ETV Bharat / state

INDIA Meeting in Mumbai : सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत 'INDIA' ची बैठक; यजमानपदावरुन महाविकास आघाडीत वाद?

author img

By

Published : Jul 28, 2023, 9:53 PM IST

Updated : Jul 28, 2023, 10:43 PM IST

मुंबईत येत्या ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात विरोधकांच्या 'इडिया'या आघाडीची बैठक (INDIA Meeting in Mumbai) होणार आहे. त्यासंदर्भात महाविकास आघाडी तयारीला लागली आहे. शुक्रवारी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेत चर्चा केली.

Etv Bharat
Etv Bharat
प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले

मुंबई - 2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या INDIA या देशातील विरोधकांच्या आघाडीची पुढील बैठक 25 व 26 ऑगस्ट रोजी मुंबईत होण्याची शक्यता वर्तवली जात होती. या बैठकीत विरोधी (INDIA Meeting in Mumbai) पक्षाच्यावतीने पंतप्रधानपदाचा चेहरा कोण असेल, यावर देखील शिक्कामोर्तब होऊ शकतो. या मुंबईत होणाऱ्या बैठकीचे यजमानपद नेमके कोण भूषवणार? यावरून महाविकास आघाडीतील तीनही पक्षांमध्ये वाद सुरू असल्याच्या चर्चा विधान भवनात होत्या. याच संदर्भात शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांची यशवंतराव चव्हाण सेंटर येथे बैठक घेतली.

काँग्रेस नेत्यांची शरद पवारांसोबत चर्चा - मुंबईत होणाऱ्या विरोधकांच्या बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा केली. या चर्चेला राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांसह महाराष्ट्रातील काँग्रेसचे पहिल्या फळीचे नेते उपस्थित होते. या बैठकीनंतर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन त्या संदर्भात झालेल्या चर्चेची माहिती दिली.

देशपातळीवर विरोधी पक्षांची मजबूत एकजूट झालेली असून, 'इंडिया' या नावाने ही आघाडी ओळखली जाते. 'इंडिया'ची तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीच्या तयारीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार शरद पवार यांच्याशी चर्चा झाली. मुंबईतील बैठकीसंदर्भात शरद पवार यांनी मार्गदर्शन केले. मुंबईतील बैठकीसाठी तयारी सुरु असून काँग्रेस पक्ष या बैठकीसाठी सज्ज आहे - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस

शरद पवारांची उद्धव ठाकरेंसोबत चर्चा - 'इंडिया'ची पहिली बैठक पाटण्यात झाली, तर दुसरी बैठक बंगळुरू येथे नुकतीच पार पडली. या दोन्ही बैठकांना शरद पवार उपस्थित होते. तिसरी बैठक मुंबईत होणार आहे. या बैठकीला देशभरातून जवळपास १०० महत्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत. यात काही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री, विविध पक्षांचे वरिष्ठ नेते असणार आहेत. उद्धव ठाकरे यांच्याशी शरद पवार यांनी फोनवरून चर्चा केली. मुंबईत होणारी 'इंडिया'ची बैठक यशस्वी करण्यावर महाविकास आघाडी म्हणून आमचा सर्वांचा भर आहे, अशी माहिती नाना पटोले यांनी दिली.

nana
काँग्रेस नेत्यांची शरद पवारांसोबत चर्चा

महाविकास आघाडी मजबूत - या पत्रकार परिषदेत नाना पटोले यांना जागा वाटपासंदर्भात कोणती चर्चा झाली का? महाविकास आघाडीत फूट पडल्याच्या चर्चा आहेत. महाविकास आघाडीची स्थिती काय? असा प्रश्न विचारला होता. त्यावर नाना पटोले म्हणाले की, "राज्यातील महाविकास आघाडी मजबूत आहे. पावसामुळे महाविकास आघाडीच्या सभा थांबलेल्या आहेत. पावसाळा संपताच या सभा पुन्हा सुरू होणार आहेत. शरद पवार, उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्षही राज्यभर सभा घेणार आहे. या बैठकीत जागा वाटपासंदर्भात कोणतीही चर्चा झाली नाही. काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीसंदर्भात चार ते पाच बैठका घेतलेल्या आहेत. तीन्ही पक्ष एकत्र बसून चर्चा होईल तेव्हा जागा वाटप व उमेदवार निश्चित करण्यावर चर्चा होईल, असे उत्तर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे.

हेही वाचा -

  1. Local Body Election : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका प्रलंबित; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल
  2. INDIA Meeting in Mumbai : मुंबईत होणाऱ्या 'इंडिया'च्या बैठकीवरून उद्धव ठाकरे व काँग्रेसमध्ये प्रतिष्ठेची लढाई, एकवाक्यता होईना!
  3. Opposition Meeting : विरोधी आघाडीचे नाव ठरले, 2024 मध्ये 'INDIA' विरुद्ध 'NDA' सामना रंगणार

Last Updated : Jul 28, 2023, 10:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.