ETV Bharat / state

मराठीतून पेपर देण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी बजावली नोटीस - law college

महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (८ जुलै) मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात बेमुदत उपोषणाला सुरूवात केली होती. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी १४९ ची नोटीस बजावली आहे.

मराठीतून पेपर देण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी बजावली नोटीस
author img

By

Published : Jul 8, 2019, 11:50 PM IST

मुंबई - विधी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्याचे सर्व पेपर मराठीतून देण्यात, यावेत या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी सोमवारी (८ जुलै) मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात बेमुदत उपोषणाला सुरूवात केली होती. या विद्यार्थ्यांना पोलिसांनी १४९ ची नोटीस बजावली आहे. त्यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये पोलिसांच्या नोटीसवर तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

मराठीतून पेपर देण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी बजावली नोटीस

विद्यापीठाने त्यांच्या मागण्यांवर विचार करण्यापूर्वीच संघटनेचे अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे आणि त्यांच्या सहकार्यांना पोलिसांनी नोटीस बजावली. बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे मुंबईतील अत्यंत महत्वाचे आणि संवेदनशिल ठिकाण आहे. त्यामुळे या परिसरात गंभीर दखलपात्र गुन्हा घडल्यास सार्वजनिक मालमत्तेला धोका ठरू शकतो. त्यामुळे या परिसरात जमावबंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये ही नोटीस बजावण्यात आली असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
मराठीच्या आग्रहासाठी उपोषण सुरू करणाऱ्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना आपले उपोषण या नोटीसमुळे मागे घ्यावे लागले आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांकडून याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.

'आम्ही लोकशाहीने दिलेल्या अधिकाराप्रमाणे न्याय आणि हक्कासाठी उपोषण करत होतो. परंतु, आम्हाला पोलीसांनी नोटीस बजावून आमचा लढा रोखून धरला, असे महाराष्ट्र स्टुडंट लॉ असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले. पोलीसांनी आम्हाला मराठीच्या अधिकारासाठी किमान सहकार्य करण्याऐवजी मराठी भाषेच्या लढाईच्या विरोधात भूमिका घेतल्याचेही इंगळे म्हणााले.

Police issued a notice to the students demanding a paper from Marathi in mumbai

या आहेत मागण्या -
विद्यापीठाने मास्टर ऑफ लॉ (एल.एल.एम) ची सामान्य प्रवेश परीक्षा इंग्रजी सोबत मराठी भाषेतून घेण्यात यावी.
मास्टर ऑफ लॉ (एल.एल.एम) आणि बी. एल एस अभ्यासक्रमासाठी (वर्ष १ व २) प्रश्नपत्रिका इंग्रजी सोबत मराठी भाषेतून उपलब्ध करून देण्यात द्यावे.
मास्टर ऑफ लॉ (एल.एल.एम) ची सामान्य प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजीत करण्यात यावी.
२० मे २०१९ ला पुन्हा जारी करण्यात आलेले विधी अभ्यासक्रमात ६०:४० पद्धत राबविण्याचे परिपत्रक तात्काळ रद्द करावे.

Intro:मराठीतून पेपर देण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी बजावली नोटीस
मुंबई, ता. ८ :
मुंबई विद्यापीठाच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व महाविद्यालय आणि विधी विभागाच्या सर्व अभ्यासक्रमांचे पेपर हे माय मराठीतून द्यावेत या मागणीसाठी आज उपोषण करणाऱ्या विद्यार्थ्यांना बीकेसी पोलीसांनी १४९ ची नोटीस बजावली. यामुळे विद्यार्थी संघटनांमध्ये पोलिसांच्या या नोटीसीवर तिव्र प्रतिक्रिया उमटल्या.
विधी शाखेच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या चे सर्व पेपर मराठीतून देण्यात यावेत या मुख्य मागणीसाठी महाराष्ट्र स्टुडंट्स लॉ असोसिएशनच्या विद्यार्थ्यांनी आज मुंबई विद्यापीठाच्या कलिना संकुलात बेमुदत उपोषणाला सुरूवात केली होती. परंतु विद्यापीठाने त्यांच्या मागण्यांवर विचार करण्यापूर्वीच संघटचेने अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे आणि त्यांच्या सहकार्यांना पोलीसांनी बांद्रा कुर्ला कॉम्पलेक्स हे मुंबईतील अत्यंत महत्वाचे आणि संवेदनशिल ठिकाण असल्याने या परिसरात गंभीर दखलपात्र गुन्हा घडल्यास सार्वजनिक मालमत्तेला मोठा धोका होऊ शकतो, त्यामुळे या परिसरात जमावबंदी घालण्यात आली असून त्यामुळे आपल्याला फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम १४९ अन्वये आपल्याला नोटस बजावण्यात येत असल्याचे सांगत नोटीस बजावली. यामुळे मराठीच्या आग्रहासाठी उपोषण सुरू करणाऱ्या विधी शाखेच्या विद्यार्थ्यांना आपले उपोषण सायंकाळी मागे घ्यावे लागले असल्याने विद्यार्थ्यांकडून याविषयी तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली.
आम्ही लोकशाहीने दिलेल्या अधिकाराप्रमाणे न्याय आणि हक्कासाठी उपोषण करत होतो, परंतु आम्हाला पोलीसांनी नोटीस बजावून माय मराठीतून आम्हाला पेपर घेण्याचा लढा रोखून धरला असल्याचा आरोप महाराष्ट्र स्टुडंट लॉ असोसिएशनचे अध्यक्ष सिद्धार्थ इंगळे यांनी सांगितले. पोलीसांनी आम्हाला मराठीच्या अधिकारासाठी किमान सहकार्य करण्याऐवजी मराठी भाषेच्या लढाईच्या विरोधात भूमिका घेतल्याचेही इंगळे म्हणााले.
**
या आहेत मागण्या...
विद्यापीठाने मास्टर ऑफ लॉ (एल.एल.एम) ची सामान्य प्रवेश परीक्षा इंग्रजी सोबत मराठी भाषेतून घेण्यात यावी तसेच मास्टर ऑफ लॉ (एल.एल.एम) आणि बी. एल एस अभ्यासक्रमासाठी (वर्ष १ व २) प्रश्नपत्रिका इंग्रजी सोबत मराठी भाषेतून उपलब्ध करून देण्यात द्यावे, मास्टर ऑफ लॉ (एल.एल.एम) ची सामान्य प्रवेश परीक्षा ऑनलाईन पद्धतीने आयोजीत करण्यात यावी २० मे २०१९ ला पुन्हा जारी करण्यात आलेले विधी अभ्यासक्रमात ६०:४० पद्धत राबविण्याचे परिपत्रक तात्काळ रद्द करावे.
Body:मराठीतून पेपर देण्याची मागणी करणाऱ्या विद्यार्थ्यांना पोलिसांनी बजावली नोटीसConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.