ETV Bharat / state

भाजप शिवसेना नालेसफाईचे पैसे खाते, त्यामुळेच मुंबई पाण्यात जाते; विरोधकांचा हल्लाबोल - आमदार

पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले असून त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले आहेत. नालेसफाई सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे.

विरोधकांचा हल्लबोल
author img

By

Published : Jul 1, 2019, 4:33 PM IST

मुंबई - पावसाने मुंबईचे जनजीवन विस्कळीत झाले असून त्याचे पडसाद विधिमंडळातही उमटले आहेत. सत्ताधारी भाजप-शिवसेनेवर विरोधकांनी हल्लाबोल केला आहे. नालेसफाईच्या कामात प्रचंड भ्रष्टाचार असल्याने पहिल्या पावसातच मुंबईची पोलखोल होते, असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी तर मुंबई सोबतच ठाणे महापालिकेतही शिवसेनेच्या भ्रष्टाराचाराचा आणि दिरंगाईचा जनतेला फटका बसत असल्याची टीका केली. नालेसफाईचे टेंडर फेब्रुवारीमध्ये काढून मार्च-एप्रिलमध्ये फायनल करायचे असते. तसेच 'मे'मध्ये नालेसफाईची कामे पूर्ण करायची असतात. परंतु त्या काळात ते पूर्ण होत नाहीत. त्यामुळे जूनच्या पहिल्या पावसातच मुंबई आणि ठाणे शहर ठप्प होते.

मुंबई असो वा ठाणे वर्षोनुवर्षे हे नालेसफाईचे काम करणारे कंत्राटदार तेच कसे असतात, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. सत्ताधारी भाजप-शिवसेना नाल्यातले पैसे खाते म्हणून मुंबई पाण्यात जाते. हे आता वेगळे राहिलेले नाही, असे म्हणत त्यांनी भाजप-शिवसेनेवर टीका केली.

मी लहानपणापासून मुंबई परिसरात राहतो. दरवर्षी मुंबईत त्याच त्याच जागावर पाणी भरते. जागाही बदललेल्या नाहीत. मागील २५-३० वर्षात महापालिकेच्या या कामाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले पाहिजे, अशी उपहासात्मक टीकाही त्यांनी केली.

तर मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि पहारेकरी भाजप नालेसफाईचे पैसे खात असल्यानेच मुंबई दरवर्षी पाण्यात जाते, असा आरोप समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केला आहे. नालेसफाईमध्ये सत्ताधाऱ्यांनी आपली घरे भरली. त्यामुळेच मुंबई तुंबली. जनतेला होणाऱ्या नाहक त्रासाला शिवसेना जबाबदार आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

Intro:भाजप शिवसेना नालेसफाईचे पैसे खाते त्यामुळे मुंबई पाण्यात जाते, विरोधकांचा हल्लबोल

मुंबई 1

पावसाने मुंबईचे जन जीवन विस्कळीत झाले असून त्याचे पडसाद विधिमंडळात ही उमटले असून सत्ताधारी भाजप शिवसेनेवर विरोधकांनी हल्लबोल केला आहे. नालेसफाईच्या कामात प्रचंड भ्रष्ट्राचार असल्याने पहिल्या पावसातच मुंबईची पोलखोल होते असा आरोप राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. मुंबई महापालिकेतील सत्ताधारी शिवसेना आणि पहारेकरी भाजप नालेसफाईचे पैसे खत असल्यानेच मुंबई दरवर्षी पाण्यात जाते असे समाजवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आमदार अबू आझमी यांनी केला आहे.
नालेसफाईमध्ये सत्ताधार्यांनी आपली घरं भरली, त्यामुळेच मुंबई तुंबली, जनतेला होणाऱ्या नाहक त्रासाला शिवसेना जबाबदार आहे अशी टीका ही त्यांनी केली.
जितेंद्र आव्हाड यांनीं तर मुंबई सोबतच ठाणे महापालिकेत ही शिवसेनेच्या भ्रष्ट्राचाराचा आणि दिरंगाईचा जनतेला फटका बसत असल्याची टीका केली. नाले सफाईचे टेंडर फेब्रुवारी मध्ये काढून मार्च एप्रिल मध्ये फायनल करायचं असतं. तसेच मे मध्ये नालेसफाई पूर्ण करायची असते. या काळात नालेसफाई गेली कित्येक वर्षे पूर्णच होत नाही. त्यामुळे जूनच्या पहिल्या पावसातच मुंबई आणि ठाणे शहर ठप्प होते. मुंबई असो वा ठाणे वर्षोनुवर्षे हे नालेसफाई चे काम करणारे कंत्राटदार तेच कसे असतात, याचे उत्तर जनतेला मिळाले पाहिजे. आहेत. मग ते ठाण्यातील असो व मुंबईतील असो. सत्ताधारी भाजप शिवसेना नाल्यातले पैसे खाते आणि म्हणून मुंबई पाण्यात जाते हे आता वेगळं राहिलेलं नाही. असं म्हणत भाजप शिवसेनेवर टीका केली.मी लहानपणापासून मुंबई परिसरात राहतो. राहतो. दरवर्षी मुंबईत त्याच त्याच जागावर पाणी भरतं. जागाही बदलेल्या नाहीत. गेल्या पंचवीस तीस वर्षात महापालिकेच्या या कामाबद्दल त्यांना नोबेल पारितोषिक मिळाले पाहिजे अशी उपहासात्मक टीका ही त्यांनी केली. Body:सूचना- या बातमी साठी LIVE U वरून आलेले byte वापरावेतConclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.