ETV Bharat / state

पोलीस म्हणतात, 'त्या' शिवसैनिकांना पकडले पण कारवाई केली नाही - undefined

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता सुरू असून त्याच आचारसंहितेच्या नियमानुसार कुठेही आचारसंहितेचा भंग होऊ नये, यामुळे आम्ही उस्मानाबाद येथून आलेल्या २२ शिवसैनिकांना दादर स्थानकावर पकडले होते.

पोलीस म्हणतात, 'त्या' शिवसैनिकांना पकडले पण कारवाई केली नाही
author img

By

Published : Mar 24, 2019, 5:58 PM IST

मुंबई - उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने तिकीट नाकारलेल्या रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांना आम्ही ताब्यात घेतले आणि केवळ त्यांची विचारपूस करून सोडून दिले, असा दावा आज दादर पोलीस ठाण्यामधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आला आहे.

पोलीस म्हणतात, 'त्या' शिवसैनिकांना पकडले पण कारवाई केली नाही

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता सुरू असून त्याच आचारसंहितेच्या नियमानुसार कुठेही आचारसंहितेचा भंग होऊ नये, यामुळे आम्ही उस्मानाबाद येथून आलेल्या २२ शिवसैनिकांना दादर स्थानकावर पकडले होते. काही वेळ बसवून घेतले आणि त्यांना नंतर सोडून देण्यात आले. कोणावरही आम्ही कारवाई केली नाही, असा दावा पोलीस ठाण्याकडून करण्यात आला.

दरम्यान, उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने रवींद्र गायकवाड यांना तिकीट का दिले नाही, म्हणून विचारणा करण्यासाठी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसैनिक येत होते. त्यांची वाशी, नवी मुंबई येथे गाडी अडवून काही जणांना ताब्यात घेतले होते. तर त्यातील काही शिवसैनिक मात्र, पोलिसांना चकवा देत दादरपर्यंत पोहोचले होते. त्यांची थोडीशी कुणकुण लागताच दादर पोलिसांनी सकाळी २२ जणांना ताब्यात घेतले होते. ही कारवाई शिवाजी पार्क पोलीस ठाणे यांनी केली होती. यानंतर त्यांना सैतान चौकी या दादर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते. तेथून त्यांना सोडून देण्यात आले असल्याचा दावा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांना काही वेळ पकडून सोडून दिले असल्याचे सांगण्यात आले. सुरुवातीला याबाबत काहीजणांना सैतान चौकी दादर पोलीस ठाणे आणि काही जणांना माहीम पोलीस ठाण्यामध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले. याविषयी स्थानिक पोलीस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला आहे.

Intro:पोलिस म्हणतात, 'त्या' शिवसैनिकांना पकडले पण कारवाई केली नाही

मुंबई, ता 24 :

उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने तिकीट नाकारलेल्या रवींद्र गायकवाड यांच्या समर्थकांना आम्ही ताब्यात घेतले आणि केवळ त्यांचे विचारपूस करून त्यांना सोडून दिले असा दावा आज दादर पोलिस स्टेशन मधील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आला.
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आचारसंहिता सुरू असून त्याच आचारसंहितेच्या नियमानुसार कुठेही आचारसंहितेचा भंग होऊ नये, यामुळे आम्ही उस्मानाबाद येथून आलेल्या 22 शिवसैनिकांना दादर स्थानकावर पकडले होते. काही वेळ बसवून घेतले आणि त्यांना त्यानंतर सोडून देण्यात आले कोणावरी आम्ही कारवाई केली नाही असा दावाही पोलीस स्टेशन कडून करण्यात आला.

दरम्यान, उस्मानाबाद लोकसभा मतदार संघातून शिवसेनेनं रवींद्र गायकवाड यांना तिकीट का दिले नाही म्हणून विचारणा करण्यासाठी मुंबईत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी शिवसैनिक येत होते, त्यांची वाशी, नवी मुंबई येथे गाडी अडवून काही जणांना ताब्यात घेतले होते तर त त्यातील काही शिवसैनिक मात्र पोलिसांना चकमा देत दादरपर्यंत पोहोचले होते त्याची थोडीशी कुणकुण लागताच दादर पोलिसांनी सकाळी 22 जणांना ताब्यात घेतले होते. ही कारवाई शिवाजी पार्क पोलीस ठाणे यांनी केली होती त्यानंतर त्यांना सैतान चौकी या दादर पोलीस ठाण्यात आणण्यात आले होते आणि त्यानंतर तेथून त्यांना सोडून देण्यात आले असल्याचा दावा एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी केला. आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर आम्ही त्यांना काही वेळ पकडून सोडून दिले असल्याचे सांगण्यात आले तर सुरुवातीला याबाबत जणांपैकी काहीजणांना सैतान चौकी दादर पोलीस स्टेशन आणि काही जणांना माहीम पोलीस स्टेशनमध्ये ठेवण्यात आल्याचे सांगण्यात आले तर याविषयी स्थानिक पोलिस वरिष्ठ अधिकाऱ्यांनी अधिक माहिती देण्यास नकार दिला.

Body:दादर पोलिस स्टेशन

Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.