मुंबई - मुंबईची शान म्हणून ओळखल्या जाणार्या आणि कायम गजबजलेल्या साडेतीन किमीच्या किनारपट्टीवर आज(रविवार) शुकशुकाट पसरला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या जनता कर्फ्यूला मुंबईकरांनी येथेही दाद दिली असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे.
मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलिसांकडून या ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून या परिसरात कोणताही नागरिक फिरू नये म्हणून वेळोवेळी गस्तही घालण्यात येत आहे. आज या साडेतीन किमीच्या किनारपट्टीवर लोकांनीच दाद दिली असल्याने याठिकाणी कोणीही फिरताना दिसत नाही. तरीही, आम्ही या परिसरात गस्त घालत असल्याची माहिती मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यातील पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांनी 'ईटिव्ही भारत'शी बोलताना दिली. लोकांनी आज आपली सामाजिक भूमिका बजावली असून त्यामुळे हा प्रतिसाद मिळत असल्याचेही कदम यांनी सांगितले.
हेही वाचा - जनता कर्फ्यूचा प्रभाव: पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक मंदावली
हेही वाचा - महाराष्ट्रात 'जनता कर्फ्यू' सुरू, मुंबई, नागपूर, पुण्यात कडकडीत बंद