ETV Bharat / state

AIMIM Proposal Reactions - एमआयएमच्या प्रस्तावानंतर का ढवळले राजकीय वातावरण? - एमआयएम प्रस्ताव महाविकास आघाडी

राज्यातील आघाडी सरकारला एमआयएम पक्षाकडून सत्तेत सामील करुन घेण्याबाबत देण्यात आलेल्या प्रस्तावामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ( AIMIM Proposal to Mahavikas Aghadhi ) या प्रस्तावामागची राजकीय समीकरण वेगळी आहेत. मात्र, या प्रस्तावामुळे एमआयएम भाजपची ''बी टीम' असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.

Political Reactions After AIMIM Proposal to Joined Mahavikas Aghadi
एमआयएमच्या प्रस्तावानंतर का ढवळले राजकीय वातावरण?
author img

By

Published : Mar 20, 2022, 1:38 PM IST

मुंबई - राज्यातील आघाडी सरकारला एमआयएम पक्षाकडून सत्तेत सामील करुन घेण्याबाबत देण्यात आलेल्या प्रस्तावामुळे राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. ( AIMIM Proposal to Mahavikas Aghadhi ) या प्रस्तावामागची राजकीय समीकरण वेगळी आहेत. मात्र, या प्रस्तावामुळे एमआयएम भाजपची ''बी टीम' असल्याची चर्चा पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात सुरू झाली असल्याचं राजकीय विश्लेषकांकडून सांगण्यात येत आहे.

एमआयएम पक्षाचे खासदार इम्तियाज जलील ( AIMIM MP Imtiaz Zalil ) यांनी महाविकास आघाडीला आघाडीचा प्रस्ताव दिल्यानंतर राज्याच्या राजकारणात खरी 'धुळवड' सुरू झाली. सत्तेत असलेल्या महाविकास आघाडी सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि शिवसेनेने एमआयएमने दिलेल्या आघाडीच्या ऑफरनंतर तीनही पक्ष आपापल्यापरीने या ऑफरला आपल्या पक्षापासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला आहे. तर एमआयएमने महाविकास आघाडीला दिलेल्या या ऑफरनंतर देवेंद्र फडणीस यांनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. शिवसेना हिंदुत्वापासून दूर गेली असल्याचे सांगत त्यांनी या प्रस्तावावर मत व्यक्त केलं.

आघाडीकडून एमआयएमच्या प्रस्तावाला नकार -

राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी औरंगाबादमध्ये एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांची 19 मार्चला भेट घेतली होती. खासदार इम्तियाझ जलील यांना मातृशोक आहे. त्यामुळे त्यांचं सांत्वन करण्यासाठी राजेश टोपे यांनी त्यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान झालेल्या चर्चेत जलील यांनी महाविकास आघाडीसमोर आपला प्रस्ताव ठेवला. मात्र, या प्रस्तावाला नंतर शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्हीही पक्षाकडून नकार देण्यात आला आहे. खास करून शिवसेनेने या प्रस्तावाला थेट नकार दिला असून राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन पक्षांकडे या प्रस्तावाबाबत सावध भूमिका घेत नकार दिला गेला.

एमआयएमच्या प्रस्तावानंतर राजकीय धुळवड?

2014च्या विधानसभा निवडणुकीनंतर एमआयपक्षाने महाराष्ट्रात आपलं अस्तित्वाची चुणूक दिली होती. अनेक मुस्लिम बहुल भागात 2014च्या विधानसभा निवडणूक एमआयएम पक्षाला चांगली मते मिळवता आली होती. याच विधानसभा निवडणुकीमध्ये एमआयएमचे दोन आमदार पहिल्यांदा विधानसभेमध्ये निवडून आले. मात्र, केवळ दोन आमदार निवडून आले असले तरी त्यावेळच्या विधानसभा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात मुस्लिम मतदार एमआयएमकडे वळल्याचा थेट फटका काँग्रेस आणि काही प्रमाणात राष्ट्रवादी काँग्रेसला देखील बसला होता. त्यानंतर राज्यात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत अनेक ठिकाणी पक्षाने आपलं अस्तित्व दाखवले. 2019 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील औरंगाबाद मतदार संघातील एमआयएम पक्षाचा पहिला खासदार लोकसभेत गेला. इम्तियाज जलील खासदार म्हणून पहिल्यांदा महाराष्ट्रातून निवडून आले.

