मुंबई : कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल स्पष्ट झाला आहे. सत्ताधारी भाजपला सत्तेतून पाय उतार व्हावे लागत आहेत. कर्नाटकमध्ये काँग्रेस स्पष्ट बहुमताकडे वाटचाल करत आहे. त्यामुळे भाजप कर्नाटकातील पराभव सहजासहजी पचवणार नाही. काँग्रेस सहज बहुमताचा आकडा पार करेल अशी शक्यता आहे. असे पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे.
सावधान रहाणे फार महत्त्वाचे: या प्रसंगी बोलताना, पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, कर्नाटक मध्ये मी प्रचाराला गेलो होतो. त्यावेळी कांग्रेसला स्पष्ट बहुमत मिळेल हे पाहले होते. कर्नाटकात घोडेबाजार होण्याची शक्यता जास्त आहे. अगोदरचा इतिहास पाहता ते होण्याची शक्यता नाकारता येत नाही. यासाठी सावधान राहील पाहजे. आम्हाला या निवडणुकीत १२० ते १३० यामध्ये जागा भेटतील. व स्पष्ट बहुमत असल्याने आमची जमेची बाजू राहील. यापूर्वी सुद्धा कर्नाटक, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रात घोडेबाजार करुन सरकार खाली खेचल गेले आहे. त्या अनुषंगाने सावधान राहणेच फार महत्त्वाचे आहे.
प्रचारात ४०% कमिशनचा मुद्दा गाजला: कर्नाटकात तसेच महाराष्ट्रात पापातुन हे सरकार स्थापन केले गेले आहे. कर्नाटक मध्ये आमच्या पक्षाने मुख्यमंत्री पद आणि पदासाठी तर यादीच जाहीर केली होती.
कोणतीही काम करत असताना ४० टक्के मागणी कर्नाटकात केली जाते. हे संतोष पाटील या हिंदुत्ववादी संघटनेच्या युवा कार्यकर्त्यांने समोर आणले होते. यासाठी त्याने पंतप्रधानांना पत्र लिहून तक्रार केली होती. पण त्यावर काहीच झाले नाही. अखेर त्या युवकाने दुर्देवाने आत्महत्या केली. म्हणून संपुर्ण प्रचारात ४० टक्के कमिशनचा मुद्दा गाजला होता.
काँग्रेसने यातून धडा घ्यावा: इथे लिंगायत समाजाचा रोष होता. राहुल गांधी यांना गुजरातमध्ये जी शिक्षा दिली, त्याचा ही रोष मोठ्या प्रमाणात होता. कांग्रेसने यातुन काय धडा घेतला पाहिजे. तर बाहेरून आलेल्या नेत्यांना लगेच नेतृत्व देऊ नका, असेही चव्हाण म्हणाले आहेत. पंजाबमध्ये तो फटका बसला. कर्नाटक मध्ये सर्व नेत्यांना एकत्र ठेवण्यात आले. पंजाब आणि आसाममध्ये आमची ताकद असताना आम्हाला यश मिळाले नाही. तो प्रकार टाळला पाहिजे. बेरोजगाई आणि महागाई हे महत्त्वाचे मुद्दे आहेत.
जनतेला आमच्या योजना आवडल्या: आमच्या पाच गॅरंटी याला फायदा देणा-या होत्या. जनतेला २०० युनिट वीज माफ, महिलांना २ हजार रुपये भत्ता, त्याचप्रमाणे गरीब कुटुंबाला प्रति व्यक्तीला१० किलो मोफत धान्य, युवकांना ३ हजार व डिप्लोमा होणाऱ्या दीड हजार रुपये भत्ता, सरकारी बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास या सर्व बाबी निवडणुकीत घोषित केल्याने त्याचा फायदा आम्हाला झाला आहे.
ऑपरेशन लोटसची भीती आहे: जेडीएसला पाच टक्के घट पडलेली पाहायला मिळते. भाजप पाठिंबा देण्यासाठी घोडेबाजार करतात हे लोकांना आवडलेल नाही. देवेगौडा याच वय झालेल आहे, त्यामुळे त्यांचा फार प्रभाव राहिलेला नाही. बजरंग बली असा प्रचार करण्याचा त्यांनी प्रयत्न केला. महापुरुषांचा अवमान त्यांनी केला. पण लोकांनी त्याला भीक घातली नाही. बहूमत असताना ही धाकधुक आहे. कारण ऑपरेशन लोटस आहे. सहजासहजी भाजप हा पराभव सहन करणार नाही. त्यामुळे सावध राहील पाहिजे. सात निवडणुकामध्ये भाजप पेक्षा जास्त मते मिळाली आहेत. आम्ही जेडीएस सोबत सरकार ही बनवले होते मात्र, तीथे घोडेबाजार होऊन सरकार पाडल. मात्र कर्नाटक नेहमी कांग्रेस सोबत राहीलेले आहे, असेही चव्हाण म्हणाले.
हेही वाचा -
- Karnataka Election Result 2023 नागरिकांना बदल हवा आहे म्हणत काँग्रेस कार्यालयात जल्लोष सुरू भाजप जेडीएस नेते हवालदिल
- Karnataka Election Result 2023 नागरिकांना बदल हवा आहे म्हणत काँग्रेस कार्यालयात जल्लोष सुरू भाजप जेडीएस नेते हवालदिल
- Karnataka election big fights काँग्रेसची 133 जागांवर आघाडी तर 93 जागांवर मिळवला विजय