ETV Bharat / state

शाळा सुरू होण्यापूर्वीच शुल्क भरण्याच्या तगाद्याने पालक हैरान; ऑनलाईन शिक्षणासाठी तारांबळ

author img

By

Published : Jun 7, 2020, 6:55 PM IST

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि राज्य शालेय शिक्षण विभागाने अद्यापही शैक्षणिक सत्राची सुरूवात १५ जूनपासून करण्यासाठी अंतिम निर्णय आणि त्यासाठीचा आदेशही जारी केलेला नाही. मात्र खासगी शाळांनी शाळा ऑनलाईन सुरू करण्याच्या नावाखाली पालकांना शुल्कांचा तगादा लावणे सुरू केले आहे.

Online education
शाळा सुरू होण्यापूर्वीच शुल्क तगाद्याने पालक हैरान; ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांची तारांबळ

मुंबई - राज्यातील प्रमुख महानगरात आणि ग्रामीण भागातही कोरोना व त्यानंतर निर्माण झालेली परिस्थिती आटोक्यात आलेली नाही. अशातच राज्यातील खासगी शाळांनी ऑनलाईन शिक्षण सुरू करत पालकांकडून शुल्कांचा तगादा सुरू केला आहे. यामुळे कोरोना आणि लॉकडाऊनने आर्थिक संकटात सापडलेल्या, शेकडो पालकांची तारांबळ उडाली आहे.

केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि राज्य शालेय शिक्षण विभागाने अद्यापही शैक्षणिक सत्राची सुरूवात १५ जूनपासून करण्यासाठी अंतिम निर्णय आणि त्यासाठीचा आदेशही जारी केलेला नाही. मात्र खासगी शाळांनी शाळा ऑनलाईन सुरू करण्याच्या नावाखाली पालकांना शुल्कांचा तगादा लावणे सुरू केले आहे.

कोरोना आणि त्यामुळे ओढवलेल्या आर्थिक संकटामुळे कोणत्याही खाजगी शाळांनी शुल्कवाढ करू नये, उलट त्यात कपात करावी अशा सूचना दिलेल्या असतानाच खासगी इंग्रजी माध्यमांच्या शाळांनी शैक्षणिक सत्राचे वेळापत्रक जारी करून पालकांकडून शुल्क वसूली सुरू केली आहे. अधिकचे शुल्क वसूल आकारू नये अशा प्रकारच्या सूचना शिक्षण विभागाने दिलेल्या आहेत, त्यामुळे एखाद्या पालकांकडून शुल्क वसुलीची सक्ती आणि अधिकचे शुल्क आकारणाऱ्या शाळांच्या विरोधात तक्रार आल्यास आम्ही कारवाई केली जाईल, अशी माहिती महापालिका शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.

ऑनलाईन शिक्षणासाठी पालकांवर भुर्दंड -

शुल्क वसुलीसाठी शिक्षण विभागाच्या आदेशापूर्वीच शाळा ऑनलाईन सुरू करणाऱ्या खासगी शाळांनी आपल्या शाळांतील प्रत्येक पालकांना ऑनलाईन शिक्षणाचे वेळापत्रक दिले आहेत. यासाठी विविध प्रकारचे नवीन शुल्क आकारले जात आहे. अनेक शाळांनी आपल्या शुल्कांमध्ये भरमसाठ वाढ केली असून त्याचा भुर्दंड पालकांना सोसावा लागणार असल्याच्या प्रतिक्रिया पालकांकडून व्यक्त केल्या जात आहेत.

मोबाईल कुठून आणायचा, पालकांपुढे प्रश्न -
सकाळ आणि दुपारच्या सत्रातील ऑनलाईन शिक्षणासाठी वेळा ठरवून देण्यात आल्या आहेत. सर्व अभ्यासक्रम हा मोबाईलवर शिकवण्यात येणार आहे. यात ज्यांच्याकडे मोबाईल आणि इतर यंत्रणा नाही, अशा विद्यार्थ्यांची मोठी अडचण होणार आहे, त्यामुळे आम्ही अशा काळात आता नवीन आणि चांगले मोबाईल मुलांसाठी कसे उपलब्ध करून देणार असा प्रश्न पालकांना पडला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.