ETV Bharat / state

Mumbai : 'या' कारणामुळे भाजप नगरसेवक प्रकाश मोरे यांचे नगरसेवक पद रद्द; कोमल जामसांडेकर होणार नगरसेविका

भाजप नगरसेवक प्रकाश मोरे ( Prakash More Corporator Post Canceled ) यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश लघु वाद न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्या जागी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या शिवसेनेच्या उमेदवार कोमल जामसांडेकर ( Komal Jamsandekar ) यांना नगरसेवक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

Prakash More
Prakash More
author img

By

Published : Feb 22, 2022, 11:52 AM IST

मुंबई - मुंबई महानगरपालिकेच्या घाटकोपर आसल्फामधील प्रभाग क्रमांक 159चे भाजप नगरसेवक प्रकाश मोरे ( Prakash More Corporator Post Canceled ) यांचे नगरसेवक पद रद्द करण्याचे आदेश लघु वाद न्यायालयाने दिले आहेत. त्यांच्या जागी दुसऱ्या क्रमांकाची मते मिळालेल्या शिवसेनेच्या उमेदवार कोमल जामसांडेकर ( Komal Jamsandekar ) यांना नगरसेवक पदी नियुक्त करण्याचे आदेशही कोर्टाने महापालिकेला दिले आहेत.

मोरे यांनी माहिती लपवली -

मुंबई महापालिकेची निवडणूक 2017मध्ये झाली होती. घाटकोपरमधील असल्फा परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक 159मधून भाजपाकडून प्रकाश मोरे, तर शिवसेनेकडून कोमल जामसंडेकर यांनी निवडणूक लढवली होती. त्यात प्रकाश मोरे हे विजयी झाले. प्रकाश मोरे यांनी प्रतिज्ञापत्रात त्यांची माहिती लपवल्याची तक्रार कोमल जामसंडेकर यांनी केली होती. गँगस्टर अरुण गवळी याने खून केलेल्या कमलाकर जामसंडेकर यांच्या कोमल जामसंडेकर या पत्नी आहेत.

कोमल जामसंडेकर नगरसेविका -

कोमल जामसंडेकर यांनी लोकप्रतिनिधी कायद्यांतर्गत लघु वाद न्यायालयात निवडणूक याचिका दाखल करून मोरे यांच्या विजयाला आव्हान दिले. लघुवाद न्यायालयाने निकाल देताना प्रकाश मोरे यांचे पद रद्द करत दुसऱ्या क्रमांकाची मते मिळवणाऱ्या कोमल जामसंडेकर यांची नगरसेवक पदी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत. या प्रकरणी या आदेशाविरोधात अपील करण्यासाठी मोरे यांच्या वकिलांनी वेळ मागून घेतला आहे. दरम्यान, पालिकेचा कालावधी 7 मार्चला संपणार असल्याने कोमल जामसंडेकर या काही दिवसाच्या नगरसेविका बनू शकणार आहेत. पालिकेत सध्या शिवसेनेचे ९६ नगरसेवक आहेत. कोमल जामसंडेकर यांना नगरसेवक केल्यास शिवसेनेचे संख्याबळ ९७ इतके होणार आहे.

हेही वाचा - ST Merger Report : आज एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरण अहवालावर सुनावणी

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.