मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना बहुमताच्या परीक्षेला आज सामोरे जावे लागणार आहे. भाजप सभागृहामध्ये संवैधानिक पदाच्या निवडीसाठी गदारोळ करणार असेल तर त्यांच्याकडे बहुमत नाही, हे सिद्ध होते. बहुमत चाचची ही गुपीत पद्धतीने व्हावी, ही त्यांची मागणी आहे. मात्र, आज जे काही सभागृहात होईल ते उघपणे झाले पाहिजे असे, काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी 'ईटीव्ही भारत'शी बोलताना सांगितले.
हेही वाचा- ...चक्क राष्ट्रपती भवनासमोरून चोरले पाण्याचे २१ पाईप
भाजपला गुप्त पध्दतीने मतदानाची मागणी करून घोडेबाजार करायचा आहे का? असा खोचक सवाल पृथ्वीराज चव्हाण यांनी उपस्थित केला. आज होणारी बहुमत चाचणी आणि उद्या होणारी अध्यक्षांची निवड आम्ही जिंकू, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
महाविकासआघाडीने हंगामी विधानसभा अध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप वळसे-पाटील यांची शुक्रवारी नियुक्ती केली आहे. महाविकासआघाडी सरकारने २ दिवसांचे विशेष अधिवेशन बोलाविले आहे. हे अधिवेशन आज (शनिवार) आणि रविवार या दोन दिवशी पार पडणार आहे. यामध्ये शनिवारी बहुमत चाचणी तर रविवारी विधानसभा अध्यक्षांची निवड होणार आहे. यावेळी राज्यपालांचे अभिभाषण होणार आहे.