ETV Bharat / state

काँग्रेसने आम्हाला 'बी टीम' का म्हटले? खुलासा करावा, तरच पुढे बोलू - प्रकाश आंबेडकर

काँग्रेसने भाजपची 'बी टीम' म्हणून आमच्यावर अपमानास्पद टीका केली. त्या टीकेचा त्यांनी खुलासा करावा. तरच आम्ही विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत सामील व्हायचे की नाही त्यावर बोलू, अशी आडमुठी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केली.

प्रकाश आंबेडकर
author img

By

Published : Aug 1, 2019, 6:55 PM IST

मुंबई - लोकसभा निवडणुकीच्या कालावधीत काँग्रेसने भाजपची 'बी टीम' म्हणून आमच्यावर अपमानास्पद टीका केली. त्या टीकेचा त्यांनी खुलासा करावा. तरच आम्ही विधानसभेत काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत सामील व्हायचे की नाही त्यावर बोलू, अशी आडमुठी भूमिका वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी आज जाहीर केली.

काँग्रेसने आम्हाला 'बी टीम' का म्हटले, याचा खुलासा करण्याची आंबेडकरांची मागणी

काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीत आम्हाला येण्यासाठी काँग्रेसकडून पहिले पत्र आले. ते व्यक्तिगत असले तरी बोलण्याची इच्छा व्यक्त केली आहे. परंतु, आम्हाला बी टीम म्हणून हिणवले. त्याचा खुलासा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आम्ही चर्चा करणार नाही. आम्ही आघाडीत जाणार नाही, असे नाही. परंतु काँग्रेसने खुलासा केल्यास आम्ही पुढे चर्चा करू, असे आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आज आपल्यावर कारवाई होईल म्हणून भाजपमध्ये जात आहेत. लोकसभेत आम्हाला ४० लाख मते मिळाली. त्यामुळे ज्या जागा आहेत, त्यावर नवीन चेहरे देण्याचे आमचे धोरण आहे. आमच्या संपर्कात राष्ट्रवादी आणि इतर पक्षाचे लोक आहेत. मात्र, आमचे अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत आम्ही काही बोलत नाही. आमचा उद्देश कोणत्याही पक्षाला कमी लेखण्याचा नाही. आम्ही पहिली उमेदवार यादीही या महिन्याच्या शेवटी जाहीर करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले.

आमच्याकडे आतापर्यंत १ हजार १०० उमेदवारांच्या मुलाखती झाल्या आहेत. त्यात आणखी काही विभाग शिल्लक राहिले आहेत. त्यांच्या मुलाखती सुरू आहेत. दसरा-दिवाळी यादरम्यान निवडणुका होणार असून आम्ही २८८ उमेदार उभे करू. पहिली यादी ही ओबीसी या वर्गाची जाहीर केली जाणार असल्याचे आंबेडकर म्हणाले.

ईव्हीएमविरोधात देशात जनआंदोलन सुरू आहे. तर त्यावर बोलताना आंबेडकर म्हणाले, की राजकीय पक्षांनी ईव्हीएम आंदोलनात सामील झाले तर त्यातून काही निष्पन्न होणार नाही. त्यासाठी बिगर राजकीय संघटनांनी लीड केले पाहिजे. निवडणुका या बॅलेट पेपरवर व्हाव्यात, यासाठी माझा प्रयत्न आहे. ईव्हीएमसाठी वेगळ्या पातळीवर लढण्याची गरज आहे. १९ लाख ईव्हीएम मशीन गायब आहेत. परंतु त्यावर कोणी बोलत नसल्याचा आरोप त्यांनी केला.

दरम्यान, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांनी आघाडीत आपल्याला आणण्यासाठी सकारात्मक भूमिका घेतली. त्यावर आपण काय सांगाल, असे विचारले असता त्यांनी आम्हीही सकारात्मक असल्याचे सांगत मूळ प्रश्नाला आंबेडकरांनी बगल दिली.

Intro:काँग्रेसने आम्हाला 'बी टीम' का म्हटले? खुलासा करावा तरच पुढे बोलू! बातमी मोजोवर पाठवली आहे

Body:काँग्रेसने आम्हाला 'बी टीम' का म्हटले? खुलासा करावा तरच पुढे बोलू!

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.