मुंबई : मुंबई शहरात आज भाजपविरोधात काँग्रेसकडून एकदिवसीय मौन सत्याग्रह केले जात आहे. राज्यातील अनेक प्रश्न डोळ्यासमोर असतानाही सत्तेसाठी भाजप काहीही करू शकतो, हे आपण पाहिले आहे. बेरोजगारी असो, महागाई महिलांवर अत्याचाराचे प्रश्न असो याकडे लक्ष देण्यापेक्षा सत्ताकरण करण्यामध्येच भाजप व्यस्त आहे. राज्यात मंत्रिमंडळ विस्तार होऊन खातेवाटप झाले नाही. त्यामुळे आमची लढाई सत्यासाठी आहे. त्यांची लढाई सत्तेसाठी असल्याचे वर्षा गायकवाड यांनी म्हटले आहे.
राहुल गांधी यांची खासदारकी रद्द : लोकशाहीची पायमल्ली सध्या सुरू आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचे काम भाजपाकडून सुरू आहे. सरकारी यंत्रणांचा गैरवापर करणे. यामुळे कुठून कुठून लोकशाहीला धोका होऊ शकतो. लोकशाही वाचनासाठी आजचे हे मौन सत्याग्रह आंदोलन आहे. काँग्रेस पक्षातील काही नेते भाजपच्या संपर्कात असल्याच्या प्रश्नाला उत्तर देताना वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मीडियाच्या माध्यमातून या बातम्या दिल्या जात आहे. मात्र, राज्यतील काँग्रेस मधील सर्व नेते एक संघ आहे. येत्या काळामध्ये आम्ही जिल्ह्याजिल्ह्यामध्ये पदयात्रा सुरू करणार आहोत. एक दिलाने पक्ष संघटना मजबूत करण्यावर आम्ही भर देणार आहोत. काँग्रेस पक्ष अहिंसा, सत्यासाठी आणि लोकांच्या प्रश्न संदर्भात आम्ही लढत आहोत. तर शिवसेना भाजप राष्ट्रवादी खाते वाटप संदर्भात लढत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
मौन सत्याग्रह आंदोलन : मुंबईतील मंत्रालय समोरील गांधी पुतळ्याजवळ काँग्रेसच्या वतीने मौन सत्याग्रह आंदोलनात सुरुवात झाली आहे. मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते, महत्त्वाचे नेते यात सहभागी झाले आहेत. सकाळी 11 वाजेपासून सत्याग्रह आंदोलनात सुरुवात झाली आहे. आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत हे आंदोलन असणार आहे. दिवसभरात मौन सत्याग्रह आंदोलनामध्ये काँग्रेसचे ज्येष्ठ नेते टप्प्याटप्प्याने सहभागी होणार आहे. भाजप सरकारच्या विरोधात काळ्या रंगाची मुखपट्टी लावून मौन राहून विरोध दर्शविला जात आहे. गांधी पुतळा परिसरामध्ये मोठ्या प्रमाणावर काँग्रेस पक्षाची बॅनरबाजी देखील करण्यात आली आहे.
हेही वाचा :
- Tilak Smarak Award To Pm Modi: पंतप्रधान मोदींना लोकमान्य टिळक पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल काँग्रेसकडून नाराजी; कार्यक्रम रद्द करण्याची मागणी
- Dr Sujay Vikhe Patil: संसदेत पहिल्या टर्मच्या उत्कृष्ट १० खासदारांमध्ये डॉ. सुजय विखे पाटील
- Rahul Gandhi : कॉंग्रेसच्या निवडणूक प्रचाराचा शंखनाद महाराष्ट्रातून होणार, 12 जुलैपासून प्रचाराला सुरुवात