ETV Bharat / state

रॅम्प वॉक करत दिव्यांग्यानी जिंकली उपस्थितांची मने

दिव्यांग विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळेल या हेतूने माटुंगा येथे त्यांच्या रॅम्प वॉक आणि नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यावेळी त्यांनी सर्व उपस्थितांची मने जिंकली.

author img

By

Published : Aug 17, 2019, 7:53 AM IST

रॅम्प वॉक करत दिव्यांग्यानी जिंकली उपस्थितांची मने

मुंबई - माटुंगा येथील आव्हान पालक संघ या दिव्यांग शाळेतील असामान्य मुलांनी अप्रतिम रॅम्प वॉक आणि नृत्य सादर केले. स्वयंसिद्धा महिला मंडळ आणि क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई तर्फे श्रावण महोत्सव शिरोडकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सामान्य महिलांसोबतच दिव्यांग महिलांना संधी देण्यात आली होती.

दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांनी सर्व धर्मातील देवी देवतांची वेशभूषा केली होती. कोणी गणपती, कोणी साईबाबाची वेशभूषा साकारली होती. त्यांचे नृत्य बघून सर्वांनी सभागृहात टाळ्यांचा गजरात विद्यार्थ्यांचे कौतुक केले. त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल या हेतूने त्यांना सहभागी करून घेण्यात आले होते.

आमच्या विद्यार्थ्यांना आज या व्यासपीठावर बघून खूप आनंद होत आहे. खर तर या मुलांमध्ये खूप गुण आहेत. मात्र, त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाहीत. आज त्यांना व्यासपीठ मिळाले आणि त्यांच्या कलागुणांना सर्वांसमोर आणण्याची संधी मिळाली, असे आव्हान पालक संघाच्या नृत्य शिक्षिका तनुजा भटसावळे यांनी सांगितले.

दरवर्षी आम्ही स्वयंसिद्धा महिला मंडळातर्फे श्रावण महोत्सवाचे आयोजन करतो. मात्र, यावेळी काही तरी वेगळे करण्याचा विचार करत आम्ही यावेळी दिव्यांग मुलींना व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांनी सादर केलेले सादरीकरण हे नक्कीच सामान्य महिलांपेक्षा कमी नव्हते, असे स्वयंसिद्धा महिला मंडळाच्या श्रृती लाड यांनी सांगितले.

Intro:मुंबई | आवाहन पालक संघ या माटुंगा येथील दिव्यांग शाळेतील असामान्य मुलांनी अप्रतिम रॅम्प वॉक आणि नृत्य सादर केले. परेल येथील शिरोडकर सभागृहात टाळ्यांचा मोठा कडकडाट झाला. स्वयंसिदधा महिला मंडळ आणि क्षात्रकुलोत्पन्न मराठा समाज मुंबई तर्फे श्रावण महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात सामान्य महिलांसोबतच दिव्यांग महिलांना संधी देण्यात आली होती. त्यांच्या कलागुणांना वाव मिळेल या हेतूने त्यांना सहभागी करुन घेण्यात आले होते.
Body:आवाहन पालक संघ या दिव्यांग शाळेतील विद्यार्थी वेगवेगळ्या वेशभूषा करून व्यासपीठावर आले होते. सर्व धर्मातील देवी देवतांचे वेशभूषा या विद्यार्थ्यांनी परिधान केले होते. कोणी गणपती तर कोणी साईबाबा झाले होते.

आमच्या विद्यार्थ्यांना आज या व्यासपीठावर बघून खूप आनंद होत आहे. खर तर या मुलांमध्ये खुप गुण आहेत मात्र त्यांना व्यासपीठ उपलब्ध होत नाहीत. आज त्यांना व्यासपीठ मिळाले आणि त्यांच्या कलागुणांना सर्वासमोर आणण्याची संधी मिळाली असे आवाहन पालक संघाच्या नृत्य शिक्षिका तनुजा भटसावळे यांनी सांगितले.

दरवर्षी आम्ही स्वयंसिदधा महिला मंडळातर्फे श्रावण महोत्सवाचे आयोजन करतो. मात्र यावेळी काही तरी वेगळे करण्याचा आम्ही विचार करत आम्ही यावेळी दिव्यांग मुलींना ही व्यासपीठ उपलब्ध करून दिले. त्यांनी सादर केलेले सादरीकरण हे नक्कीच सामान्य महिलांपेक्षा कमी नव्हते असे स्वयंसिदधा महिला मंडळाच्या श्रुती लाड यांनी सांगितले. Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.