ETV Bharat / state

Pankaja Munde : पंकजा मुंडे म्हणतात मी भाजपची पण भाजप माझी थोडीच, राष्ट्रवादी शिवसेनेने धाडसी निर्णय घेण्याचा दिला सल्ला - भाजपलाच चपराक

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी त्यांच्या वक्तव्यातून पक्षावर नाराजी व्यक्त केल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. पंकजा मुंडे म्हणतात मी भाजपची पण भाजप माझी थोडीच. मात्र त्यांच्या या वक्तव्याचा विपर्यास होत असल्याचे स्पष्ट केले आहे.

Pankaja Munde
Pankaja Munde
author img

By

Published : Jun 1, 2023, 10:35 PM IST

मुंबई - पंकजा मुंडे यांची भाजपमध्ये घुसमट होत असल्याचे संकेत त्यांच्या वक्तव्यातून अनेकदा मिळाले आहेत. त्यांनी केलेली सूचक वक्तव्ये ही गोष्ट अनेकदा अधोरेखित करुन गेली आहेत. आता त्यांचे नुकतेच केलेले एक वक्तव्य गाजत आहे. त्यामध्ये त्या म्हणाल्या आहेत की, 'मी भाजपची पण भाजप माझी थोडीच'. आता हे वक्तव्य मोठ्या चर्चेचा विषय झाले आहे.

भाजपमध्ये सर्वकाही अलबेल नाही : पंकजा मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर भाजपमध्ये सर्वकाही अलबेल नाही हेच दिसून येत आहे. त्याचवेळी पंकजा मुंडे यांची एकप्रकारे नाराजी मांडलेली दिसत आहे. आपली खंत व्यक्त करतानाच गोपीनाथ मुंडे यांनी पक्षासाठी काम केले. त्याची फळे आता सत्तेच्या निमित्ताने चाखायला मिळत आहेत, ही बाबही त्यांनी बोलून दाखवली आहे. दिल्लीतील एका कार्यक्रमात पंकजा मुंडे यांनी केलेल्या या वक्तव्यांवर प्रतिक्रिया आणि पडसादही उमटत आहेत.

मुंडे यांना थेट पक्षात येण्याचीच ऑफर : राष्ट्रवादी काँग्रेसने तर पंकजा मुंडे यांना थेट पक्षात येण्याचीच ऑफर दिली आहे. पक्षाचे नेते अनिल देशमुख यांनी, पंकजा मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायचे असेल तर बीड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे आणि इतर स्थानिक नेत्यांसोबत चर्चा करून त्यावर निर्णय घेतला जाईल, असे म्हटले आहे. ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांनी त्यांची नाराजी उघडपणे अनेकदा बोलून दाखवली आहे. एकदा तर त्या म्हणाल्या होत्या की, मी जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आहे. त्यावेळी भाजपचे सरकार होते. त्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत असल्याची जोरदार चर्चा होती. त्यानंतर काय झाले हा सगळा इतिहास आहे.

भाजपलाच चपराक - एकीकडे पंकजा मुंडे यांची नाराजी उघड होतानाच भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी कुस्तीपटूंच्या आंदोलनाबाबत घेतलेली भूमिका भाजपलाच चपराक देणारी आहे. यावरुन दोघी मुंडे भगिनी अस्वस्थ असल्याचे दिसत आहे. त्याहीपुढे जाऊन, आम्हाला आयुष्यात कोणत्याही गोष्टीची आस्था, अपेक्षा आणि लालसा नाही, असेही खळबळजनक वक्तव्य करुन बोलताना आपल्याला भीती वाटत नाही असेही त्या म्हणाल्या आहेत.

त्यांना भाजप आपले मानत नाही - शिवसेना नेते खा. संजय राऊत प्रतिक्रिया देताना म्हणाले आहेत की, पंकजा मुंडे भाजपमध्ये आहेत, पण त्यांना भाजप आपले मानत नाही. गोपीनाथ मुंडे यांनी राज्यात भाजपसाठी जीवाचे रान केले. मात्र मुंडे कुटुंबाचे अस्तित्त्व राजकारणात राहू नये, यासाठी दिल्ली आणि महाराष्ट्रात मोठ्या हालचाली सुरु आहेत, हे सर्वश्रुत आहे. आता मुंडे कुटुंबातील प्रमुख लोकांनी निर्णय घेणे गरजेचे आहे, असे राऊत म्हणाले आहेत. काहीही असले तरी आमची मुंडे परिवाराविषयी आस्था कायम राहील, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या प्रतिक्रिया आल्या आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी आजच यावर प्रतिक्रिया देताना त्यांच्या वक्तव्याचा विपर्यास केल्याचे म्हटले आहे.

हेही वाचा - Pankaja Munde : पंकजा मुंडेंच्या नाराजी नाट्यावर भाजप प्रदेशाध्यक्षांचे मोठे विधान; म्हणाले, त्या भाजपमध्ये नाराज...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.