मुंबई : माजी मंत्री नवाब मलिक (against former minister Nawab Malik) यांनी शिवडी न्यायालयासमोर जमवलेल्या गर्दीमुळे कोरोना नियमाचे उल्लंघन झाल्यामुळे त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, याकरिता भाजप नेते मोहित कम्बोज यांनी याचिका दाखल केली होती. शिवडी न्यायालयाने कम्बोज यांची मागणी फेटाळल्यानंतर मुंबई सत्र न्यायालयात शिवडी न्यायालयाच्या निर्णय विरोधात याचिका दाखल करण्यात आली होती. मोहित कम्बोज (Petition filed by Mohit Kamboj) यांनी सत्र न्यायालयात केलेले याचिका मागे घेण्याकरिता केलेल्या अर्जावर काल निर्णय देणार होते. मात्र तक्रारदार हजर न झाल्याने कालही या अर्जावर निर्णय लांबणीवर पडला आहे. या अर्जावर 7 जानेवारी रोजी निर्णय होणार (Nawab Malik Further hearing 7 January 2023) आहे. त्यामुळे नवाब मलिक यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
विरोधात गुन्हा दाखल : आर्यन खान प्रकरणानंतर नबाब मलिक यांनी मोहित कंबोज यांच्यावर केलेल्या आरोपानंतर कंबोज यांनी शिवडी न्यायालयात नवाब मलिक यांच्या विरोधात मानहानीची याचिका दाखल केली होती. या याचिकेच्या सुनावणी दरम्यान नवाब मलिक यांनी शिवडी कोर्टात हजर झाले. त्यावेळी मोठ्या प्रमाणात समर्थक जमवले असल्याने त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी मोहित कंबोज यांनी केली होती.
ईडीने अटक : कुर्ला येथील जमीन आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात नबाब मलिक (Former Minister Nawab Malik) यांना ईडीने अटक केली आहे. सध्या नबाब मलिक हे न्यायालयीन कोठडीत असून न्यायालयाच्या परवानगीनुसार कुर्ल्यातील खाजगी रुग्णालयामध्ये त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मोहित कम्बोज यांनी मागे घेतलेल्या अर्जामुळे नवाब मलिक यांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
काय आहे याचिका : मोहित कम्बोज यांच्या याचिकेनुसार नवाब मलिक यांनी 29 नोव्हेंबर रोजी सुनावणी झालेल्या याचिके दरम्यान मोठ्या प्रमाणात समर्थक गोळा केले होते. याप्रकरणी नवाब मलिक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी याचिका मोहित कम्बोज यांनी दाखल केली होती. नवाब मलिक यांनी असे करून कोविड नियमांची, प्राकृतिक आपदा अधिनियमचे उल्लंघन केले आहे. आम्ही संबंधित पोलिसात तक्रार करून सुद्धा पोलिसानी काहीच दखल घेतली नाही म्हणून तयाच्या विरोधात आईपीसी कलम 156( 3 ) अंतर्गत गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश देण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली (Nawab Malik) होती.