ETV Bharat / state

शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके; ऑनलाइन शिक्षणाची अडचण होणार दूर - महानगरपालिका शाळा

मुंबईत ठिकठिकाणी आज शाळांना सुरुवात झाली असली तरी, प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तके देऊन पालकांना ऑनलाइन शिक्षणाच्या संदर्भात कशी सुरुवात होत आहे, याची माहिती देण्यात आली. यात विनाअनुदानित शाळांतील शिक्षक संघटनांनी काल शाळांमध्ये शिक्षकांनी हजर राहू नये, असे आवाहन केले होते त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यामुळे प्राथमिक शाळेंचा अपवाद वगळता खासगी माध्यमांच्या शाळा आणि त्यांची कार्यालये उघडली नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

online-school-started-in-mumbai
शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके
author img

By

Published : Jun 15, 2020, 3:58 PM IST

मुंबई - परिसरातील प्राथमिकच्या सरकारी आणि खासगी शाळा ऑनलाइन पद्धतीने सुरू झाल्या आहेत. मुंबई महानगरपालिका तसेच अनुदानितच्या प्राथमिक शाळांमध्ये पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तकांचे वाटप करण्यात आले. तर महापालिका शाळांमध्ये पुस्तकांसोबतच शालेय पोषण आहारच्या माध्यमातून देण्यात येणाऱ्या धान्याचे वाटप करण्यात आले.

शहरात ठिकठिकाणी आज शाळांची सुरुवात झाली असली तरी प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना केवळ पुस्तके देऊन पालकांना ऑनलाइन शिक्षणाच्या संदर्भात कशी सुरुवात होत आहे, याची माहिती देण्यात आली. यात विनाअनुदानित शाळांतील शिक्षक संघटनांनी काल शाळांमध्ये शिक्षकांनी हजर राहू नये, असे आवाहन केले होते त्याला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला. यामुळे प्राथमिक शाळेंचा अपवाद वगळता खासगी माध्यमांच्या शाळा आणि त्यांची कार्यालये उघडली नसल्याचे चित्र पाहावयास मिळाले.

मुंबईत मोठ्या प्रमाणामध्ये पालकांकडे अँड्रॉइड फोन नाहीत, ही बाब लक्षात घेऊन आम्ही आज शाळेच्या पहिल्या दिवशी विद्यार्थ्यांच्या हातात पुस्तके देण्यासाठी सर्व यंत्रणा कामाला लावली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली.

देवनार येथील महानगरपालिकेच्या इंग्रजी शाळेतील मुख्याध्यापिका प्रियांका कदम म्हणाल्या की, आज शाळेत आम्ही विद्यार्थ्यांना त्याचे ओळखपत्र मागवून घेऊन त्यांना नवीन पुस्तकांचे आम्ही वाटप करत आहोत. तसेच त्यांचे धान्यवाटप त्यांना करत आहोत. मुलांसाठी येत्या दोन दिवसांत ऑनलाइन शिक्षण सुरू करणार असून त्यासाठी शिक्षकांचे प्रशिक्षण झालेले असल्याची माहितीही त्यांनी दिली. तसेच ऑनलाइन शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके पोहचविणे आवश्यक आहे, म्हणून त्याचे वाटप केल्याचे कदम यांनी सांगितले.

खासगी अनुदानित शाळांमध्ये आज मोठ्या प्रमाणात शिक्षकांनी हजेरी लावत ऑनलाइन शिक्षण देण्यात संदर्भातील प्रयोग सुरू केले असल्याची माहिती मुंबई मुख्याध्यापक संघटनेचे सचिव प्रशांत रेडीज यांनी दिली.

मुंबईत अशा आहेत शाळा -
मुंबईत महापालिका शिक्षण विभागाच्या प्राथमिकच्या ९६६ माध्यमिकच्या २२३ शाळा असून या शाळांमध्ये १९ हजार ४१ शिक्षक असून ५ लाख ४१ हजार ८८० विद्यार्थ्यांची क्षमता आहे. तर दुसरीकडे शिक्षण उपसंचालक कार्यालयांच्या अंतर्गत येणाऱ्या अनुदानित, विनाअनुदानित शाळांची संख्या ही ४ हजार ४२ असून या शाळांमध्ये ६० हजार ३९३ शिक्षक तर २० लाख १२ हजार ९४८ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत.

..तरीही ऑनलाईन शाळा झाल्या सुरू
मुंबईत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील तब्बल २१ टक्के म्हणजेच ४३ हजारांहून अधिक विद्यार्थी आणि पालक हे गावी अथवा स्थलांतरीत झालेले आहेत. तर त्यात ३२ टक्के पालक आणि विद्यार्थ्यांचा संपर्क होऊ शकला नाही. अशा स्थितीत आज शाळांमध्ये ऑनलाइन अभ्यासक्रम सुरू झाले आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.