2019 विधानसभा निवडणुकीत एमआयएम पक्षाकडून 288 पैकी 44 जागेवर आपले उमेदवार उभे केले. त्यापैकी धुळे शहरी मतदार संघ आणि मालेगाव (मध्य) या मतदारसंघातून दोन आमदार त्यांना निवडून आणत आहे. एकूण मतदानापैकी 1.34% एवढी मते एमआयएम पक्षाला मिळाली होती. पक्षाच्या वाढत्या मतदानाचा टक्क्यामुळे गेल्या दोन विधानसभा निवडणुकीमध्ये याचा थेट फटका काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बसत होता. मुस्लीम मतदारांची मतं विभागली गेल्यामुळे त्याचा थेट फायदा भारतीय जनता पक्षाला अनेक ठिकाणी झालेला आकड्यांच्या गणितानुसार दिसून येतो. त्यामुळे एमआयएम हा पक्ष भारतीय जनता पक्षाला फायदा होईल, अशी राजकीय समीकरणे मांडतो. त्यामुळे एमआयएम पक्ष भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याचा वेळोवेळी आरोप राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस करण्यात आला आहे. तसेच औरंगाबाद शिवसेनेचा बालेकिल्ला असून माजी खासदार चंद्रकांत खैरे येथे निवडून येत होते. मात्र, 2019 च्या लोकसभा निवडणुकीत पहिल्यांदाच एमआयएम पक्षाकडून इम्तियाझ जलील हे खासदार झाले. त्यामुळे एमआयएमचा फटका शिवसेनेला देखील बसला होता.

हेही वाचा - Raut On Kashmir Files : काश्मीरसारख्या संवेदनशील विषयावर राजकारण करणे योग्य नाही - संजय राऊत

एमआयएमच्या प्रस्ताव मागे भाजपचा डाव?

महाविकास आघाडी सरकारला दोन वर्ष पूर्ण झाली आहेत. आघाडी सरकार बहुमतात आहे. कोणत्याही मदतीची आघाडीला गरज नाही, असं असताना एमआयएम कडून देण्यात आलेल्या आघाडीच्या प्रस्तावाची काय गरज? असा सवाल राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांनी उपस्थित केला आहे. एमआयएम पक्ष भारतीय जनता पक्षाची बी टीम असल्याची चर्चा नेहमीच राजकीय वर्तुळात झाली आहे. त्यामुळे या प्रस्तावामध्ये भाजप आहे का? असा सवालदेखील राजकीय वर्तुळात विचारण्यात येतोय. सध्या हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून राज्यात आणि देशात राजकारण तापताना दिसते. " द कश्मीर फाईल" चित्रपट, हिजाब किव्हा मैदानाला टिपू सुलतान नाव देण्याचे प्रकरण असोत, या सर्व मुद्द्यावरून हिंदू मुस्लिम वाद निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. हिंदुत्वाच्या मुद्दाचा उत्तर प्रदेश निवडणुकीमध्ये चांगला फायदा भारतीय जनता पक्षाला झाला.

त्यामुळे हिंदुत्वाचा मुद्दा राजकीय वर्तुळात लोकसभेच्या निवडणुकांपर्यंत ठेवण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्षाचा असेल. तसेच एमआयएमने दिलेल्या प्रस्तावानंतर भारतीय जनता पक्षाला थेट शिवसेनेवर निशाणा साधला जातोय. या ऑफरचा कुठे ना कुठे राजकीय फायदा महानगरपालिकेच्या निवडणुकीत घेता यावा हा प्रयत्न भारतीय जनता पक्षात असेल. खास करून मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेला कोंडीत पकडण्यासाठी एमआयएमने दिलेल्या ऑफरचा राजकीय फायदा उचलण्याचा प्रयत्न भारतीय जनता पक्ष करेल. या मुद्यावरून हिंदुत्ववादी मते आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न भाजप प्रयत्न करेन, असं मत राजकीय विश्लेषक संदीप प्रधान यांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.