ETV Bharat / state

केरळ विमान दुर्घटना: मराठमोळे वैमानिक दीपक साठे यांचा मृत्यू, 'अशी' होती कारकीर्द

दीपक वसंत साठे हे गेल्या 15 वर्षांपासून एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून काम करत होते. १९८१ साली ते हवाईदलात वैमानिक म्हणून रुजू झाले होते. त्याआधी त्यांनी पुण्याच्या एनडीएतून प्रशिक्षण घेतले होते. २००३ पर्यंत त्यांनी हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून सेवा दिली. त्यानंतर २००३ मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर ते एअर इंडियामध्ये रुजू झाले.

दीपक वसंत साठे
दीपक वसंत साठे
author img

By

Published : Aug 8, 2020, 3:19 AM IST

Updated : Aug 8, 2020, 3:30 AM IST

मुंबई- काल एअर इंडियाच्या एका विमानाचा केरळ येथील करिपूर विमानतळावर आपघात झाला. या अपघातात 17 जाणांचा मृत्यू झाला असून विमानाचे मुख्य वैमानिक दीपक साठे यांचाही मृत्यू झाला आहे. मराठमोळे असलेले साठे हे कुशल वैमानिक होते. त्यांच्या मृत्यूने कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

दीपक वसंत साठे
दीपक वसंत साठे

दीपक वसंत साठे हे गेल्या 15 वर्षांपासून एअर इंडियामध्ये वैमानिक म्हणून काम करत होते. १९८१ साली ते हवाईदलात वैमानिक म्हणून रुजू झाले होते. त्याआधी त्यांनी पुण्याच्या एनडीएतून प्रशिक्षण घेतले होते. २००३ पर्यंत त्यांनी हवाईदलात लढाऊ वैमानिक म्हणून सेवा दिली. त्यानंतर २००३ मध्ये त्यांनी सेवानिवृत्ती घेतल्यानंतर ते एअर इंडियामध्ये रुजू झाले. सुरुवातीला अनेक वर्षे त्यांनी एअर इंडियाच्या ताफ्यातील मोठ्या आकाराचे 'एअरबस ३१०' हे विमान उडवले. त्यानंतर अलिकडेच ते बोईंग विमानावर स्थलांतरित झाले होते. केरळमधील अपघात हा बोईंग ७३७ विमानाचाच होता.

दीपक वसंत साठे
दीपक वसंत साठे

राष्ट्रीय सुरक्षा अकादमीची मानाची तलवार जिंकली होती

दीपक साठे हे हवाईदल अकादमीतील प्रशिक्षणात अग्रेसर होते. राष्ट्रीय सुरक्षा अकादमीची मानाची तलवार त्यावेळी त्यांनी जिंकली होती. २२ वर्षांच्या हवाईदलातील सेवेत ते हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेडमध्ये (एचएएल) चाचणी वैमानिक म्हणून काम करत होते. दरम्यान, त्यांच्यामागे पत्नी सूषमा, शंतनू आणि धनंजय यांच्यासह सुना, असा मोठा आप्त परिवार आहे. दोन्ही मुले सध्या परदेशात असल्याची माहिती मिळली आहे.

हेही वाचा - राज्य वन्यजीव मंडळाच्या विचारार्थ प्रस्तावासाठी ड्रोन सर्व्हे आवश्यक : मुख्यमंत्री

Last Updated : Aug 8, 2020, 3:30 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.