ETV Bharat / state

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस कोरोना मुक्त.. रुग्णालयातून मिळाला डिस्चार्ज - Devendra Fadnavis Treatment St. George Hospital

फडणवीस यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुढचे १० दिवस त्यांना डॉक्टरांनी घरीच आराम करण्याचा सल्ला दिला असून, ते आता होम क्वारंटाईन होणार आहेत.

Devendra Fadnavis cured from corona
देवेंद्र फडणवीस कोरोना मुक्त
author img

By

Published : Nov 4, 2020, 6:51 PM IST

मुंबई - माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना २४ ऑक्टोबरला कोरोनाची लागण झाली होती. देवेंद्र फडणवीसांनी ट्विट करून ही माहिती दिली होती. यानंतर ते सेंट जॉर्ज या शासकीय रुग्णालयात उपचार घेत होते. आता ते ठीक झाल्याने त्यांना आज डिस्चार्ज देण्यात आला आहे.

फडणवीस यांनी कोरोनावर मात केली आहे. त्यांची चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. पुढचे १० दिवस त्यांना डॉक्टरांनी घरीच आराम करण्याचा सल्ला दिला असून, ते आता होम क्वारंटाईन होणार आहेत.

कोरोना झाल्याची ट्विटवरून दिली होती माहिती -

कोरोनाची साथ आल्यापासून मी दिवसरात्र काम करत आहे. मात्र, आता मी ब्रेक घ्यावा, असे देवाला वाटले असावे. माझी कोविड चाचणी पॉझिटिव्ह आली असून मी क्वारंटाईन होत आहे. लॉकडाऊन सुरू झाल्यापासून आलेला प्रत्येक दिवस हा कार्यरत राहण्यात गेला. पण, आता काही काळ विश्रांती घेतली पाहिजे, असे फडणवीस यांनी म्हटले होते.

हेही वाचा- आता आल्या पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका.. जाणून घ्या संपूर्ण प्रकिया

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.