ETV Bharat / state

राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांना कोरोनाचाचणी बंधनकारक नाही

राज्यातील नागरिकांच्या समस्या कमी करण्यासाठी राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही विमान प्रवाशाला आता यापुढे प्रवासादरम्यान आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक नसेल. मात्र, ती व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.

राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्या विमान प्रवाशांना कोरोना चाचणी बंधनकारक नाही 

author img

By

Published : Jun 2, 2021, 8:07 PM IST

मुंबई - कोरोनाचा प्रसार असल्याने विमान प्रवाशाला विमानतळावर आल्यावर आरटीपीसीआर चाचणी करावी लागत होती किंवा चाचणी अहवाल निगेटिव्ह असल्याचा अहवाल द्यावा लागत होता. मात्र त्यामुळे राज्यातील इतर जिल्ह्यातून येणाऱ्या प्रवाशांना त्याचा त्रास सहन करावा लागत होता. राज्यातील नागरिकांच्या समस्या कमी करण्यासाठी राज्यांतर्गत प्रवास करणाऱ्या महाराष्ट्रातील कोणत्याही विमान प्रवाशाला आता यापुढे प्रवासादरम्यान आरटी-पीसीआर चाचणी करणे बंधनकारक नसेल. मात्र, ती व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक आहे, असे मुंबई महापालिकेने स्पष्ट केले आहे.

राज्यातंर्गत विमान प्रवाशांना चाचणीतून सूट
देशभरात कोरोनाचा प्रसार आहे. त्यासाठी ज्या राज्यात कोरोनाचा रुग्ण अधिक आहेत, त्या राज्यातील नागरिकांना विमान प्रवास करून मुंबईमध्ये आल्यास आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक करण्यात आले होते. त्यानुसार मुंबई विमानतळावर उतरलेल्या राज्यांतर्गत, देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान प्रवाशांची कोरोनाचाचणी पालिकेच्या पथकाकडून नियमित केली जाते. मात्र, आता यातून राज्यातंर्गत प्रवास करणाऱ्या प्रवाशांना सूट देण्यात आली आहे. मात्र, ती व्यक्ती महाराष्ट्राची रहिवासी असणे आवश्यक असणार आहे.

यासाठी घेतला निर्णय -
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमानतळांवर महापालिकेचे विशेष पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. या पथकाकडून प्रवाशांची कोरोनाचाचणी केली जाते. यावेळी महाराष्ट्रातून महाराष्ट्राच्या इतर भागांत प्रवास करणाऱ्यांनाही आरटी-पीसीआर चाचणी बंधनकारक करण्यात आल्याने प्रवाशांना प्रवासादरम्यान अनेक अडचणींना सामोरे जावे लागत होते. त्यामुळे यापुढे राज्यांतर्गत प्रवाशांना विमानतळांवर आरटी-पीसीआर चाचणी करणे किंवा आधी करण्यात आलेल्या कोरोनाचाचणीचे प्रमाणपत्र दाखवणे बंधनकारक नसेल अशी सुधारित नियमावली पालिका आयुक्त इकबालसिंह चहल यांनी जारी केली आहे.

या राज्यातील प्रवाशांची चाचणी -
देशभरात कोरोनाचा प्रसार असल्याने एका राज्यातून दुसऱ्या राज्यात विमान प्रवास करताना कोरोनाचाचणी करावी लागते. मुंबईमध्ये गोवा, गुजरात, दिल्ली, राजस्थान, चेन्नई या राज्यातून येणाऱ्या प्रवाशांना आरटीपीसीआर चाचणीचे निगेटिव्ह अहवाल आणावे लागतात. असे अहवाल नसल्यास त्या प्रवाशांची विमानतळावर चाचणी केली जाते. अशीच चाचणी राज्यातील प्रवाशांची केली जाते. त्यामधून आता सूट देण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.