ETV Bharat / state

सुशांतच्या बहिणींची याचिका फेटाळण्यात यावी; रिया चक्रवर्तीची उच्च न्यायालयाला विनंती

वांद्रे पोलिसांनी 7 सप्टेंबरला या दोघांविरुद्ध एफआयआर नोंदविला होता. प्रियंका सिंह आणि मितू सिंह यांनी या एफआयआरविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी नोंदविलेले एफआयआर रद्द करण्याची मागणी केली.

author img

By

Published : Oct 27, 2020, 10:08 PM IST

riya chakraborty
रिया चक्रवर्ती

मुंबई - अभिनेत्री रिया चक्रवर्तीने अभिनेता सुशांतसिंह राजपूतच्या बहिणी प्रियंका आणि मितू सिंह यांची याचिका फेटाळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाला विनंती केली आहे. मुंबई पोलिसांनी प्रियंका आणि मितू सिंह यांच्याविरूद्ध एफआयआर दाखल केला असून त्यांच्यावर आपला भाऊ सुशांतसाठी फसवणूक आणि बनावट प्रिस्क्रिप्शन (प्रिस्क्रिप्शन) खरेदी केल्याचा आरोप रिया चक्रवर्तीने केला आहे.

अभिनेत्री आणि सुशांतची मैत्रीण रिया चक्रवर्तीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे, वांद्रे पोलिसांनी 7 सप्टेंबरला या दोघींविरुद्ध एफआयआर नोंदविला होता. प्रियंका सिंह आणि मितू सिंह यांनी या एफआयआरविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यात त्यांनी नोंदविलेले एफआयआर रद्द करण्याची मागणी केली. यानंतर आता रियाने प्रियंका आणि मितू यांची याचिका फेटाळून लावण्यात यावी, अशी उच्च न्यायालयाला विनंती केली आहे.

दरम्यान, याचवर्षी 14 जूनला अभिनेता सुशांतसिंह राजपूतने मुंबईतील वांद्रे येथील आपल्या घरात गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणाची चौकशी सीबीआय करीत आहे. तर सुशांतसिंहच्या मृत्यूशी संबंधित अमली पदार्थाच्या बाबतीत रिया चक्रवर्तीला अटक करण्यात आली होती. तर 7 ऑक्टोबरला मुंबई उच्च न्यायालयाने तिचा जामीन मंजूर केला होता.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.