ETV Bharat / state

लोकल सबंधित आज होणार निर्णय; आणखी काही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासाची मिळणार मुभा? - लोकल प्रवास मुंबई

कोरोनामुळे मुंबईत फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा दिली आहे. मात्र, आज मंत्री मंडळाच्या बैठीकत अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त आणखी काही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबतीत निर्णय होऊ शकतो.

लोकल
लोकल
author img

By

Published : May 27, 2021, 11:36 AM IST

मुंबई - वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा सर्वसामन्य मुंबईकरांसाठी लोकलचे दार बंद केले आहे. फक्त अत्यावश्यक कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा दिली आहे. मात्र, आज मंत्री मंडळाच्या बैठीकत अत्यावश्यक कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त आणखी काही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना लोकल प्रवासात मुभा देण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

पत्रकारसंदर्भात होऊ शकतो निर्णय-

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला थोपविण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा 1 जून 2021 पर्यंत कडक लॉकडाऊन जाहीर केला आहे. त्यामुळे सर्वसामान्य मुंबईकरांसाठी लोकल सेवा बंद करण्यात आली. फक्त अत्यावश्यक सेवेतील मोडणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी लोकल सेवा सुरू आहे. ज्यामध्ये केंद्र, राज्य सरकार, पालिका कर्मचारी व त्यांच्या परिवहन सेवांचे कर्मचारी, रुग्णालय कर्मचारी आणि वैद्यकीय क्षेत्रातील कामगारांचा समावेश आहे. मात्र, आज राज्य सरकारच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये पत्रकार, वकिलांना आणि आणखी काही क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना आज लोकल प्रवासात मुभा देण्याची घोषणा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण गेल्या काही दिवसांपासून पत्रकारांना लोकल प्रवासाची मुभा देण्याची मागणी आणि फ्रंटलाईन वर्क्सचा दर्जा देण्याची मागणी मंत्रिमंडळातील काही नेतेमंडळींनी मुख्यमंत्र्याकडे केली होती. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या बाबत मोठा निर्णय होऊ शकते.

मुंबईकरांना लोकलची प्रतीक्षा?

राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांना माध्यमांनी लोकल सबंधित प्रश्न विचारले असता त्यांनी सांगितले की, कोरोना रुग्ण संख्या कमी होत असली तरी लोकलमध्ये होणारी गर्दी पाहता सर्वसामान्यांसाठी मुंबईचे लोकलचे दरवाजे अजून पुढील पंधरा दिवसांसाठी उघडले जाणार नाही. लोकलमध्ये फिजिकल डिस्टन्सिंग नियम पाळणे शक्य नाही. त्यामुळे कोरोनाचा पुन्हा एकदा उद्रेक होऊ शकतो. म्हणून फक्त अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी लोकलसेवा सुरू ठेवणार आहे. तर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी सांगितले की, मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या कमी होत आहे. मात्र, जेव्हापर्यंत मुंबईतील नागरिकांचे 50 टक्के लसीकरण होत नाही तेव्हापर्यंत लोकल सेवा सुरू करणे शक्य नाही.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.