मुंबई : पालक पनीर चीला बनवण्यासाठी अगदी सोपा आहे. अटचानक पाहूने आल्यावर तो नक्कीच बनवून पाहूण्यांना नाश्त्याला देऊ शकतात. सध्या हिवाळा सुरू आहे. थंडीत अनेकांना नवनवे पदार्थ खावेसे वाटतात. अशा परिस्थितीत घरातील लोक रोज काही ना काही खास पदार्थाची मागणी करतात. अशा स्थितीत तुम्हाला नक्कीच चविष्ट आणि लगेच तयार होऊ शकतील असे काहीतरी बनवावेसे वाटेल. त्यामुळे तुमची इच्छा असल्यास, सकाळी नाश्त्यामध्ये पालक पनीर चिला तयार करू ( Palak Paneer Chilla Breakfast ) शकता. चला तर मग जाणून घेऊया पालक पनीर चीला बनवण्याची रेसिपी ( palak paneer chilla recipe ) .
पालक पनीर चीला साहित्य : दोन वाट्या बेसन, दोन वाट्या मूग डाळ रात्रभर भिजवून, सोबत पालक, लाल तिखट, १०० ग्रॅम पनीर, चाट मसाला, गरम मसाला, चवीनुसार मीठ, तेल इत्यादी साहित्य पालक पनीर चीला बनवण्यासाठी ( Palak Paneer Cheela Ingredient ) वापरतात.
पालक पनीर चिला कसा बनवायचा : पालक पनीर चिला बनवण्यासाठी मूग डाळ रात्रभर भिजत ( How to make Palak Paneer Chilla ) ठेवा. सकाळी बारीक करून त्याची पेस्ट बनवा. सोबतच पालक पाण्यात टाकून उकळा. आता एका मोठ्या भांड्यात बेसन घ्या. मूग डाळ पेस्ट एकत्र मिक्स करा. पालकाची उकडलेली पाने बारीक करून पेस्ट बनवा. ही पालक पेस्टही एकत्र मिक्स करा. आता त्यात मीठ, लाल तिखट, गरम मसाला घालून मिक्स करा. पनीर हाताने मॅश करा किंवा किसून घ्या. आता चाट मसाला आणि लाल तिखट घालून मिक्स करा. चवीनुसार थोडे मीठ घालावे. आता गॅसवर नॉनस्टिक तवा गरम करा. तवा गरम झाल्यावर त्यात पालक आणि मूग डाळीची पेस्ट घालून पसरवा. एका बाजूने शिजल्यावर हलक्या हाताने पलटून घ्या. दोन्ही बाजूंनी भाजल्यावर पनीरचे मिश्रण घालून ते रोल करा. आता तुमचा पालक पनीर चिला तयार झाला. हिरवी चटणी किंवा गोड चटणीसोबत सर्व्ह करा.