ETV Bharat / state

विधानसभेसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण - निवडणूक आयोग - ncp satara seat

उदयनराजे भोसले यांनी सातारा लोकसभा मतदार संघाचे खासदार राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिकामी होती. मात्र, आता निवडणूक आयोगाने विधानसभा निवडणुकांसबोतच लोकसभेची निवडणूकही होणार जाहीर केले.

निवडणूक आयोग
author img

By

Published : Sep 24, 2019, 8:31 PM IST

मुंबई - निवडणूक आयोगाने सातारा लोकसभेच्या जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून १५ हजार अतिरिक्त मनुष्यबळ व अतिरिक्त मतदान यंत्रे उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी मंगळवारी मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

निवडणूक आयोग पत्रकार परिषद

सातारा लोकसभा पोटनिवडणुकीचा असा असेल कार्यक्रम -

निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी २७ सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. ४ ऑक्टोबर हा अर्ज करण्याची तारीख असून ५ ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होईल. ७ ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. २१ ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून २४ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.

सातारा लोकसभा मतदारसंघात कोरेगाव, वाई, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण व सातारा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेच्या मतदानसाठी १५ हजार कर्मचाऱ्यांची अतिरिक्त गरज भासणार असल्याचे शिंदे म्हणाले. तसेच पोटनिवडणुकीसाठी ३५०० बॅलेट, ३००० कंट्रोल युनिट (सीयू) व ३२०० व्हीव्हीपॅट हे जास्तीचे लागणार असून ही सर्व यंत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे शिंदे यांनी सांगितले.

मतदान केद्रावरील बॅलेट मशिन कशी ओळखाल?

शिंदे म्हणाले, सातारा मध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्रच होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन इव्हीएम व व्हीव्हीपॅटची दोन संच राहतील. यामध्ये लोकसभेसाठी असणाऱ्या मतदान यंत्रावर पांढऱ्या रंगाचे स्टिकर लावण्यात येणार असून विधानसभेसाठी असणाऱ्या यंत्रावर गुलाबी रंगाचे स्टिकर लावण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांची गफलत होणार नाही. तसेच मतदान यंत्रावरील मतपत्रिकेचा रंगही याप्रमाणेच राहणार असून यंत्रावर मोठ्या अक्षरात लोकसभा व विधानसभा असे नमूद करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर एकच मतदार नोंदणी पुस्तिका ठेवण्यात येणार आहे. परंतु विधानसभा व लोकसभेसाठी दोन वेगवेगळ्या मतदार पावत्या असणार आहेत.
लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी संख्येत वाढ करण्यात आली आहे. १२०० मतदार असलेल्या एक केंद्राध्यक्ष व पाच अधिकारी, तर १२०० पेक्षा मतदार असलेल्या ठिकाणी एक केंद्राध्यक्ष व सहा कर्मचारी असतील.

हेही वाचा - उदयनराजेंना पराभूत करण्यासाठी भाजपचे षडयंत्र; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा आरोप

हेही वाचा - शरद पवारांची एक रॅली अन् सातारा लोकसभेची पोटनिवडणूक जाहीर ?

Intro:Body:mh_mum_3_ec_dilip_shinde_pc_mumbai_7204684

विधानसभेसोबतच सातारा लोकसभा पोटनिवडणुकीची तयारी पूर्ण;
15 हजार अतिरिक्त मनुष्यबळ व यंत्रणा पुरविणार
- अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे

मुंबई: भारत निवडणूक आयोगाने सातारा लोकसभा मतदारसंघातील जागेसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. या निवडणुकीसाठी प्रशासनाची तयारी पूर्ण झाली असून 15 हजार अतिरिक्त मनुष्यबळ व अतिरिक्त मतदान यंत्रे उपलब्ध करुन देण्यात येत असल्याचे अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी दिलीप शिंदे यांनी आज मंत्रालयात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितले.

शिंदे म्हणाले की, भारत निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार सातारा लोकसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी 27 सप्टेंबर रोजी अधिसूचना प्रसिद्ध होईल. 4 ऑक्टोबर हा अर्ज करण्याची तारीख असून 5 ऑक्टोबर रोजी अर्जाची छाननी होईल. 7 ऑक्टोबर रोजी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. 21 ऑक्टोबर रोजी मतदान होणार असून 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होईल.

सातारा लोकसभा मतदारसंघात कोरेगाव, वाई, कराड उत्तर, कराड दक्षिण, पाटण व सातारा हे सहा विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेच्या मतदानसाठी 15 हजार कर्मचाऱ्यांची अतिरिक्त गरज भासणार आहे.

तसेच पोटनिवडणुकीसाठी 3500 बॅलेट युनिट (बीयू), 3000 कंट्रोल युनिट (सीयू) व 3200 व्हीव्हीपॅट हे जास्तीचे लागणार असून ही सर्व यंत्रे उपलब्ध करून देण्यात येत आहेत, असे श्री. शिंदे यांनी सांगितले.

शिंदे म्हणाले की, सातारा मध्ये विधानसभा व लोकसभा निवडणुका एकत्रच होणार आहेत. त्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन इव्हिएम व व्हीव्हीपॅटची दोन संच राहतील. यामध्ये लोकसभेसाठी असणाऱ्या मतदान यंत्रावर पांढऱ्या रंगाचे स्टिकर लावण्यात येणार असून विधानसभेसाठी असणाऱ्या यंत्रावर गुलाबी रंगाचे स्टिकर लावण्यात येणार आहे. त्यामुळे मतदारांची गफलत होणार नाही. तसेच मतदान यंत्रावरील मतपत्रिकेचा रंगही याप्रमाणेच राहणार असून यंत्रावर मोठ्या अक्षरात लोकसभा व विधानसभा असे नमूद करण्यात येणार आहे. तसेच प्रत्येक मतदान केंद्रावर एकच मतदार नोंदणी पुस्तिका ठेवण्यात येणार आहे. परंतु विधानसभा व लोकसभेसाठी दोन वेगवेगळ्या मतदार स्लिप असणार आहेत.

लोकसभा पोटनिवडणूक व विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केंद्रावरील कर्मचारी संख्येत वाढ करण्यात आली आहे. 1200 मतदार असलेल्या एक केंद्राध्यक्ष व पाच अधिकारी, तर 1200 पेक्षा मतदार असलेल्या ठिकाणी एक केंद्राध्यक्ष व सहा कर्मचारी असतील.

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.