ETV Bharat / state

दादरच्या गुरुद्वारात 'ऑक्सिजन लंगर', १० लाखांपेक्षा जास्त लोकांना दिले जेवण - Guru Singh Sabha Gurudwara Ration Help

कोरोनाच्या वेगाने वाढणार्‍या संसर्गामुळे नागरिक रुग्णालयात बेड, औषधी आणि ऑक्सिजन न मिळाल्याच्या समस्यांशी झगडत आहेत. अशात दादर येथील श्री. गुरू सिंग सभा गुरुद्वारा समितीने कोरोना संक्रमित रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. गरजूंसाठी धान्यवाटप, तर दुसरीकडे ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था त्यांनी केली आहे.

Oxygen Cylinder Distribution Guru Singh Sabha Gurudwara
ऑक्सिजन सिलिंडर व्यवस्था दादर गुरुद्वारा
author img

By

Published : May 10, 2021, 3:43 PM IST

Updated : May 10, 2021, 3:50 PM IST

मुंबई - कोरोनाच्या वेगाने वाढणार्‍या संसर्गामुळे नागरिक रुग्णालयात बेड, औषधी आणि ऑक्सिजन न मिळाल्याच्या समस्यांशी झगडत आहेत. अशात दादर येथील श्री. गुरू सिंग सभा गुरुद्वारा समितीने कोरोना संक्रमित रुग्णांसाठी मदतीचा हात पुढे केला आहे. गरजूंसाठी धान्यवाटप, तर दुसरीकडे ऑक्सिजन सिलिंडरची व्यवस्था त्यांनी केली आहे. याबाबत 'ईटीव्ही भारतचा' विशेष रिपोर्ट.

माहिती देताना ईटीव्ही भारत प्रतनिधी, श्री गुरु सिंग सभा गुरुद्वाराचे अध्यक्ष आणि रुग्णाचे नातेवाईक

हेही वाचा - राज्यातील पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

विनामुल्य ऑक्सिजन लंगर सेवा

ऑक्सिजन अभावी रुग्णांचे हाल होऊ नयेत, रुग्णांचे आरोग्य जपता यावे, त्यांना वेळेत ऑक्सिजन मिळावे यासाठी दादर पूर्व येथील श्री. गुरू सिंग सभा गुरुद्वारा समितीने पुढाकार घेतला असून विनामुल्य ऑक्सिजन लंगर सेवा सुरू केली आहे. त्यामुळे, अनेक रुग्णांना दिलासा मिळत आहे. एकीकडे ऑक्सिजन अभावी कोणाचे हाल होऊ नयेत त्यांना ऑक्सिजन वेळेत मिळावेत यासाठी सेवा पुरवित असताना दुसरीकडे कोणी उपाशी राहू नये याची दखल घेत गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा देखील गुरुद्वाराच्या वतीने करण्यात येत आहे. गरजूंना वेळेत ऑक्सिजन मिळावे यासाठी छोटे आणि जम्बो, असे एकूण 80 ऑक्सिजन सिलिंडर खरेदी केले असून अजूनही ऑक्सिजन सिलिंडर मागविले असल्याचे श्री. गुरु सिंग सभा गुरुद्वाराचे अध्यक्ष रघबीर सिंग गिल यांनी सांगितले.

आपुलकीची आदराची वागणूक

आतापर्यंत 100 हून अधिक गरजूना ऑक्सिजन सेवा पुरविण्यात आल्याचे गुरुद्वाराचे सचिव बलबीर सिंग बाथ यांनी सांगितले. गेली 100 वर्षांची परंपरा असलेल्या दादर पूर्व नायगाव येथील सिंग सभा गुरुद्वाराने कोरोना काळात लाखो गरजूंना जीवनवश्यक वस्तूंचे वाटप करून मोलाची कामगिरी बजावली. आजही त्यांचे हे कार्य अविरतपणे सुरू असून गुरुद्वारात येणाऱ्या प्रत्येक गरजूला आपुलकीची, आदराची वागणूक मिळत आहे. आज रुग्णालयात ऑक्सिजनची कमतरता जाणवत आहे, मात्र गुरुद्वारात मिळणाऱ्या या विनामुल्य सेवेमुळे दिलासा मिळाला असल्याचे रुग्णांच्या नातेवाईकानी सांगितले.

राशन किटचे देखील वाटप

गुरुद्वारातर्फे फक्त ऑक्सिजनच नाही, तर राशन किटचे वाटप देखील गरजूंना करण्यात येत आहे. मागील वर्षी देखील गुरुद्वारातर्फे साडेबारा हजार राशन किट वाटण्यात आले होते. त्याबरोबरच, दहा लाखांहून जास्त असंघटित कामगार मजदूर व गरजूंना जेवण देखील देण्यात आले होते.

हेही वाचा - डॉक्टरांच्या सुट्टीसाठी रेल्वेच्या आयसोलेशन कोचमधील कोरोना रुग्णांना सक्तीचे 'प्रस्थान'

Last Updated : May 10, 2021, 3:50 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.