ETV Bharat / state

पंकजा मुंडेंसोबत भाजपचे 'हे' नेते बंडाच्या तयारीत? गोपीनाथ गडावर होणार शक्तीप्रदर्शन - पंकजा मुंडेंची फेसबुक पोस्ट

भाजपमधील काही नेते बंड पुकारणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडूनही अनेकवेळा टीका देखील झाली आहे. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर भाजपमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. आता पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार? त्यामध्ये एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता यांचा किती सहभाग असेल? याविषयी चर्चा सुरू आहे.

pankaja munde
पंकजा मुंडे
author img

By

Published : Dec 3, 2019, 6:01 PM IST

Updated : Dec 3, 2019, 8:21 PM IST

मुंबई - विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर राज्यात सत्ता परिवर्तनाची नांदी झाली. त्यातच भाजपमधील अंतर्गत नाराजीमुळे काही नेत्यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्टनंतर एकनाथ खडसे यांनी रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांच्या पराभवाला पक्षातील अंतर्गत कारवाया कारणीभूत असल्याचा दावा केला आहे. त्यातच माजी आमदार प्रकाश मेहता देखील नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे पंकजा यांच्यासोबत खडसे आणि मेहता देखील गोपीनाथा गडावर हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंकजांच्या नेतृत्वाखाली नवा गट उदयास येण्याची शक्यता आहे. त्यातच माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी देखील पंकजांची भेट घेतली आहे.

पंकजा मुंडेंसोबत भाजपचे 'हे' नेते बंडाच्या तयारीत?

भाजपमधील काही नेते बंड पुकारणार असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. भाजपच्या राज्यातील नेतृत्वावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडूनही अनेकवेळा टीका देखील झाली आहे. मात्र, गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर भाजपमध्ये सर्वकाही अलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. त्यातच शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंकजाच नाही, तर अनेक नेते संपर्कात असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषद घेऊन 'पंकजा मुंडे असा काही निर्णय घेणार नाही,' असा खुलासा करावा लागला.

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यानंतर या विषयावरील चर्चा थांबेल असे चिन्ह होते. मात्र, पक्षातील काही लोकांनी कुरघोड्या करून विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या उमेदवारांना पाडले आहे. त्यामुळेच रोहिणी खडसे आणि पंकजा मुंडे यांचा पराभव झाला असल्याचे काही समर्थकांचे म्हणणे आहे, असा दावा एकनाथ खडसे यांनी केला. पक्षाच्या उमेदवारांविरोधात कुरघोड्या करणाऱ्या लोकांची नावे पुराव्यासहित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवली. तसेच कारवाई करण्याची मागणी केली असल्याचेही खडसेंनी सांगितले. त्यामुळे पुन्हा भाजपमध्ये सर्व काही अलबेल नसल्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत.

विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे या नेत्यांचे तिकीट कापले होते. त्यामुळे पंकजांसोबत हे नेते देखील राज्यातील पक्ष नेतृत्वावर नाराज असल्याचे बोलले जात आहे. त्यावर प्रकाश मेहता यांनी प्रथमच भाष्य केले आहे. पक्षश्रेष्ठींकडे आपली भूमिका मांडली आहे. त्यातून प्रश्न सुटतील, असे ते म्हणाले. मात्र, विशेष म्हणजे प्रकाश मेहताही गोपीनाथ गडावर जाणार असल्याचे बोलले जात आहेत. आता पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार? त्यामध्ये एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता यांचा किती सहभाग असेल? याविषयी चर्चा सुरू आहे.

Intro:Body:mh_pankaja_munde_bjp_mumbai_7204684
पंकजा मुंडें बंडाच्या पवित्र्यात?; गोपीनाथ गडावर होणार शक्तीप्रदर्शन

मुंबई: विधानसभा निवडणूक निकालानंतर राज्यात सत्ता परिवर्तनाची नांदी झाली आहे त्यातच भाजप अंतर्गत नाराज यांनी बंडाचे निशाण फडकावले आहे. पंकजा मुंडे यांच्या फेसबुक पोस्ट नंतर एकनाथ खडसे गोपीनाथ गडावर जाणार भाजपाच्या नेत्या आणि राज्याच्या माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर भाजपातील सुंदोपसुंदी बाहेर येऊ लागली आहे. पुढे काय करायचं याचा विचार करण्यासाठी वेळ द्या आणि १२ डिसेंबरला आपण निर्णय सांगू असं पंकजा म्हणाल्या आहेत. विशेषतः भाजपाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी पंकजा मुंडेंच्या पराभवामागे पक्षातील लोक असल्याचा दावा केला आहे. दोघांच्याबरोबर आता माजी प्रकाश मेहताही नाराज असून, खडसे आणि मेहता गोपीनाथ गडावर हजर राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे पंकजांच्या नेतृत्वाखाली नवा गट उदयास येण्याची शक्यता आहे. माजी मंत्री बबनराव लोणीकर यांनी आज पंकजा मुंडे यांची भेट घेऊन एक संदेश दिला आहे.

सत्तेवरून पायउतार झालेल्या भाजपातील काही नेते बंडाचे हाती घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा काही दिवसांपासून सुरू होती. भाजपाच्या राज्यातील नेतृत्वावर ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्याकडूनही अनेकवेळा टीका झाली आहे. मात्र, स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या कन्या आणि माजी ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी फेसबुकवर पोस्ट टाकल्यानंतर भाजपात सर्वकाही आलबेल नसल्याची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी पंकजाच नाही, तर अनेक नेते संपर्कात असल्याचं सांगितल्यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना पत्रकार परिषद घेऊन “पंकजा मुंडे असा काही निर्णय घेणार नाही,” असा खुलासा करावा लागला.

त्यामुळे यावरची चर्चा थांबण्याची चिन्ह दिसत असतानाच “पक्षातील काही लोकांनी कुरघोड्या करुन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपाच्या उमेदवारांना पाडलं आहे. रोहिणी खडसे यांचा त्यामुळेच पराभव झाला. पंकजा मुंडे यांच्या समर्थकांचही असचं म्हणणं आहे,” असा दावा एकनाथ खडसे यांनी केला आहे. “पक्षाच्या उमेदवारांविरोधात कुरघोड्या करणाऱ्या अशा लोकांची नावं पुराव्यासहित पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडे पाठवून कारवाई करण्याची मागणी केली आहे,” असंही ते म्हणाले. त्याचबरोबर १२ डिसेंबरला आपण गोपीनाथ गडावर जाणार असल्याचं खडसे यांनी सांगितलं.

पंकजा मुंडे यांच्याबरोबर विनोद तावडे, प्रकाश मेहता, चंद्रशेखर बावनकुळे हे नेतेही तिकीट कापण्यात आल्यामुळे पक्षाच्या राज्यातील नेतृत्वावर नाराज आहेत. त्यावर प्रकाश मेहता यांनी प्रथमच भाष्य केलं आहे. पक्षश्रेष्ठीकडं आपली भूमिका मांडली आहे. त्यातून प्रश्न सुटतील असं त्यांनी म्हटलं आहे. मात्र, विशेष म्हणजे प्रकाश मेहताही गोपीनाथ गडावर जाणार असल्याचं बोललं जात आहेत. आता पंकजा मुंडे नेमकी काय भूमिका घेणार आणि त्यात एकनाथ खडसे आणि प्रकाश मेहता यांचा किती सहभाग असेल याविषयी
चर्चा सुरू आहे.

Conclusion:
Last Updated : Dec 3, 2019, 8:21 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.