मुंबई: बारावीनंतरच्या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी होणाऱ्या सामायिक प्रवेश परीक्षा अर्थात सीईटी परीक्षेसाठी यंदा भरघोस प्रतिसाद विद्यार्थी देतील असा अंदाज आहे. एमएचटी सीईटी, एमसीए सीईटी, फाइन आर्ट्स, लॉ, बीएड आदी विविध अभ्यासक्रमांच्या सीईटींसाठी विद्यार्थी प्रवेश घेतात.
448 अर्ज सीईटीकडे प्राप्त: व्यवस्थापन विषयात ज्या विद्यार्थ्यांना आपले करियर करायचे आहे. त्यासाठी सीईटी देणे अनिवार्य आहे. 2018 -2019 ह्या वर्षी 1 लाख 6 हजार 448 विद्यार्थ्यांचे अर्ज सीईटीकडे प्राप्त झाले होते. त्यावेळेला राज्यामध्ये 111 केंद्रामधून या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. 2019 -20 ह्या वर्षी 1लाख 11हजार 846 विद्यार्थ्यांचे दोन्ही कोर्ससाठी अर्ज प्राप्त झाले होते. तसेच 112 केंद्रांमध्ये परीक्षा झाली होती.
विद्यार्थ्यांची संख्या वाढली: गेल्या काही वर्षांमध्ये राज्य सामायिक परीक्षेसाठी विद्यार्थ्यांची संख्या वाढत आहे. महाराष्ट्र राज्य सामायिक प्रवेश परीक्षांकरीता नोंदणी करण्याची २२ जून २०२२ ही अखेरची मुदत होती. या अखेरच्या दिवसापर्यंत या राज्यातील विविध अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी एकूण ११ लाख ६० हजार ५०४ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. एकूण ९ लाख ८१ हजार ७६९ अर्ज निश्चित झाले होते. ह्या वर्षी देखील सीईटी करिता प्रवेश संख्या वाढ होण्याची चिन्ह आहेत.शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी MBA/MMS व्यावसायिक पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी महा-MBA/MMS CET 2023 परीक्षा 18 मार्च 2023 आणि 19 मार्च 2023 रोजी घेतली जाईल. तर अधिक माहितीसाठी विद्यार्थ्यांनी वेबसाइटला भेट द्यावी.
वेळापत्रक प्रसिद्ध : सीईटीबाबत ह्या वर्षासाठी राज्यातील विद्यार्थ्यांनी वेळेत प्रवेश आणि अभ्यास करावा. त्यादृष्टीने राज्य सीईटी सेलकडून वेळापत्रक प्रसिद्ध केले आहे. या शैक्षणिक वर्षात पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेणे सोपे होईल. विद्यार्थ्यांना पुरेसा वेळ मिळणार आहे. त्यांना पूर्ण तयारी करता येणार आहे. सीईटीद्वारे जारी केलेल्या रूपरेषेनुसार केटरिंग तंत्रज्ञान आणि हॉटेल व्यवस्थापन ह्या अभ्यासक्रमाकरिता प्रवेश परिक्षा होणार आहे. बीएचएमसीटी सीईटी 20 एप्रिल 2023 रोजी तर पदव्युत्तर अभ्यासक्रमाची एमएचएमसिटी सीईटी परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी अपेक्षित आहे. यानंतर बी प्लॅनिंग सीईटी ही प्रवेश परीक्षा 23 एप्रिल 2023 रोजी होईल, अशी शक्यता आहे. तसेच वास्तुशास्त्र पदव्युत्तर अभ्यासक्रमाला सीईटी प्रवेश परीक्षा 30 एप्रिल 2023 रोजी होईल अशी शक्यता आहे.