ETV Bharat / state

INS Vyas Warship : एक दिवस 'आयएनएस व्यास' युद्धनौकेवर; पाहा व्हिडिओ - one day on ins vyas Warship

INS Vyas Warship : शुक्रवारी 'एक दिवस समुद्रावर' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी आयएनएस व्यास युद्धनौकेवर पश्चिम नौदलाकडून आपल्या कार्यक्षमतेची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली.

INS Vyas Warship
एक दिवस 'आयएनएस व्यास' युद्धनौकेवर; पाहा व्हिडिओ
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 4, 2023, 11:26 AM IST

Updated : Nov 4, 2023, 12:26 PM IST

एक दिवस 'आयएनएस व्यास' युद्धनौकेवर; पाहा व्हिडिओ

मुंबई INS Vyas Warship : देशभरात डिसेंबरच्या चार तारखेला भारतीय नौदल दिन साजरा केला जातो. यंदा हा दिवस सिंधुदुर्ग येथे साजरा केला जाणार आहे. सध्या जगाच्या पाठीवर काही देशात युद्ध सुरू आहे. त्यातच पाकिस्तान आणि चीन अधूनमधून खोडी काढण्याचा प्रयत्न करत असतात. जगातील 80 टक्के व्यापार हा समुद्रमार्गानं होत असतो. भारताला देखील मोठी समुद्र किनारपट्टी लाभली आहे. सुरक्षेच्या दृष्टीकोनातून भारतीय नौदल अतिशय बलाढ्य आहे. दरम्यान, शुक्रवारी आयएनएस व्यास युद्धनौकेवर पश्चिम नौदलाकडून आपल्या कार्यक्षमतेची प्रात्यक्षिकं सादर करण्यात आली. यावेळी कमांडचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. युद्धनौका ऑफिसर सौरव यादव यांनी युद्धनौका कार्यप्रणाली बद्दल माहिती दिली. सागरी क्षेत्रात आपल्या देशाला भेडसावणारा धोका आणि उभी असलेली आव्हानं, त्या आव्हानांवर मात करण्यासाठी घेण्यात आलेली मोहिमांची माहिती दिली गेली.

एक दिवस समुद्रावर : शुक्रवारी 'एक दिवस समुद्रावर' या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. आयएनएस व्यास युद्धनौका कशा प्रकारे कार्य करते आणि तिची वैशिष्ट्यं काय आहेत. किती वर्षांपासून देशसेवेत दाखल झाली. याविषयी ETV भारतशी युद्धनौका अधिकारी सुमित आतकरे यांनी संवाद साधला. ते म्हणाले की, आयएनएस व्यास फ्रीग्रेट क्लास मध्ये युद्धनौका मोडते, ही युद्धनौका वाफेवर चालते. युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली तेव्हा आयएनएस व्यास सर्वप्रथम दुश्मन नौकेला लक्ष्य करणार. त्यानंतर दुश्मनाला नेस्तनाभूत करण्यासाठी डिस्ट्रॉयर येणार. या युद्धनौकेवर 16 मिसाईल तैनात असतात. सरफेस टू सरफेस मिसाइल, सरफेस टू एअर मिसाईल, 1 गन माउंट, 4 छोटे गन माऊन्टस यांचा उपयोग चार ते पाच किलोमीटर मधील टारगेटवर फायरिंग करण्यासाठी केला जातो.

युद्धनौकेत दोन हेलिकॉप्टर ठेवण्याची व्यवस्था : आयएनएस व्यास युद्धनौका ही 2015 साली भारताच्या नौदलात दाखल झाली आहे. व्यास युद्धनौका फॉक्सल पार्ट, मिड शिप, कॉटर डेक अशा प्रकारे विभागलेली आहे. या युद्धनौकेत दोन हेलिकॉप्टर ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. शुक्रवारच्या प्रात्यक्षिकांमध्ये एकूण सात युद्धनौकांनी सहभाग नोंदवला. व्यास, विपुल, त्रिकांड, मुंबई, विशाखापटनम ,मर्मागोवा युद्धनौका समुद्राच्या लाटांना कापत शत्रूला कशाप्रकारे नष्ट करू शकतात याची चुणूक शुक्रवारी पाहायला मिळाली.

या प्रात्यक्षिकांनी मनं जिंकली : यावेळी अचानकपणे हल्ला झाला तर युद्धनौकेद्वारे सिम्युलेटेड हल्ला, हवाई सामर्थ्यांचे प्रात्यक्षिक, हेलिकॉप्टरच्या माध्यमातून शोध मोहीम आणि बचावकार्य कसं केलं जातं यांचं प्रत्यक्षिक दाखवण्यात आलं. एखाद्यावेळी दुष्मन देशाकडून आपल्या देशाच्या सुरक्षेला धोका पोहोचवणारी वस्तू टाकली जाते, त्यावेळेस सी किंग हेलिकॉप्टरच्या मदतीनं सोनार डक सर्च ऑपरेशन करत त्या वास्तूचा शोध घेतला जातो. युद्धजन्य परिस्थिती असेल त्यावेळेस युद्धनौकेतील इंधन संपले, तसंच युद्ध साहित्य दुसऱ्या युद्ध नौकेवर स्थलांतर करणे, एका युद्धनौके आणि दुसऱ्या युद्धनौकेवर नौदलाच्या जवानांना स्थलांतर करण्याबाबतची प्रात्यक्षिकं यावेळी दाखवण्यात आली. सर्वच पैलूंबद्दल वेळोवेळी माहिती दिली जात होती. सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेल्या पाणबुडीची देखील प्रात्यक्षिके लांबून पाहायला मिळाली. युद्धनौकेवर आग लागल्यावर आग नियंत्रित करून रेस्क्यू करण्याबाबत प्रात्यक्षिक करण्यात आलं. त्यासोबतच युद्धनौकेवर, परिसरात भारतीय नौदल न्यूक्लिअर, केमिकल हल्ल्याला कशाप्रकारे सामोरे जाऊ शकतो याचं देखील प्रात्यक्षिक यावेळी सादर करण्यात आलं.

हेही वाचा -

  1. INS Vikrant At Mumbai Coast : स्वदेशी बनावटीची पहिली अजस्त्र युद्धनौका आयएनएस विक्रांत मुंबईच्या किनाऱ्यावर दाखल
  2. INS Vikrant Video : आयएनएस विक्रांतसह नौदल, हवाई दलाची ताकद दाखवणारी शॉर्ट फिल्म, पाहा व्हिडिओ
  3. नौदलाला मिळाली मोठी ताकद; भारतीय बनावटीच्या INS सुरत व उदयगिरी युद्धनौकांचे जलावतरण, 'या' आहेत विशेषतः

Last Updated : Nov 4, 2023, 12:26 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.