मुंबई Prevention Of Corona : नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबईसह परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पार्ट्यांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र या पार्ट्यांमध्ये सहभागी हाेण्याबाबत नागरिकांच्या मनामध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. पार्टीमध्ये सहभागी होण्याबाबत नागरिकांकडून डॉक्टरांकडे विचारणा होत असून, डॉक्टरांकडून पार्टी टाळण्याचा सल्लाही देण्यात येत आहे. (Doctors Advice on Corona)
कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूसंख्येत वाढ: सध्या कोरोना रुग्ण आढळण्याबरोबरच कोरोनाचे मृत्यूही होत आहेत. देशामध्ये सापडणाऱ्या १०० रुग्णांमध्ये साधारणपणे सात ते आठ रुग्णांचा मृत्यू होत आहे. कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होऊ लागल्यापासून नववर्षाच्या पार्टीला जाण्याबाबत दररोज नागरिकांकडून विचारणा होत आहे. वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर सध्या पार्टीला जाणे टाळणेच योग्य राहील.
पार्टीत सहभागी होणे टाळा: पार्टीसाठी हजारो रुपयांचे तिकीट खरेदी केले असल्यास आणि पार्टीला जाणे टाळणे शक्य नसल्यास पार्टीमध्ये मास्कचा वापर करण्यावर भर द्यावा, असे मत डॉक्टर भरत जगियसी यांनी व्यक्त केले आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि सहव्याधी असलेल्या नागरिकांनी पार्टीला जाणे कटाक्षाने टाळावे. नववर्षाची पार्टी यंदा साजरी करता येणार नसली तरी आरोग्य उत्तम राहण्याला महत्त्व देण्यात यावे. कोरोनाचे रुग्ण वेगाने वाढत असल्याने घाबरू नका; मात्र काळजी घेण्याची आवश्यकता आहे. पार्टीमध्ये कोरोनाच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे. जेणेकरून तुम्ही स्वत:ला सुरक्षित ठेऊ शकाल. शक्य असल्यास पार्टीला जाणे टाळणे उत्तम राहील, असा सल्ला इंडियन सोसायटी ऑफ क्रिटिकल केअर मेडिसिन, मुंबई शाखेचे सचिव डॉ. भरत जगियासी यांनी दिला आहे.
कोरोनापासून बचावासाठी अशी घ्या खबरदारी:
1) दिवसातून वारंवार हात स्वच्छ धुवावेत. यासाठी साबण किंवा अल्कोल मिश्रित असलेली जंतुनाशकांचा (हॅण्डवॉश) वापर करावा.
2) खोकताना आणि शिंकताना टिशू पेपरचा वापर करावा. ज्याद्वारे नाक-तोंड झाकले जाईल. त्यानंतर ते ताबडतोब कचऱ्यात टाकून द्या आणि आपले हात स्वच्छ धुवा.
3) ज्याला ताप आणि खोकला आहे, त्याच्याशी जवळचा संपर्क टाळा.
4) जर आपल्याला ताप, खोकला आणि श्वास घेण्यात अडचण येत असेल तर तत्काळ वैद्यकीय सेवा घ्याव्यात. आणि तुम्ही कोठून प्रवास केला असेल त्याची माहिती डॉक्टरांना सांगा.
5) कोरोनाचा संसर्ग झाला आहे अशा ठिकाणच्या भागातील जिवंत प्राणी आणि त्यांनी स्पर्श केलेल्या पृष्ठभागाशी थेट असुरक्षित संपर्क टाळावा.
6) कच्चे किंवा न शिजवलेल्या प्राण्यांच्या उत्पादनांचे (मांस) सेवन करू नका. कच्चे मांस, दूध किंवा जनावरांच्या अवयवांना काळजीपूर्वक हाताळा जेणेकरून न शिजवलेल्या पदार्थांचा संसर्ग होऊ नये.
हेही वाचा:
- ठाण्यातील ज्यू धर्मीयांचं प्रार्थना स्थळ बॉम्बने उडवण्याच्या धमकीचा ई-मेल युरोपमधून आल्याचा खुलासा
- माजी मंत्री सुनील केदारांचा कारागृहातील मुक्काम वाढला, जामीन अर्ज जिल्हा व सत्र न्यायालयाने फेटाळला
- आधुनिक भारताच्या ट्रेनची जालन्यातून सुरूवात, राम लोकांच्या मनातनं तुम्ही काढूच शकत नाही - देवेंद्र फडणवीस