ETV Bharat / state

नवी मुंबई विमानतळ नामंतर मोर्चात मनसे आमदार राजू पाटील, दि.बा.पाटलांच्या नावाला दिले समर्थन

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे, या मागणीने प्रकल्पग्रस्तांनी काढलेल्या मोर्चात मनसे नेते राजू पाटील हे सहभागी झाले. तर या अगोदर मनसे नेते राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले जावे असे म्हटले होते. त्यामुळे मनसेच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण केला जात आहे.

Participated in manse leader Raju Patil march of renaming Mumbai Airport
मनसेचे नेते राजू पाटील मोर्चात सहभागी
author img

By

Published : Jun 24, 2021, 12:54 PM IST

मुंबई - नवी मुंबई मधील विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे नेते दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे म्हणून मोर्चा काढण्यात आला आहे. आज (गुरुवार) निघालेल्या मोर्चामध्ये मनसे नेते आणि पक्षाचे एकमेव आमदार राजू पाटील सहभागी झाले आहेत. तर या अगोदर मनसे नेते राज ठाकरे यांनी नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव दिले जावे असे म्हटले होते. याबद्दल आमदार पाटील यांना विचारले असता, मोर्चाची ताकद वाढवण्यासाठी आपण या मोर्चात सहभागी झाल्याचे आमदार पाटील यांनी म्हटले आहे.

मनसेचे नेते राजू पाटील मोर्चात सहभागी

राज ठाकरे यांनी तांत्रिक बाजू मांडली होती - राजू पाटील

नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव दिले जावे, या मागणीने प्रकल्पग्रस्तांनी काढलेल्या मोर्चात मनसे नेते राजू पाटील सहभागी झाले. त्यामुळे एकंदरीत राज ठाकरे यांच्या भूमिकेवर राजू पाटील ठाम नसल्याचे म्हटले जात आहे. मात्र यावर उत्तर देताना राजू पाटील यांनी म्हटले आहे की, मनसे नेते राज ठाकरे यांनी तांत्रिक गोष्ट समजावून सांगत असताना सांगितले होते की, नवी मुंबईतील विमानतळाचा कोड जर बदलला जाणार नसेल तर त्याचे नाव छत्रपती शिवाजी महाराज असेच राहील. याचे कारण, भारतात असलेल्या विमानतळांना त्यांचे सांकेतिक कोड दिलेले असतात. मुंबई विमानतळाचा सांकेतिक कोड हा BOM असून जर नवी मुंबई विमानतळाचा कोड तोच राहणार असेल तर त्याचे नाव बदलले जाणार नाही, असे आमदार राजू पाटील यांनी म्हटले आहे. मात्र जर कोड बदलला जात असेल तर त्याचे नावही बदलले जाईल असे म्हणत आपण मनसे तर्फे या मोर्चाला पाठिंबा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

भाजप नेत्यांनी भूमिका स्पष्ट करावी -

राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका व राजू पाटील यांनी घेतलेल्या मोर्चातील सहभागामुळे विरोधकांकडून संभ्रम निर्माण केला जात आहे. मी मनसेचा नेता आहे आणि या नात्याने मी या मोर्चामध्ये सहभागी झाल्याचे त्यांनी म्हटलेले आहे. नवी मुंबई विमानतळाचा कोड काय असणार आहे. याबद्दल केंद्राकडून अद्यापही स्पष्टीकरण आलेले नसून भाजप नेत्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी. अशी मागणी राजू पाटील यांनी केली आहे.

वाचा काय म्हणाले होते राज ठाकरे -

नवी मुंबई विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचेच नाव - राज ठाकरे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.