ETV Bharat / state

Anandraj Ambedkar : वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या लोकांनी चैत्यभूमीवर येऊ नये; आनंदराज आंबेडकरांचा राज्यपालांना इशारा - Governor Bhagatsing Koshyari

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsing Koshyari) यांनी अनेक महान नेत्यांबद्दल विवादित वक्तव्य केले आहे. या महिन्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिवस (Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvana Day) येत आहे. या दिवशी तरी राज्यपाल कोश्यारी यांनी मुंबईतील चैत्यभूमीवर येऊ (should not come to Chaityabhoomi) नये. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, (latest news from Mumbai) असा इशाराच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी दिला आहे.

Anandraj Ambedkar
आनंदराज आंबेडकर
author img

By

Published : Dec 4, 2022, 10:47 PM IST

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagatsing Koshyari) यांच्यापासून सुरू झालेली राज्यातील वादग्रस्त वक्तव्यांची मालिका अद्यापही सुरूच आहे. त्यानंतर भाजपच्या अनेक नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी करणारी वक्तव्य केली आहेत. त्यातच आता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 66 वा महापरिनिर्वाणदिन (Dr Babasaheb Ambedkar Mahaparinirvana Day) येत आहे. या दिवशी अशा 'महान नेत्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य (People making controversial statements ) करणाऱ्या लोकांनी चैत्यभूमीवर येऊ (should not come to Chaityabhoomi) नये. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकतो, (latest news from Mumbai) असा इशाराच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर (Anandraj Ambedkar) यांनी दिला आहे.

आनंदराज आंबेडकरांचा राज्यपालांना इशारा

सभेसाठी शौचालयाच्या बाजूची जागा : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगभरातून त्यांच्या विचारांना मानणारे त्यांचे लाखो अनुयायी मुंबईतील दादर येथील चैत्यभूमीवर येत असतात. यात अनेक कार्यक्रम केले जातात. रिपब्लिकन पक्षांच्या छोट्या-छोट्या सभा देखील यावेळी होत असतात. अशातच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू आनंदराज आंबेडकर यांच्या रिपब्लिकन सेनेतर्फे 6 तारखेला एका छोट्या सभेच आयोजन करण्यात आले आहे. या सभेसाठी त्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिका व मुंबई पोलिसांकडे जागा मागितली होती. महानगरपालिकेने त्यांना सोयीची जागा दिली. मात्र, मुंबई पोलिसांनी एका शौचालयाच्या बाजूची जागा दिली. पोलिसांनी शौचालयाच्या बाजूची जागा दिल्यामुळे आनंदराज आंबेडकर यांनी आज पत्रकार परिषद घेत आपली नाराजी व्यक्त केली आहे.

हा बाबासाहेबांचा अपमान : यावेळी बोलताना बाबासाहेबांचे नातू व रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर म्हणाले की, "6 डिसेंबरला आम्हाला सभा घ्यायची आहे; पण या सभेसाठी पोलिसांकडून आम्हाला शौचालयाच्या बाजूची जागा देण्यात आली आहे. एका महापुरुषाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त घेण्यात येणाऱ्या सभेसाठी शौचालयाची जागा देणे म्हणजे हा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान आहे. आमची पोलिसांना विनंती आहे अद्याप देखील वेळ गेलेली नाही. त्यांनी आम्हाला सभेसाठी एक चांगली जागा द्यावी. राज्यात एका बाजूला महापुरुषांचा अपमान केला जातोय त्यातच आता पोलिसांकडून ही वागणूक मिळते. आमची विनंती आहे. एका महापुरुषाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त होणाऱ्या सभेसाठी पोलिसांनी आम्हाला चांगली जागा द्यावी.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.