ETV Bharat / state

Yes Bank scam case : येस बँक घोटाळ्याप्रकरणी सत्र न्यायालयाने नाकारला राकेश आणि कपिल वाधवानचा जामीन

author img

By

Published : May 19, 2023, 3:19 PM IST

येस बँक आर्थिक घोटाळ्या प्रकरणी पीएमएलए न्यायालयाने राकेश आणि कपिल वाधवान यांना जामीन नाकारला आहे. बॅंकेची संपत्ती म्हणजे राष्ट्राची संपत्ती आहे आणि तिची लुटमार वाधवान बंधूंनी केली, असे न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांनी म्हटले आहे.

Yes Bank scam case
येस बँक आर्थिक घोटाळा

मुंबई : देशभरात चर्चा असलेल्या येस बँक आर्थिक घोटाळा प्रकरणी राणा कपूर सध्या तुरुंगात आहेत. या प्रकरणात राकेश आणि कपिल वाधवान हेदेखील आरोपी आहेत. त्यांनीच हा 5 हजार कोटीपेक्षा अधिक रुपयांचा घोटाळा केला आहे. त्यामुळे त्यांना जामीन देता येत नाही, असे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांनी वाधवान यांचा जामीन नाकारताना म्हटले.

'राष्ट्राची संपत्ती लुटली' : आर्थिक गैरव्यवहार संदर्भातील हे अत्यंत महत्त्वाचे आणि नोंद घेण्याजोगे असे प्रकरण आहे. यामध्ये कपिल आणि राकेश वाधवान यांनी ज्या रीतीने हा घोटाळा केला आहे, ते अत्यंत धक्कादायक आहे. त्यामुळे त्यांनी केलेल्या पैशाच्या हेराफेरीकडे दुर्लक्ष करता येत नाही. तसेच येस बँकेमधील खातेधारकांच्या रकमा ही काही एखाद्या व्यक्तीची मालमत्ता नाही. ती जनतेची आहे म्हणजे राष्ट्राची संपत्ती आहे आणि तिची लुटमार वाधवान बंधूंनी केली, असे न्यायमूर्ती एमजी देशपांडे म्हणाले.

'राणा कपूर यांना 600 कोटी रुपये दिले गेले' : डीएचएफएलकडून येस बँकेचे त्यावेळचे सीईओ राणा कपूर यांना 600 कोटी रुपये बेकायदा दिले गेले. हे पैसे राणा कपूरच्या मुली मार्फत दिले गेले होते. त्या मुलीच्या कंपनीकडे हे 600 कोटी रुपये वळते केले होते, त्यामुळे हा मोठा घोटाळा आहे. तसेच राकेश आणि कपिल वाधवान यांची जी काही कंपनी आहे, त्यांच्या कंपनीला 750 कोटी रुपयांचे बेकायदा कर्ज मंजूर केले. हे जनतेचे पैसे आहेत. राणा कपूर जिचे सीईओ होते त्या ऐस बँकेने डीएचएफएलचे 3 हजार 700 कोटी रुपयांचे अल्पमुदतीचे डिबेंचर विकत घेतले होते. त्याच्या बदलात हा सगळा आर्थिक गैरव्यवहार त्यांनी केला आहे, असे तथ्य अंमलबजावणी संचालनालयाने समोर आणले आहे. त्यामुळेच यांचा जामीन नाकारत आहोत, असे देखील न्यायमूर्ती एमजी देशपांडे यांनी म्हटले आहे.

हेही वाचा :

  1. Nagpur Metro Project: नागपूर मेट्रो प्रकल्पात ८७७ कोटींचा भ्रष्ट्राचार; महामेट्रोचे माजी एमडी आणि लेखापालावर कारवाई करा- प्रशांत पवार
  2. Cordilea Cruise drug cases : समीर वानखेडेकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, आज दुपारी होणार सुनावणी
  3. Sameer Wankhede: एनसीबीच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने जातीवरून केला अपमान- समीर वानखेडे यांची कॅटसह मुंबई पोलिसात तक्रार

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.