मुंबई - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज लोकसभेमध्ये मोदी सरकारच्या दुसऱ्या इनिंगचा पहिला अर्थसंकल्प सादर केला. या बजेटमध्ये पेट्रोल-डिझेल यावरील अधिभार वाढवल्याने इंधन महागणार आहे. यामुळे वाहनचालक नाराज आहेत. याऊलट इलेक्ट्रिक वाहने, घरखरेदीतील सूट वाढवण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना थोडा दिलासा मिळाला आहे.
इंधनावर सरकारने १ टक्का सेस वाढवण्याचा निर्णय घेतल्याने इंधनाच्या दरात वाढ होणार आहे. देशातील प्रमुख तेल कंपन्या या दरांचा आढावा घेऊन यामध्ये बदल करत असतात. दररोज सकाळी सहा वाजता हे वाढलेले दर लागू होत असतात.
गाडी चालवायची आहे, तर पेट्रोल भरावे लागणार आहे. मात्र, सरकारने दर वाढवताना एकदा सर्वसामान्य माणसाचा विचार करणे गरजेचे होते. मात्र, सरकारने सर्वसामान्य माणसांची निराशी केली आहे. सरकार काँग्रेसचे असो की भाजपचे. मात्र, इंधनाचे दर काही कमी होताना दिसत नाही आहे. १ लीटरमागे १ रुपया वाढवल्यामुळेही खूप फरक पडत असल्याचे नागरिक म्हणाले.