ETV Bharat / state

Pravin Darekar On Manoj Jarange Patil: मनोज जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण - प्रवीण दरेकर

Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी (Manoj Jarange Patil) येथे झालेल्या मराठा समाजाच्या सभेत (Pravin Darekar) जरांगे पाटील यांनी सरकारला आरोपांच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. (Manoj Jarange Patil Sabha) सरकार सातत्याने मराठा समाजाच्या आणि आरक्षणाच्या (Maratha Reservation Issue) पाठीमागे असताना अशा प्रकारची वक्तव्य करणे म्हणजे याला वेगळा राजकीय वास आहे. जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण आहे? असा सवाल भाजपाचे आमदार प्रवीण दरेकर यांनी केला आहे. (Pravin Darekar Criticism Manoj Jarange Patil)

Praveen Darekar On Manoj Jarange Patil
प्रवीण दरेकर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 14, 2023, 8:26 PM IST

जरांगे पाटील यांच्यावर टीका करताना प्रवीण दरेकर

मुंबई Pravin Darekar On Manoj Jarange Patil : जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथे मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज (शनिवारी) भव्य सभा झाली. या सभेला मराठा समाजातील लाखो नागरिक उपस्थित होते. सभेमध्ये बोलताना मनोज जरांगे पाटील यांनी मंत्री छगन भुजबळ, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले आहे. सरकार मराठा आरक्षणासंदर्भात सकारात्मक नसल्याची टीका जरांगे पाटील यांनी यावेळी केली. याविषयी प्रतिक्रिया देताना प्रवीण दरेकर यांनी जरांगे पाटील यांच्यावर सडकून टीका केली आहे.

जरांगे पाटील यांचा बोलविता धनी कोण? अंतरवाली सराटी येथे मराठा समाजातील लाखो लोक जमल्यानंतर जरांगे पाटील यांनी केलेली वक्तव्यं अत्यंत धक्कादायक आहेत. राज्य सरकार हे नेहमीच मराठा समाजाच्या पाठीमागे उभे राहिले आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी सरकार आणि राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री प्रयत्नशील आहेत असे असताना जरांगे पाटील यांनी सरकार आणि शिंदे फडणवीस यांच्यावर केलेली टीका ही वेगळा राजकीय वास निर्माण करणारी आहे. जरांगे पाटील यांच्या खांद्यावर कोणी बंदूक ठेवली आहे किंवा त्यांनी आपला खांदा कोणाला बंदुकीसाठी वापरायला दिला आहे हे पाहणे आवश्यक आहे. ते जे बोलत आहेत त्याच्यामागे नक्कीच कोणीतरी आहे. त्यामुळे त्यांचा बोलविता धनी कोण हे स्पष्ट करावे, अशी मागणी प्रवीण दरेकर यांनी यावेळी केली.

सरकारची ही नाहक बदनामी: राज्य सरकारच्या वतीने सातत्याने न्यायालयामध्ये मराठा आरक्षण प्रश्न बाजू मांडली जात आहे. मराठा समाजाला पदोन्नती, अधिक सवलती मिळाव्यात. एसीबीसी मधून अधिक शैक्षणिक आणि नोकरीविषयक सवलती मिळाव्यात यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. तसेच आता क्युरेटिव्हिटीशन सुद्धा ऐकून घेण्याची तयारी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली आहे. त्यामुळे राज्य सरकार अजूनही मराठा आरक्षणासाठी जोरदार प्रयत्न करत आहे. असे चित्र असताना अशा पद्धतीची वक्तव्य करणे हे अत्यंत धक्कादायक आहे. सरकारची ही नाहक बदनामी असल्याचेही भाजपा आमदार प्रवीण दरेकर म्हणाले.

हेही वाचा:

  1. Chhagan Bhujbal On Manoj Jarange : समाजासाठी जीव जाणार असेल तर... ; मनोज जरांगे पाटलांच्या टीकेला छगन भुजबळांचं प्रत्युत्तर
  2. Congress On Manoj Jarange Patil : दोन उपमुख्यमंत्र्यांनी मनोज जरांगेंची फसवणूक केल्याचं स्पष्ट; काँग्रेस नेत्यांची प्रतिक्रिया
  3. Manoj Jarange On Devendra Fadnavis : 'जे मराठाद्वेषी आहेत त्यांचेच चेले...', मनोज जरांगेंची सदावर्तेंसह देवेंद्र फडणवीसांवर टीका

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.