ETV Bharat / state

World Health Day 2023 : आपला दवाखान्यात आता फिजिओथेरपी, नेत्र चिकित्सा, मानसिक आरोग्य, दंत तपासणीही होणार

author img

By

Published : Apr 7, 2023, 6:03 AM IST

Updated : May 8, 2023, 1:30 PM IST

जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने आपला दवाखाना ही संकल्पना आता विस्तृत सेवा देणार आहे. या दवाखान्यांच्या माध्यमातून फिजिओथेरपीसह डोळ्यांचे विकार, मानसिक आरोग्यावरही उपचार करता येणार आहेत.

Aapla Dawakhana
Aapla Dawakhana

मुंबई - मुंबईकरांना घराजवळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पालिकेकडून हिंदु ह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना सुरू करण्यात आले आहेत. नवे ४४ दवाखाने सुरू झाल्याने या दवाखान्यांची संख्या १५१ झाली आहे. या दवाखान्यात आता फिजिओथेरपी, नेत्र चिकित्सा, मानसिक आजारांची पडताळणीसाठी मनशक्ती क्लिनिक सेवा तसेच १८ वर्ष वयावरील नागरिकांची दंत तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे.

aapla_davakhana
aapla_davakhana

सर्वांसाठी सुदृढ आरोग्य - जागतिक आरोग्य संघटनेची यंदाच्या अमृत महोत्सवी वर्षाची संकल्पना 'सर्वांसाठी सुदृढ आरोग्य' अशी आहे. याच अनुषंगाने पालिकेने आरोग्य विभागाच्यावतीने वेगवेगळ्या आरोग्य सेवांचा विस्तार करण्याचा निर्णय घेतला आहे. 'हिंदुह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना' योजनेमध्ये १०७ दवाखाने कार्यान्वित आहेत. जागतिक आरोग्य दिनाचे औचित्य साधून आता नवीन ४४ दवाखाने सुरू करण्यात आले आहेत. त्यामुळे आपला दवाखान्यांची एकूण संख्या आता १५१ इतकी झाली आहे. यामध्ये संपूर्ण मुंबई महानगरात मिळून २४ पॉलिक्लिनिक आणि डायग्नॉस्टिक केंद्र आहेत. तर १२७ दवाखाने आहेत.

हे उपचार केले जाणार - येत्या दोन महिन्यांमध्ये आपला दवाखानाच्या माध्यमातून फिजिओथेरपी आणि नेत्ररोग सेवा उपलब्ध होणार आहे. प्राथमिक आरोग्य स्तरावर मनशक्ती क्लिनिक ही सुविधा मुंबईकरांना ७ एप्रिलपासून उपलब्ध करून देण्यात येत आहे. त्यासाठी राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम अंतर्गत ५०० वैद्यकीय अधिकाऱ्यांना मानसिक आरोग्य सेवा सुविधा पुरवण्याबाबतचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. पॉलिक्लिनिकमध्येही लवकरच मानसोपचार सेवा उपलब्ध होणार आहेत. ज्या रुग्णांना गरज असेल त्या रुग्णांना मोठ्या रुग्णालयात उपचार करण्यासाठी पाठवले जाणार आहे.

मौखिक आरोग्य तपासणी - जागतिक आरोग्य संघटनेच्या 'स्टेप सर्वेक्षण २०२१' नुसार १३ टक्के मुंबईकर तंबाखूचे सेवन करतात. यामध्ये पुरूषांचे प्रमाण मोठे आहे. मुंबईतील ३० क्लिनिक आणि १५ पॉलिक्लिनिकमध्ये १८ वर्षांवरील सर्वांची दंतवैद्यांद्वारे तपासणी करण्यात येणार आहे. घशाच्या आजाराच्या रुग्णांची तपासणी करून रुग्णांना उपचारासाठी मोठ्या रुग्णालयात पाठवले जाणार आहेत. नागरिकांना आरोग्याच्या सुविधा कोणत्याही आर्थिक अडचणीशिवाय उपलब्ध व्हाव्यात, हे उद्दिष्ट असल्याची माहिती कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

हेही वाचा - Gautam Navlakha Bail rejected : गौतम नवलखा यांचा जामीन फेटाळला, विशेष एनआयए न्यायालयाचा निर्णय

Last Updated : May 8, 2023, 1:30 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.