असल्याची टीका प्रिया दत्त यांनी यावेळेस केली. उत्तर मध्य या मुंबई लोकसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवत आहेत. विद्यमान खासदार पूनम महाजन यांच्या विरुद्ध दत्त लढत आहेत. त्यानी 2005 ते 2014 या काळात दोनदा लोकसभेत मुंबईचे प्रतिनिधित्व केले आहे. या लोकसभा मतदारसंघातील सहा पैकी पाच आमदार विरोधी पक्षांचे आहेत त्यामुळे पूनम महाजन यांच्या विरुद्ध निवडून येण्याची कितपत खात्री वाटते असे विचारता आपण कोणतीही निवडणूक एक आव्हान म्हणूनच लढवतो आणि कोणतीही निवडणूक सोपी नसते यावर माझा पूर्ण विश्वास आहे अशी भावना त्यांनी व्यक्त केली आपण पूनम महाजन यांचे दोष दाखवून किंवा त्यांनी काय केलं नाही हे सांगून मत मागणार नसून काँग्रेस सत्तेत आल्यास काय करणार हे सांगून मते मागणार आहोत अशी स्पष्टोक्ती ही त्यांनी केली.आपण दहा वर्षे खासदार असताना ही कामे केली गरीब वस्त्या आणि मध्यमवर्ग आणि उच्च मध्यमवर्गाची टोलेजंग इमारती या दोन्ही परिसरात विकासाचे संतुलन आम्ही साध्य केले मी केलेली विकास कामे सांगूनच मत मागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
'दहशतीचे राजकारण संपणे गरजेचं'

केंद्रात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार आल्यानंतर देशात दडपशाही आणि दहशतीचे भीतीचे वातावरण आहे. द्वेषाचे राजकारण केले जात आहे. खोट्या आकडेवारी देऊन विकासाचे चित्र रंगवले जात आहे. देशातील लोकशाही संकटात सापडली असताना राजकारणाच्या पलीकडे जाऊन विचार केला पाहिजे आणि मोदी सरकारला पराभूत करायला पाहिजे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

प्रिया दत्त यांनी काही महिन्यांपूर्वी आपण लोकसभा निवडणूक लढवणार नाही, अशी भावना व्यक्त केली होती. संजय निरुपम यांच्या विरुद्ध त्या नाराज असल्याने अप्रत्यक्ष इशारा त्यांनी पक्षश्रेष्ठींना दिला होता असेही तेव्हा बोलले जात होते या संदर्भात छेडले असता त्यांनी संजय निरुपम यांच्या बद्दल आपण नाराज नव्हतो असा दावा केला उलट 2014च्या निकालात मुंबई काँग्रेसचा सर्वत्र पपराभव झाल्यानंतर काँग्रेसला जिवंत ठेवण्याचं काम संजय निरुपम यांनीच केले अशी तोंडभरून प्रशंसा ही त्यांनी केली दत्त फाउंडेशन च्या वतीने आपण देशभर समाजकार्य करीत होतो आणि तेच कार्य करावं अशी इच्छा असल्याने पुन्हा निवडणुकीच्या रिंगणात न उतरण्याचा मनोदय व्यक्त केला होता. मात्र देशाची लोकशाही संकटात सापडली असताना राहुल गांधी ज्या हिमतीने मैदानात उतरले आहेत आणि प्रियंका गांधी त्यांना ज्या पद्धतीने साथ देत आहेत हे बघून आपणही या लढाईत मागे राहू नये, अशा वेळेला लढणे ही आपली जबाबदारी आहे असे वाटले म्हणूनच आपण निवडणूक लढण्याचा निर्णय घेतला असा दावाही त्यांनी केला.
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.