ETV Bharat / state

खासगी रुग्णालयाकडून लूटमार; थेट आयएएस अधिकाऱ्यांकडे करा तक्रार, महापालिकेचे आवाहन

मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयातील सेवा सुविधांच्या अधिक प्रभावी समन्वयासाठी वर्ष २००७ च्या तुकडीतील सनदी अधिकारी मदन नागरगोजे व अजित पाटील, वर्ष २००८ च्या तुकडीतील राधाकृष्णन, वर्ष २००९ च्या तुकडीतील प्रशांत नारनवरे आणि वर्ष २०११ च्या तुकडीतील सुशील खोडवेकर यांचा समावेश आहे.

Mumbai Municipal Corporation
मुंबई महानगरपालिका
author img

By

Published : Jun 6, 2020, 10:20 PM IST

मुंबई - मुंबईत कोरोनाचे रुग्ण वाढत असताना खासगी रुग्णालयांकडून त्यांची लूट होत असल्याच्या तक्रारी नेहमीच समोर येत आहेत. यावर उपाय म्हणून पालिकेने खासगी रुग्णालयाकडून होणाऱ्या लूटमारीची तक्रार करता यावी, म्हणून आयएएस अधिकाऱ्यांची नावे आणि त्यांचा ईमेल जाहिर केला आहे. खासगी रुग्णालयांकडून लूटमार केली जात असल्यास मुंबईकरांनी थेट आयएएस अधिकाऱ्यांकडे तक्रार करावी, असे आवाहन पालिका प्रशासनाने केले आहे.

महापालिका क्षेत्रातील 'कोरोना'ची बाधा झालेल्या रुग्णांना वैद्यकीय सेवा सुविधा मिळाव्यात, याकरिता राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार खासगी रुग्णालयातील ८० टक्के खाटा महापालिकेने ताब्यात घेतल्या आहेत. या खाटांचे रुग्णांना वितरण करण्याचे काम पालिका करत आहे. मुंबई महापालिका क्षेत्रातील खासगी रुग्णालयातील सेवा सुविधांच्या अधिक प्रभावी समन्वयासाठी वर्ष २००७ च्या तुकडीतील सनदी अधिकारी मदन नागरगोजे व अजित पाटील, वर्ष २००८ च्या तुकडीतील राधाकृष्णन, वर्ष २००९ च्या तुकडीतील प्रशांत नारनवरे आणि वर्ष २०११ च्या तुकडीतील सुशील खोडवेकर यांचा समावेश आहे.

एखाद्या खासगी रुग्णालयाबाबत रुग्णांना किंवा रुग्णांच्या आप्तांना काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास या अधिकाऱ्यांकडे ईमेलद्वारे थेटपणे आपली तक्रार नोंदविता येणार आहे. त्याचबरोबर खासगी रुग्णालयांमध्ये सरकारी दरानुसारच शुल्क आकारणी केली जात असल्याची खातरजमा करण्यासाठी महापालिकेच्या मुख्य लेखापरीक्षक खात्यातील प्रत्येकी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती ही प्रत्येक खासगी रुग्णालयासाठी करण्यात आली आहे.

आयएएस अधिकारी, रुग्णालयांची नावे, ई मेल पत्ता -
मदन नागरगोजे यांच्याकडे बॉम्बे रुग्णालय, सैफी रुग्णालय, जसलोक रुग्णालय, ब्रीच कँडी रुग्णालय, एच. एन. रिलायन्स रुग्णालय, भाटिया रुग्णालय, काॅनवेस्ट व मंजुळा एस बदानी जैन रुग्णालय आणि एस.आर.सी.सी. या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या रुग्णालयांच्या अनुषंगाने काही तक्रार किंवा सूचना करावयाची असल्यास नागरगोजे यांचा ईमेल पत्ता पुढीलप्रमाणे आहे.
covid19nodal1@mcgm.gov.in

अजित पाटील यांच्याकडे मसिना रुग्णालय, वोक्हार्ट रुग्णालय, प्रिन्स अली खान रुग्णालय, ग्लोबल रुग्णालय, के जे सोमय्या रुग्णालय, गुरू नानक रुग्णालय आणि पी डी हिंदुजा रुग्णालय यांचे दायित्व सोपविण्यात आले आहे. पाटील यांचा ईमेल
covid19nodal2@mcgm.gov.in हा आहे.

राधाकृष्णन यांच्याकडे एस एल रहेजा रुग्णालय, लीलावती रुग्णालय, होली फॅमिली रुग्णालय, सेव्हन हिल्स रुग्णालय (रिलायन्स), बी.एस.इ.एस. रुग्णालय, सुश्रुषा रुग्णालय आणि होली स्पिरिट रुग्णालय या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
ई-मेल - covid19nodal5@mcgm.gov.in

सुशील खोडवेकर यांच्याकडे कोहिनूर रूग्णालय, हिन्दू सभा रुग्णालय, एस आर व्ही चेंबूर रुग्णालय, गॅलेक्सी मल्टीस्पेशालिटी रुग्णालय, एल एच हिरानंदानी रुग्णालय, सुराणा सेठिया रुग्णालय आणि फोर्टीस रुग्णालय या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. ई-मेल covid19nodal4@mcgm.gov.in

प्रशांत नारनवरे यांच्याकडे करूणा रूग्णालय, कोकिळाबेन रुग्णालय, संजीवनी रुग्णालय, नाणावटी रुग्णालय, अपेक्स रुग्णालय आणि अपेक्स सुपरस्पेशलिटी रुग्णालय या रुग्णालयांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. या रुग्णालयांविषयी काही तक्रार किंवा सुुचना करायाची असल्यास त्यासाठीचा ईमेल पत्ता पुढील प्रमाणे आहे. covid19nodal3@mcgm.gov.inConclusion:

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.