मुंबई - नवरात्रोत्सवाच्या दुसऱ्या दिवशी हळूहळू वातावरण भक्तिमय होऊ लागले आहे. मुंबईतील विविध मंडळांनी देवीची प्रतिष्ठापणा केली आहे. प्रभादेवी येथील धनमिल नाका महालक्ष्मीचा असाच एक आगळावेगळा इतिहास आहे. 30 वर्षांपूर्वी शिवशक्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या लहानग्यांनी उत्सवापोटी छोट्या देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली होती. तेव्हापासून आजतागायत हा नवरात्रोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यात येतो. छोट्या मूर्तीची जागा आता 6 फुटी मुर्तीने घेतली असून सजावटीसाठी साकारलेला भव्य महाल हा सर्वांचाच आकर्षणाचा विषय ठरला आहे.
हेही वाचा - मोनो-मेट्रोच्या कामामुळे फुटलेल्या वाहिन्यांचा खर्च पालिका करणार वसूल
देवी- देवतांचे आणि लहानग्यांचे एक विशिष्ट नाते असते. उत्सव साजरा करण्यात प्रत्येक भागातील लहानगे हे नेहमीच पुढे असतात. गणेशोत्सव आपल्या भागात साजरा होतो मग नवरात्रोत्सव का नाही? असा प्रश्न पुढे करत 29 वर्षांपूर्वी या देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. विविध धर्मातील लोकं एकत्र येवून हा सण इथे गुण्यगोविंदाने साजरा करत असतात.
हेही वाचा - जिजाऊंच्या समाधीला अभिवादन करून वंचित फोडणार प्रचाराचा नारळ
आमच्या चाळीतील लहान मुलांनी 29 वर्षांपूर्वी या देवीची प्रतिष्ठापना केली होती. माझ्या सासूने या मुलांना कशा प्रकारे देवीची पूजा करतात याबाबत मार्गदर्शन केले होते. आज काळ बदलला पण देवीची सेवा करणे मात्र काही थांबले नाही. एका बाकड्यापासून सुरू केलेला हा उत्सव आज भव्य स्टेजपर्यंत आला आहे. देवीची पूजा करत असताना 9 दिवसात 9 रंगाची साडी अशी संकल्पना काही ठिकाणी राबवली जाते मात्र, आमचे मंडळ याला अपवाद आहे. आम्ही कोणत्याही रंगाची सक्ती करत नसून देवीला ओटी म्हणून जी साडी येते ती कोणत्याही रंगाची असो ती आम्ही तिला नेसवतो. 9 दिवसात 9 रंग ही संकल्पना मानवाची आहे असे मंडळाचे विश्वस्त सीमा केळुस्कर यांनी सांगितले.
हेही वाचा - आदित्य ठाकरे विक्रमी मतांनी निवडून येणार - वरुण सरदेसाई