मुंबई - सीएसएमटी येथे गुरुवारी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास हिमालया पादचारी पूल कोसळला. पादचारी पुलाचा सिमेंटचा संपूर्ण स्लॅब खाली कोसळल्याने यात ६ जणांचा मृत्यू झाला तर ३४ जण जखमी झाले. अचानक घडलेल्या थरारक घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला.
अपूर्वा प्रभू, रंजना तांबे, झाहीद रशिद खान, सारिका कुलकर्णी आणि तपेंद्र सिंह अशी मृतांची नावे आहेत. यापैकी अपूर्वा आणि रंजना या परिचारीका म्हणून कार्यरत होत्या. काहीजण या पूलावरून जात असताना अचानक पूल कोसळला. त्यामुळे सर्वजण खाली कोसळले. यामध्ये ३४ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका ४ वर्षांच्या चिमुरडीचा समावेश आहे. जखमींवर सेंट जॉर्ज आणि जी. टी. रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
सायंकाळी ७.३५ वाजण्याच्या सुमारास सीएसटीएमटी रेल्वे स्थानकात लोकल पकडण्यासाठी प्रवाशांची धावपळ सुरू होती. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणाऱ्या पुलाचा मोठा भाग अचानक कोसळला आणि एकच धावपळ उडाली. या पादचारी पुलावरून जाणारे लोक स्लॅबसह खाली कोसळले. या दुर्घटनेत ५ जणांचा मृत्यू झाला. यात ३ महिलांचा समावेश आहे, तर ३४ जखमी झाल्याची माहिती अग्निशमन दलाने दिली.
दादाभाई नौरोजी मार्गावर नेहमी वाहनांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. या मार्गावरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि टाइम्सच्या इमारतीला जोडणाऱ्या पुलावरून रेल्वे स्थानकात ये-जा करणाऱ्यांची रोज मोठी गर्दी असते. सायंकाळी अनेकजण या पुलावरून घरी परतत असतानाच हा पुल कोसळला. यावेळी नेमका सिग्नल बंद असल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, पुलाखाली एक टॅक्सी सापडली. टॅक्सीचा चालक वाचला. टॅक्सीचे मात्र मोठे नुकसान झाले.
पूल कोसळताना मोठा आवाज झाला. लोकांच्या किंकाळ्या दूरवर ऐकायला आल्या. त्यानंतर काही क्षणातच पोलिसांनी तातडीने धाव घेऊन मदत कार्य सुरू केले. ५ मिनिटातच अग्निशमन दलाच्या जवानांनी दुर्घटनास्थळी पोहोचून जखमींना तात्काळ जीटी व सेंटजॅार्ज रुग्णालयात हलवले. दुर्घटना घडताच पोलिसांनी या मार्गावरची वाहतूक बंद केली व तातडीने ढिगारा उपसण्याचे काम सुरू केले. त्यानंतर एनडीआरएफच्या जवानांनी तातडीने धाव घेऊन अग्निशमन दलासोबत त्यांनीही मदतकार्य सुरू केले.
२ वर्षांपूर्वी पुलाच्या दुरुस्ती आणि ऑडीटसंदर्भात निवेदन दिले होते. रेल्वे प्रशासनालाही पत्रव्यवहार केला होता. मात्र, याकडे दुर्लक्ष करण्यात आले. रेल्वे प्रशासन या दुर्घटनेला जबाबदार असल्याचा आरोप स्थानिक नगरसेविका सुजाता सानप यांनी केला.
रुग्णसेविकांचा मृत्यू
अपूर्वा प्रभू (४०) आणि रंजना तांबे (३५) या दोघी जीटी रुग्णालयात परिचारिका म्हणून कार्यकत होत्या. सांयकाळी साडेसात वाजता त्या काम संपवून घरी निघाल्या होत्या. त्या पुलावर आल्या असता अचानक पुल कोसळला. या दुर्घटनेत अपूर्वा आणि रंजना या दोघींचा मृत्यू झाला. रुग्णांची सेवा करणाऱ्या या परिचारिकांवर काळाने घाला घातल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
जखमींची नावे
१) सोनाली नवले (३०), २) अद्वित नवले (३), ३) राजेंद्र नवले (३३), ४) राजेश लोखंडे (३९), ५) तुकाराम येडगे (३१), ६) जयेश अवलनी (४६), ७) मोहन कायंदे (४०), ८) महेश शेरे, ९) अजय पंडीत (३१), १०) हर्षदा वाघले (३५), ११) विजय भागवत (४२), १२) परशुराम पवार,१३) मुंबलीक जैसवाल, १४) मोहन मोझदा (४३), १५) निलेश पटावकर, १६) अनोळखी (३२), १७आयुशी रांखा (३०), १८) सिराज खान (५५), १९) राम कुप्रेजा (५९), २०) राजेदास दास (२३), २१) सुनिल गिरलोटकर (३९), २२) अनिकेत जाधव (१९), २३) अभिजित माना (२१), २४) राजकुमार चावला (४९), २५) सुभाष बॅनर्जी (३७), २६) रवी लागशेट्टी (४०), २७) नंदा विठ्ठल कदम (५६), २८) राकेश मिश्रा (४०), २९) अत्तार खान (४५), ३०) सुजय माजी (२८), ३१) कानूभाई सोळंखी (४७), ३२) दिपक पारेख