ETV Bharat / state

Ganesh Festival 2022 राज्यभरात शाडू मातीच्या गणेश मूर्तींपेक्षा प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींनाच पसंती

गणेश भक्तांना गणेशोत्सवाचे वेध Ganesh Festival लागले आहेत. अशातच रंग, कच्चा माल, इंधन दरवाढ, वाहतूक खर्चामुळे यावर्षी मूर्तीदरात वाढ झाली आहे. त्यामुळे शाडू मातीच्या गणेश मूर्तींपेक्षा Shadu Clay Ganesha Idols सर्वाधिक प्लास्टर पॅरिस मूर्तींना Plaster Paris Ganesha Idols गणेशभक्तांनी पसंती मिळत असल्याचे दिसून येते.

Shadu Clay Ganesha Idols
शाडू मातीच्या गणेश मूर्तींपेक्षा सर्वाधिक प्लास्टर पॅरिस मूर्तींना गणेशभक्तांनी पसंती
author img

By

Published : Aug 17, 2022, 4:40 PM IST

मुंबई यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव, सण उत्सवाला निर्बंध आणि मूर्तीच्या उंचीची मर्यादा नसल्याने गणेश भक्तांना गणेशोत्सवाचे वेध Ganesh Festival लागले आहेत. परंतु वाढत्या महागाईमुळे सर्वसामान्यांचे कंबरडे मोडले आहेत. अशातच रंग, कच्चा माल, इंधन दरवाढ, वाहतूक खर्चामुळे यावर्षी मूर्तीदरात वाढ झाली आहे. त्यामुळे शाडू मातीच्या गणेश मूर्तींपेक्षा Shadu Clay Ganesha Idols सर्वाधिक प्लास्टर पॅरिस Plaster Paris Ganesha Idols मूर्तींना गणेशभक्तांनी पसंती मिळत असल्याचे दिसून येते.

गणेशोत्सव आल्याने मूर्ती कारागिरांची लगबग वाढली मागील दोन वर्षे कोरोनाच्या संकटामुळे या उत्सवात काहीसी मरगळ होती. तसेच सार्वजनिक गणेशोत्सव मंडळालाही सदर उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करता आला नाही, मात्र या वर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे तालुक्यात सर्वत्र गणेशोत्सव धूमधडाक्यात साजरा होणार आहे. अवघ्या पंधरा दिवसांवर गणेशोत्सव आल्याने मूर्ती कारागिरांची लगबग वाढली आहे. विविध आकारांच्या, आकर्षक व सुंदर रेखीव काम केलेल्या मूर्तीशाळेत साकारल्या जात आहेत. तर वाळलेल्या मूर्तींच्या रंगकामाला सुरूवात झाली आहे. अनेक सार्वजनिक मंडळे, घरगुती गणेश उत्सवाकरिता हव्या तशा गणेश मूर्तींची ऑर्डर देण्यासाठी लालबाग येथील गणेश मूर्ती कारखान्यात गणेशभक्तांची मोठी रीग लागली आहे. मात्र प्लास्टर पॅरिस मूर्तींना शाडू मातीच्या मूर्तींपेक्षा सर्वाधिक मागणी आहे.

विठ्ठलाच्या माऊली मूर्तीला पसंती यंदा वर्षी विठ्ठलाच्या रूपातील माऊली या नावाने साकारलेली मूर्ती बाजारपेठेचे आकर्षण ठरत आहे. फेटाधारी जय मल्हार, जय हनुमान, बाहुबली, बालगणेशा, तांडव अवतार, शिवअवतार, लालबागचा राजा, दगडूशेठ अशा गणेश मूर्तींना बच्चे कंपनीकडून घरगुती गणेश उत्सवासाठी विशेष मागणी आहे. त्यात बाजारात पहिल्यांदाच आलेल्या सोनेरी फायबर गोल्ड रंगसंगतीमुळे मूर्तीचे दागिने, मुकुट आता अस्सल सोनेरी दिसू लागला आहे. गणेशमूर्तीही अधिक आकर्षक झाल्या आहेत. एक फुटापासून ते मोठ्या मंडळाच्या मागणीनुसार मूर्ती उपलब्ध आहेत. काही मागणीनुसार बनवल्या जातात. मात्र रंग, कच्चा माल, इंधन दरवाढ, वाहतूक खर्चाचा परिणाम मूर्तीकामावर झाल्याने प्लॅस्टर ऑफ पँरिसची १० इंच उंचीची मूर्ती किमान पाचशे ते सहाशे रुपयांपर्यंत वाढली आहे.

प्लास्टर पॅरिसला मागणी उंची आणि प्लास्टर पॅरिस मूर्तींवरील निर्बंध राज्य सरकारने मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. गेली दोन वर्षे कोरोना काळामुळे मोठा परिणाम झाला होता. शाडू मातीच्या किमती खिशाला परवडत नाहीत. त्यामुळे प्लास्टर पॅरिस मूर्तींचा भाव वधारला आहे. सार्थक आर्ट मध्ये मूर्ती देखण्या, सुरेख आणि रेखीव आहेत. गणेशभक्तांनी गणेशमूर्तीला खरेदीला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. पूर्वजांनी शाडूच्या मातीची मूर्ती जोपासली. परंतु, महागाईमध्ये संपूर्ण कला जोपासत असताना मूर्तिकाराने मातीची मूर्ती बनवायचे ठरवले तर ते दर भक्तगणाला परवडत नाहीत. त्यामुळे प्लास्टर पॅरिसला पसंती आहे. शिवाय, मुंबईत दीड ते अडीच तीन फुटपर्यंत मूर्तींची मागणी असल्याचे सार्थक आर्टचे मालक नंदकिशोर पाटील यांनी सांगितले.

हेही वाचा Dahi Handi 75 शहिदांच्या पत्नीचा साडी चोळी देऊन करणार सन्मान सुवर्णयोग तरुण मंडळ

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.