मुंबई- कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभर पसरला असतानाच केंद्र सरकार, राज्य सरकार व विविध प्रशासकीय यंत्रणा अनेक उपाययोजना करत आहे. कोरोना बाधित रुग्णाच्या संपर्कातील नागरिक विलगीकरण कक्षात न जाता फिरत आहेत. आज लोकमान्य टिळक टर्मिनस येथून उत्तर प्रदेशला रेल्वेने जात असलेल्या 8 होम क्वारन्टाईन व्यक्तींना रेल्वे पोलिसांनी रोखून सेव्हन हिल रुग्णालयात भरती केले.
हेही वाचा- दिवसभरातील महत्त्वाच्या दहा घडामोडींचा वेगवान आढावा...
अनेक देशांवर हल्ला चढवलेल्या कोरोना विषाणूने भारतातही थैमान घालायला सुरुवात केली. महाराष्ट्रात याचे 64 संक्रमित रुग्ण आढळले आहेत. या विषाणूचा प्रसार कमी व्हावा, यासाठी केंद्र सरकारने दळणवळणाच्या काही सेवा कमी केल्या आहेत. मुंबईत लोकल बसेस काही दिवसासाठी बंद करण्यात येणार असल्याच्या अफवाने मुंबईतील बाहेरगावाहून आलेले कामगार गावी जाण्यासाठी लोकमान्य टिळक रेल्वे स्थानकावर गर्दी करीत आहेत.
आज सकाळी दुबईहून काही भारतीय मुंबई विमानतळावर दाखल झाले. त्यांची तपासणी करून त्यांना होम क्वारन्टाईचे शिक्के मारण्यात आले. अशाच प्रकारचे शिक्के मारलेले आठ रुग्ण विमानतळावरुन मेट्रोने घाटकोपरला आले. यावेळी अनेक प्रवाशांनी त्यांना बघितल्यानंतर प्रशासनाला याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. ते अलाहाबाद येथील रहिवासी असून आज सकाळीच दुबईहून मुंबईला आले होते. पोलिसांनी त्यांना सेव्हन हिल रुग्णालयात विलगीकरण कक्षात 14 दिवसासाठी पाठविले आहे.